यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणे हे अनेक महत्त्वाकांक्षी तरुण-तरुणींचे स्वप्न असते. ही परीक्षा पास करण्यासाठी ते दिवस-रात्र मेहनत घेत असतात. अनेक अडचणींचा सामना करीत उमेदवार ही परीक्षा देत असतात. जेव्हा या परीक्षेत त्यांना यश मिळते तेव्हा त्यांचा प्रवास इतरांसाठी प्रेरणादायी ठरतो. आज आम्ही तुम्हाला अशाच एका महिला आयआरएस अधिकाऱ्याबद्दल सांगणार आहोत. कोमल गणात्रा असे त्या महिला अधिकारी व्यक्तीचे नाव आहे.

कोमलने एका मुलाखतीत सांगितले होते, “माझ्या वडिलांनी मला यूपीएससीचे स्वप्न दाखवले. मी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण व्हावी, अशी त्यांची इच्छा होती. माझ्या वडिलांनी भाऊ आणि माझ्यात कधीच फरक केला नाही. त्यामुळे जेव्हा जेव्हा मी यूपीएससीचा विचार केला तेव्हा माझ्या वडिलांचे स्वप्न माझ्यासमोर आले. त्यामुळे मला खूप धीर आला. शेवटी मी ही परीक्षा उत्तीर्ण करण्यात यशस्वी झाले.”

Mumbai Municipal Corporation , Class two Test,
मुंबई : स्वयंअध्ययनातील निपुणतेसाठी दुसरीच्या विद्यार्थ्यांची चाचणी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
MPSC Preparation Group B Services Prelims Exam History of Modern India
एमपीएससी तयारी: गट ब सेवा पूर्व परीक्षा; आधुनिक भारताचा इतिहास
Walmik Karad Mother Parubai Karad
Walmik Karad : वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर आईची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “आता मी मेल्यावर पाणी पाजायला…”
mumbai university Late Hall Ticket for m a m com and m sc students caused chaos at exam centers
‘आयडॉल’च्या परीक्षा प्रवेशपत्रावरून विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम, मुंबई विद्यापीठाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह, परीक्षा केंद्रांवर संभ्रमाचे वातावरण
Image Of Anjali Damania And Walmik Karad
Walmik Karad : “एका वाया गेलेल्या मुलाबरोबर…” आंदोलनाला बसलेल्या वाल्मिक कराडच्या आईला अंजली दमानियांचे ६ प्रश्न
Mumbai police latest news in marathi
मुंबई पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत गैरप्रकार, आधीच दिली होती सूचना तरीही…
CET registration, students, Ticket facility, CET ,
सीईटी नोंदणीदरम्यान विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी ‘तिकीट सुविधा’

हेही वाचा- पुण्यात मसाल्यांची गिरणी चालवणाऱ्या ‘बेबी बोकले’ देतायत मायक्रोसॉफ्टला मराठीचे धडे; तासाची कमाई किती? 

कोमल मूळची गुजरातची. ग्रॅज्युएशननंतर कोमलचे लग्न एका एनआरआयशी झाले. लग्नादरम्यान कोमलने गुजरात सेवा आयोगाची मुख्य परीक्षाही दिली होती. मात्र, कोमलच्या नवऱ्याला तिने GPSC ची मुलाखत द्यावी, असे वाटत नव्हते. कारण- त्याला कोमलला सोबत घेऊन जायचे होते. नवऱ्याच्या सांगण्यावरून कोमलने मुलाखत दिली नाही. लग्नाच्या १५ दिवसांनी कोमलचा नवरा एकटा न्यूझीलंडला गेला. त्यानंतर तो परत आलाच नाही.

हेही वाचा- सोळा फ्रॅक्चर, आठ शस्त्रक्रिया अन् कुटुंबाचा तीव्र नकार…; पाहा ‘या’ महिला IAS अधिकाऱ्याचा प्रेरणादायी प्रवास 

त्यानंतर कोमलने न्यूझीलंडला जाण्याचा प्रयत्न केला; परंतु तो अयशस्वी ठरला. कोमलने या प्रकरणी न्यूझीलंडच्या पंतप्रधानांना पत्रही लिहिले होते. परंतु, तिकडून सौम्यपणे उत्तर देण्यात आले. कोमलला आशा होती की, तिचा नवरा परत येईल; पण तो आला नाही. दरम्यान, कोमलला सरकारी शाळेत शिक्षकाची नोकरीही लागली. नोकरीसोबत तिने यूपीएससी परीक्षेचीही तयारी सुरू केली होती.

हेही वाचा- ३०० रुपयांत कसंबसं चालवायची घर; आज इंग्रजीचे धडे देत करतेय बक्कळ कमाई, ही ‘देहाती मॅडम’आहे तरी कोण?

कोमलने सांगितले होते की, तिला या परीक्षेबाबत काहीच कल्पना नव्हती. त्यामुळे ती तिच्या गावाहून अहमदाबादला जायची. तिथे ती यूपीएससीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना भेटत असे. नोकरीमुळे तिला आठवडाभर अभ्यास करायला वेळ मिळत नसे. त्यामुळे ती शनिवार-रविवारी खूप अभ्यास करायची. नोकरी करीत करीत तिने यूपीएससीचा अभ्यास सुरू ठेवला होता. अखेर तीन अयशस्वी प्रयत्नांनंतर चौथ्या प्रयत्नात तिला यूपीएससी परीक्षेत यश मिळाले. २०१२ मध्ये कोमल यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाली. या परीक्षेत तिने ५९१ वा रँक मिळवली. काही काळानंतर कोमलने दुसरे लग्न केले आणि आता ती एका मुलीची आई आहे.

Story img Loader