जगातील सर्वाधिक उंचीच्या युद्धभूमीवर अर्थात सियाचीन ग्लेशिअरवरील कुमार पोस्टवर कार्यरत असलेल्या भारतीय लष्करातील पहिल्यावहिल्या महिला अधिकाऱ्याचं नाव आहे कॅप्टन शिवा चौहान. सियाचिन बॅटल स्कूलच्या अन्य सहकाऱ्यांसोबत कठोर प्रशिक्षण घेतलेल्या ‘फायर अँड फ्युरी सॅपर्स’च्या शिवा चौहानची नियुक्ती तब्बल १५ हजार ६३२ फूटांवरील कुमार पोस्टवर तीन महिन्यांसाठी झाली आहे. अखंड मेहनत आणि दृढनिश्चयाच्या बळावर शिवा चौहानने आपल्या कर्तृत्वाने आकाशाला गवसणी घातली आहे. पुरूष सैनिकांच्या तोडीस तोड कठोर प्रशिक्षणातून तावून सुलाखून बाहेर पडत तिने महिला कुठेही कमी नाहीत, हेच आपल्या उदाहरणातून दाखवून दिलं आहे. २०२३ या नववर्षाच्या दुसऱ्याच दिवशी ती अतिशय कठोर चढण पार करत सियाचिन ग्लेशिअरवरील पोस्टपर्यंत पोहोचली आहे.

आणखी वाचा : यशस्विनी ती उगवत्या सूर्याच्या देशात | shrunali ranade went to japan …

PM Modi to dedicate 3 frontline naval combatants to nation
आत्मनिर्भरतेतील आव्हाने!
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
India Women Register 435 Highest ODI Total
India Women Highest ODI Total: भारतीय महिला संघाची वनडेच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या, पुरूष संघालाही टाकलं मागे
religious reform in india social transformation in religion hindu religious reform
पातक, प्रायश्चित्त आणि शुद्धीविचार
psychiatrist sexually abused nearly hundred women in Hudakeshwar area
नागपूर : खळबळजनक! मानसोपचार तज्ज्ञाकडून शंभरावर मुली-महिलांचे लैंगिक शोषण…
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव कसा असतो?
Himalayan breed dog now becomes India fourth registered indigenous breed
‘हिमालयन शेफर्ड डॉग’ ठरली चौथी अस्सल भारतीय श्वान प्रजाती… याचे महत्त्व काय?
History , Art , Contemporary Visual Art , Feminist ,
दर्शिका : ‘अनंतकाळच्या माते’ची अनंतकाळची लढाई…

यापूर्वी भारताने जगातील सर्वात उंच आणि अतिथंड युद्धभूमीच्या सुरक्षिततेसाठी ‘ऑपरेशन मेघदूत’ द्वारे कारवाई करत सियाचिन ग्लेशिअर ३८ वर्षांपूर्वी ताब्यात घेतल्यानंतर एवढ्या उंचीवर महिला अधिकाऱ्याची नियुक्ती केलेली नव्हती. सियाचिनचे तापमान उणे ६० अंश सेल्सिअसपेक्षाही अनेकदा खाली जाऊ शकते, अशा ठिकाणी इतर सैनिकांप्रमाणेच शिवा हिलादेखील हाडे गोठवणाऱ्या थंडी कडा पहारा ठेवावा लागेल. ग्लेशिअरवरील जवळपास ८० टक्के सैनिकी छावण्या १६ हजार फूट उंचीवर असून सर्वोच्च छावणी २१ हजार फूटांपेक्षा अधिक उंचीवर आहे. कॅ. शिवा चौहान हिची नियुक्ती असलेल्या कुमार पोस्टची उंची १५, ६३२ फूट आहे. ती या पोस्टवरील एका गटाचे नेतृत्व करणार असून अनेक लढाऊ अभियांत्रिकी आव्हानांची जबाबदारी तिला सांभाळावी लागणार आहे.

आणखी वाचा : यशस्विनी डिप्रेशन पीएच.डी आणि कुटुंबाची मोलाची साथ विदेश शिक्षण विदेश …

काराकोरमच्या पर्वतरांगांतील २० हजार फूट उंचीवरील सियाचेन ग्लेशिअर जगातील सर्वोच्च युद्धभूमी म्हणून ओळखले जाते. याठिकाणी सैनिकांना हिमवादळांचा, हिमबाधेचा सामना करावा लागतो. यापूर्वी महिला अधिकाऱ्यांना त्यांच्या युनिटसह ९ हजार फूट उंचीवरील सियाचिन बेस कॅम्पवर नियमित पोस्टिंगसाठी नेमलं जात असे. कुमार पोस्टवर नियुक्त होण्यापूर्वी शिवा चौहानला खडतर अशा प्रशिक्षणातून जावे लागले आहे. सियाचिन बॅटल स्कूलमध्ये सहनशक्तीची कसोटी, बर्फाची भिंत चढणे, हिमस्खलन, हिमनदीला पडलेल्या भेगांतून बचावकार्य आणि प्रतिकूल परिस्थितीत तग धरून जिवंत राहणे यासारख्या प्रशिक्षणाचा समावेश होता.

वेगवेगळी आव्हाने असतानाही कॅ. शिवा चौहानने अथक परिश्रमाने, वचनबद्धतेने आपले प्रशिक्षण पूर्ण केले, असे लष्कराने म्हटले आहे. २०२२ मध्ये कॅप्टन शिवा हिने कारगिल विजयदिनानिमित्ताने सियाचेन युद्धस्मारक ते कारगिल युद्धस्मारक दरम्यान आयोजित केलेल्या ५०८ किलोमीटरच्या सुरा सोई सायकलिंग मोहिमेचे यशस्वी नेतृत्व केले होते. तिने जगातील सर्वोच्च युद्धभूमीवरील सुरा सोई इंजिनिअर रेजिमेंटच्या पुरूषांचे नेतृत्व करण्याचे आव्हान स्वीकारले होते. तिच्या आजवरच्या कामगिरीच्या आधारावरच सियाचिन बॅटल स्कलूच्या प्रशिक्षणासाठी तिची निवड झाली.

आणखी वाचा : यशस्विनी इतिहासाकडे पाहण्याची डोळसवृत्ती लाभली | successful career …

मे २०२१ मध्ये शिवा चौहान हिला सैन्यातल्या इंजिनिअर रेजिमेंटमध्ये नियुक्त करण्यात आले. उदयपूरमध्येच शालेय शिक्षण आणि उदयपूरच्या एनजीआर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून तिने सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. मूळची राजस्थानची असलेल्या शिवाचे वडील ती ११ वर्षांची असतानाच निधन पावले. तिच्या सर्व शिक्षणाची जबाबदारी तिच्या आईने घेतली. लहानपणापासूनच तिला भारतीय सैन्य दलात भरती होण्यासाठी प्रेरित केले गेले. चेन्नईच्या ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीमधील प्रशिक्षणादरम्यान तर तिने कमालीचा उत्साह दाखवला. शिवा संदर्भात माहिती देताना भारतीय लष्कराने म्हटले आहे की, तिच्या नेतृत्वाखालील सॅपर्सचा गट अनेक लढाऊ अभियांत्रिकी आव्हानांच्या पूर्तीसाठी कटीबद्ध असेल.
भारतीय सशस्त्र दल आता महिला अधिकाऱ्यांना अनेक संधींची दारे खुली करून देत आहे, त्यांना अधिक सक्षम होण्यास मदत करत आहे आणि या क्षेत्रातील पुरूषप्रधानतेमुळे निर्माण झालेली लिंगभेदाची दरी कमी करण्याचे काम करीत आहे. आपल्या पुरूष सहकाऱ्यांच्या बरोबरीने गणवेशधारी महिलांवर आता मध्यवर्ती भूमिका सोपविण्यात आल्या आहेत. लिंगसमानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आखलेले निवडीचे निकष पूर्ण केले असतील तर अनुक्रमे गरूड कमांडो फोर्स आणि मरीन कमांडोज यासारख्या भारतीय हवाई दल आणि नौदलाच्या विशेष तुकड्यांमध्ये सामील होण्यासाठी महिला अधिकाऱ्यांना आता परवानगी देण्यात आली आहे. कॅप्टन शिवा चौहानच्या नियुक्तीने भारतीय सशस्त्र दलामध्ये सामील होत महत्त्वाच्या पदांची स्वप्नं पाहणाऱ्या, महत्त्वाकांक्षा बाळगून असणाऱ्या अनेक युवतींचा हुरूप वाढला आहे. महिलांना अशक्य असं काहीच नाही, हेच कॅप्टन शिवा चौहानने दाखवून दिलं आहे. सॅल्यूट टू कॅप्टन शिवा अॅण्ड इंडियन आर्मी !

Story img Loader