मृण्मयी साटम

ट्रेकिंग, स्केचिंग, रनिंग आणि इतिहासाचा अभ्यास या गोष्टींची मला फारच आवड. ती कायमच जोपासण्याकडं माझा कल राहिलाय. आईबाबांसोबत वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून मी ट्रेकिंगला जातेय. मग ओघानंच मराठ्यांचा इतिहास लहानपणापासून कानावर पडत गेला. आईबाबा भावाला नि मला मराठीतील वाचलीच पाहिजेत, अशी महत्त्वाची पुस्तकं रोज तासभर वाचून दाखवत. शाळेतल्या शिक्षकांची इतिहास शिकवण्याची पद्धत फार आवडली. या साऱ्यामुळं इतिहासाप्रती कुतूहल वाढलं. गोडी लागली. आठवीतच मनाशी पक्कं केलं होतं की, पुढं आर्ट्स घ्यायचं.

Shahid Afriadi breaks silence on relationship rumours with Sonali Bendre
सोनाली बेंद्रेबरोबरच्या अफेअरबद्दल विचारताच पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी म्हणाला, “आता आम्ही…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
Cyclone Feingal cleared entire state and once again state is heading towards winter
विदर्भ गारठला… गोंदिया ९.४, तर नागपूर, वर्धा १० अंश सेल्सिअस
Sane Guruji , book Sane Guruji Jeevan Gatha,
‘साने गुरुजींची जीवनगाथा’ आता ‘श्रवणीय’
eknath khadse devendra fadnavis
उलटा चष्मा : पांढरे निशाण…
Kandalwan damage new jetty, Virar Marambalpada,
नवीन जेट्टीच्या रस्त्यासाठी तिवरांची कत्तल? विरारच्या मारंबळपाडा परिसरातील प्रकार; पर्यावरणप्रेमींकडून संताप
kalyan session and district court verdict on mandir masjid issue at durgadi fort
कल्याणमधील दुर्गाडी किल्ला शासनाच्या मालकीचा; न्यायालयाने मुस्लिम संघटनेचा दावा फेटाळला

आणखी वाचा : यशस्विनी, करिअर : जपानच्या महिला क्रिकेट टीममध्ये चक्क मराठी मुलगी! (उत्तरार्ध)

सेंट झेव्हिअर्समधून बी.ए. झाल्यावर मला ‘मराठय़ांचा इतिहास’ अभ्यासून पुढं पीएच.डी. करायची होती. त्यासाठी पुणे विद्यापीठ गाठावं लागणार होतं, कारण तिथं मराठय़ांच्या इतिहासासाठी चांगली फॅकल्टी होती. पण तांत्रिक अडीअडचणींमुळे मार्क चांगले असूनही तिथं प्रवेश मिळाला नाही. मग मुंबई विद्यापीठात डॉ. मंजिरी कामत यांच्या मार्गदर्शनाखाली ‘हिस्ट्री ऑफ कलोनिअल बॉम्बे’ हा पेपर घेतला. तेव्हाच ठरवलं की, पीएच.डी. त्यातच करायची. लेस्टर विद्यापीठाचा केंब्रिज किंवा ऑक्सफर्डएवढा बोलबाला नाहीये, पण अर्बन हिस्ट्रीचं डिपार्टमेंट असणारी ती एकमेव युनिव्हसिर्टी आहे. दॅट डिपार्टमेंट इज वर्ल्ड फेमस. बी.ए.-एम.ए.ला आम्ही ज्यांच्या पुस्तकांचा रेफरन्स घेतला ते डॉ. प्रशांत किदंबी तिथं फॅकल्टी आहेत. त्यांचा नि माझ्या संशोधनाचा काळ आणि विषयात पुष्कळसं साम्य आहे. त्यांचं मार्गदर्शन मला मिळू शकलं असतं. मग त्या दिशेनं प्रयत्न सुरू केले आणि ते वर्कआउट झालं. मी लेस्टर युनिव्हर्सिटीत दाखल झाले.

आणखी वाचा : यशस्विनी : ‘ती’ उगवत्या सूर्याच्या देशात! (पूर्वार्ध)

पीएच.डी.चा कालावधी तीन वर्षांचा होता. इथं आल्यापासून या विषयातल्या अभ्यासकांची मतमतांतरं आणि निरीक्षणं समजून घेतली आणि प्रायमरी रिसर्च सुरू झाला. ब्रिटिश लायब्ररीत जायला लागले; वातावरण, कागदपत्रांची हाताळणी वगैरेंचा विचार करता ब्रिटिश लायब्ररी आणि आपल्या अर्काइव्हजमध्ये केलेल्या रिसर्चमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. इथं बऱ्याच गोष्टी डिजिटाइज्ड असल्यानं त्या डाउनलोड करून सोयीनं बघता येतात. इथं फोटोग्राफीला परवानगी आहे. त्यामुळे बराच वेळ वाचतो नि एनर्जी सेव्ह होते. ‘पब्लिक हेल्थ इन कलोनिअल बॉम्बे सिटी’ हा माझा अभ्यासविषय. १९१४ ते १९४५ हा पहिल्या नि दुसऱ्या महायुद्धामधला कालखंड अभ्यासतेय. या विषयात अजून तेवढा अभ्यास झालेला नाहीये. शिक्षणपद्धतीच्या दृष्टीनं विचार करता, झेव्हिअर्सची आमची पहिलीच ऑटॉनॉमस बॅच होती. त्यांच्या इंटर्नल मार्किंगमुळं आम्हाला रिसर्चला खूप स्कोप होता. तो मला एम.ए.ला मुंबई विद्यापीठात जाणवला नाही. लेस्टरला आल्यावर तो जाणवला. इथली लेक्चर्स खूप इंटरॅक्टिव्ह असतात. थिअरीला खूप महत्त्व आहे. आपल्याकडं एम.ए. करताना थिअरी पूर्णपणं दुर्लक्षिली जाते. त्यामुळं इकडच्या थिअरीचा सुरुवातीस खूप त्रास झाला. अभ्यासाच्या दृष्टिकोनातून खूप मोकळीक दिली जाते.

आणखी वाचा : अभियंता ते लेफ्टनंट गव्हर्नर…असा आहे अरुणा मिलर यांचा प्रवास

सुरुवातीस इथल्या हॉस्टेलमध्ये अभ्यास नि बाकीच्या गोष्टी मॅनेज करणं, ही तारेवरची कसरत होती. थंडी-वाऱ्याला एक वेळ तोंड देता येईल, पण मुंबईकर मुलीला ऊन न दिसणं हा डिप्रेसिंग फॅक्टर होता. दुपारी ३ -४ वाजताच मध्यरात्रीसारखा होणारा काळोख, हा बदल इतका लक्षणीय होता की, तो चटकन् पचवायला थोडं कठीण गेलं. कुकिंगमध्ये मला कधीच फारसा इंटरेस्ट नव्हता, पण तिथल्या कॉमन किचनमध्ये मी वेगवेगळ्या प्रकारच्या डिशेस् करायला शिकले. माणसांनी सतत गजबजलेल्या शहरातून फारच कमी लोकसंख्या असणाऱ्या ठिकाणी मी आले. इथं मैलोन‌मैल माणूस दिसत नाही चटकन. पर्सनल स्पेसला खूपच महत्त्व दिलं जातं. साधी भेटही खूप ऑर्गनाइज्ड असते. पर्सनल स्पेस द्यावी, पण ती किती नि कुठं हा प्रश्न पडला होता मला. त्यामुळं सुरुवातीला मी कुणाशी बोलायचेच नाही. उलट मुंबईतलं माझं सोशल लाइफ खूपच अ‍ॅक्टिव्ह होतं. या घुमेपणाचं सुरुवातीला थोडंसं डिप्रेशन आलं होतं. घरच्या आठवणींपेक्षाही एकटेपणा वाटत होता. तेव्हा गाइडशी आणि वर्गातल्या काहीजणांशी संवाद साधल्यावर त्यांनी माझी विचारपूस करून काळजी घेतली. मुंबईत असताना मी थोडी टॉमबॉइश होते. आता इथे आल्यावर प्रेझेंटेबल राहायला शिकलेय.

आणखी वाचा : यशस्विनी : ‘ती’चे रूग्णांना सहाय्यकारी संशोधन (उत्तरार्ध)

ब्रिटनमध्ये आल्यावर सुरुवातीचा आठवडा मित्राच्या फॅमिलीबरोबर लंडनमध्ये राहिले. त्यांच्यासोबत ट्रेकला गेल्याने खूपच आनंद मिळाला नि मोटिव्हेशनही. त्यानंतर मी बऱ्याच ठिकाणी फिरले. कधी एकटेपणा वाटल्यास मनसोक्त स्केचिंग करते. घडलेल्या घटनांवर विचार करून त्या ई-डायरीच्या माध्यमातून घरच्यांना आणि मित्रमैत्रिणींना पाठवते. आईबाबांचा कायमच प्रचंड पाठिंबा मिळालाय. त्यांना खूप मिस करतेय. पण सोशल मीडियामुळे गोष्टी सोप्प्या झाल्यात. मी इथून, माझा भाऊ मॉस्कोहून आणि आई-बाबा मुंबईतून अशा वेगवेगळ्या टाइम-झोनच्या वेळा जुळवून गप्पा होतातच. मी बाबांसोबत मुंबई मॅरेथॉन धावायचे. तशीच इथे धावले. इथे पहिली इंटरनॅशनल मॅरेथॉन धावले, असं वाटलं. ते मेडल नि ती रन मी त्यांना डेडिकेट केली. एकटीनेच फिनिश लाइनला ठेवलेला पाय नि तिथं कोसळून रडणं… बाबांचा चेहरा डोळ्यांसमोर येणं… हे खूपच टची होतं माझ्यासाठी. तेव्हा आमच्यातलं अंतर खरंच जाणवलं.

करिअरच्या दृष्टीनं विचार करता रिसर्चसाठी तिथं सेटल व्हायला आवडेल. मला शिकवायचीही आवड आहे. कॉलेजमध्ये शिकवायला आवडेलच, पण शाळेतल्या इतिहास शिकवण्याच्या पद्धतीत काही बदल करता येतील का, या विषयाची गोडी लावता येईल का, यावरही विचार सुरू आहे. आपल्या परीने इतिहासाचा मागोवा घ्यायचा, वर्तमानाचा हात धरून ठेवायचा आणि भविष्याचा अदमास बांधायची खूणगाठ मी मनाशी पक्की बांधलेय.

Story img Loader