शेतकरी मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत, अशी महाराष्ट्रात अवस्था असताना, काही वर्षांपूर्वी लखनऊमध्ये एका चोवीस वर्षीय तरुणीनं शेतकरी बनण्याचं स्वप्न बघितलं. नुसतंच बघितलं नाही तर त्यात यशस्वी होऊन अनेक महिलांसाठी रोजगारदेखील निर्माण केला. अनेक महिलांना स्वत:च्या पायावर उभं करण्यासाठी धडपडणाऱ्या या तरुणीचं नाव आहे अनुष्का जयस्वाल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
दिल्ली येथील हिंदू कॉलेजमधून इकॉनोमिक्सचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर कॉलेजमधील सर्व विद्यार्थी कॅम्पस इंटरव्ह्यूच्या तयारीत मग्न होते. मुळातच हुशार असलेल्या अनुष्कानं कॉर्पोरेट जॉब करायचा नाही हे आधीच ठरवलं होतं. तिला स्वत:चं असं काहीतरी करायचं होतं. पण नेमकं काय करायचं हेच ठरत नव्हतं. भाषेची आवड असल्यामुळे दिल्लीतील एका नावजलेल्या कॉलेजात फ्रेंच शिकण्यास सुरुवात केली. पण अल्पावधीतच यात मन रमत नसल्याचं तिला जाणवलं.
हे ही वाचा… निसर्गलिपी – शरद ऋतूतील बहर…
एक दिवस भावाबरोबर गप्पा मारताना तिचा कल लक्षात घेऊन भावानं तिला (हॉर्टिकल्चर) बागकाम विषयक कोर्स करण्याचं सुचवलं. त्यानुसार तिनं नोएडा येथील एका संस्थेमध्ये हॉरटीकल्चरल तंत्रज्ञानचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. हे प्रशिक्षण घेत असतानाच, ज्या गोष्टीचा आपण शोध घेत होतो, ते हेच आहे हे तिला जाणवलं. या तंत्राचा अवलंब करून तिनं आपल्या घरातील गच्चीवर काही फळे, भाज्यांची लागवड केली. ही लागवड चांगलीच यशस्वी झाली.
पुढे बरेच संशोधन आणि अभ्यास करून २०२० मध्ये तिनं एक एकर इतकी जागा शेतीसाठी विकत घेतली. तिथे संरक्षित शेती तंत्रज्ञानाचा वापर करून लागवड करण्यास सुरुवात केली. (संरक्षित तंत्रज्ञान म्हणजे हरितगृह अथवा शेडनेटचा वापर करून तिथे फळे, भाजीपाला पिकविला जातो.) तिच्या लक्षात आलं की, अशा पद्धतीने लागवड केलेल्या भाज्या जास्त चांगल्या तऱ्हेने वाढतात आणि अधिक काळ ताज्यादेखील राहतात.
मग तिने लेट्युस, रंगीत सिमला मिरच्या, काकडी, पार्सले, ब्रोकोली अशी विविध उत्पादने घेण्यास सुरुवात केली. पुढे तयार झालेल्या भाज्या स्थानिक बाजारपेठेबरोबर ब्लिंक इट, बिग बास्केट यांसारख्या व्यावसायिक कंपन्याकडे पुरविण्यास सुरुवात केली. या भाज्यांना बाजारपेठेत चांगलीच मागणी मिळू लागली. त्यामुळे तिनं सहा एकर जमीन विकत घेऊन त्यात भाज्या व फळे लावण्यास सुरुवात केली. कित्येकदा बेभरवशाचे हवामान, पुरेशा प्रमाणात पाणी न मिळणं किंवा अवेळी पडलेला पाऊस यामुळे पिकांचे खूप नुकसान होत असते. परिणामी शेती करण्याकडे लोकांचा फारसा कल नसतो. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन अनुष्कानं संरक्षित लागवड करण्यावर अधिक भर दिला.
एका मुलाखती दरम्यान, या लागवडीचं महत्त्व सांगताना ती म्हणाली, या प्रकारच्या लागवडीमध्ये आवश्यक तितके पाणी, आवश्यक तितके तापमान आणि बाहेरील कीटकांपासून संरक्षण हे सहज शक्य होते. पारंपरिक शेतीचे बेभरवशाचे वातावरण येथे नसल्यामुळे, लागवडीचा जो अंदाज बांधलेला असतो, तो बहुतांशवेळा खरा ठरतो.
हे ही वाचा… वीणा साहुमुडे… शेतकरी आईबापाचं पांग फेडले, गावाचं नावही मोठं केलं…
वर्षभरात कोणत्या काळात कोणकोणत्या भाज्या घ्यायच्या याबाबतचे तिचे पूर्ण नियोजन तयार असतं. परिणामी त्या त्या भाज्यांचा हंगाम सुरू झाला की, अनुष्काच्या ताज्या भाज्या बाजारात येण्यास सज्ज असतात. लखनऊ बरोबरच दिल्ली, वाराणसी येथूनदेखील तिच्या भाज्यांना चांगलीच मागणी असते.
आज या शेतीपासून तिला मिळणारा फायदा हा करोडोच्या घरात आहे. शिवाय ती जी पिकं लावते, त्यापासून दुपटीनं नाही तर तिप्पटीनं पिक निघतं. तिचा हा प्रवास वरवर जरी सहज-सोपा वाटत असला तरी तो तितका नव्हता. मुळातच जेव्हा तिनं सुरुवात केली, तेव्हा ती अवघ्या चोवीस वर्षांची होती. त्यामुळे अशी तरुणी- जिला शेतीची पार्श्वभूमी नाही, नुसतीच पुस्तकातून शेती शिकलेली, ती भाज्यांची लागवड कशी करणार आणि त्या कशा काय विकणार? अशा कुत्सित बोलण्याचा तिला वेळोवेळी सामना करावा लागला. शेतीची बाजारपेठ आजही पुरुषप्रधानच आहे. अशा परिस्थितीत आपल्या ध्येयावर कायम राहत अनुष्कानं न खचता आपलं काम चालूच ठेवलं. याचा परिणाम असा झाला की, तिनं पिकविलेल्या रंगीत सिमला मिरच्यांना आज बाजरपेठेत ‘मॅडम के खेत की मिरची’ अशी एक खास ओळख मिळाली आहे. नुसतीच ओळख नाही तर या मिरच्यांना खास मागणीदेखील असते.
या क्षेत्रात यशस्वी होण्यामध्ये तिचं शेतीवर असलेलं प्रेम याबरोबर तिचा अर्थशास्त्राचा अभ्यास देखील तितकाच कारणीभूत आहे. या जोरावर ती आपल्या शेतीला कॉरपोरेट लुक देण्यास यशस्वी ठरली आहे.
जेव्हा तुमच्याबरोबर तुमच्या इतक्याच तळमळीने काम करणारी टीम असते, तेव्हा तुम्ही निश्चितपणे यशस्वी होता, हे आपल्या यशामागचं गुपित सांगताना एक गोष्ट सहज लक्षात येते की, तिचं हे शेतीप्रेम स्वत:पुरतंच मर्यादीत नसून ते आपल्या सहकाऱ्यांच्या मनातदेखील खोलवर रुजविण्यात ती ती तितकीच यशस्वी ठरली आहे.