आपल्या समाजात स्त्री पुरुष समानता निर्माण करण्यासाठी कित्येकजण प्रयत्न करत आहे. स्त्रियांना शिक्षण मिळावे यासाठी अजूनही प्रयत्न करत आहे. त अनेक स्त्रिया स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्यासाठी पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. तर दुसरीकडी सुशिक्षित स्त्रियांबाबत वादग्रस्त विधाने सर्सारपणे केली जात असल्याचे समोर आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“उच्च शिक्षित नोकरदार महिलांशी लग्न करणे हा कोणत्याही व्यक्तीसाठी “सर्वात वाईट निर्णय आहे, अशी स्त्री म्हणजे “मोठा लाल झेंडा” आहे. असे धक्कादायक मत सूरतमधील शेअर बाजार विश्लेषक विजय मराठे एक्सवर व्यक्त केले. वादग्रस्त विधान केल्यानंतर त्यांना सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यात आले आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे. चार दशलक्षाहून अधिक लोकांनी ही पोस्ट पाहिली असून अनेकांनी असे विधान केल्याबद्दल रोष व्यक्त केला आहे.

ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये चर्चा सुरु झाली. कोणताही भेदभाव किंवा निर्णयाचा सामना न करता लैंगिक समानतेचे महत्त्व आणि महिलांच्या करिअर आणि शिक्षणाचा पाठपुरावा करण्याच्या अधिकारांवर काहींनी प्रकाश टाकला आणि भुरसलटलेले आणि गंभीरपणे लैंगिकतावादी विचार प्रकट करणाऱ्या मतांचा निषेध व्यक्त केला. व्हायरल पोस्टवर अनेकांना कमेंट केल्या आहेत.

“तुम्हाला याची काळजी करण्याची गरज नाही कारण कोणतीही उच्च शिक्षित महिला तुमचा एक सेकंदही विचार करणार नाही,” असे एका फिटनेस प्रशिक्षक FittrwithKJ) वादग्रस्त विधान करणाऱ्या व्यक्तीला उद्देशून म्हटले आहे.

मायकेल रुपम मखल नावाच्या दुसऱ्या वापरकर्त्याने मराठे यांचे मत खोडून काढले आणि म्हटले की, “माझ्या मते हे सत्यनाही, ही गोष्ट व्यक्तिपरत्वे अवलंबून असते. माझी पत्नी सुशिक्षित आणि स्वतंत्र आहे, पण आम्ही एकमेकांचा समान आदर करतो. लग्न करण्यापूर्वी तुम्ही स्त्री-पुरुषांचे स्वभाव आणि मानसिक आरोग्य शोधले पाहिजे.”

हेही वाचा – पन्नाशी ओलांडलेल्या महिला इंन्फ्युएन्सर्स! वयाची चौकट मोडून निर्माण केलं स्वत:चे स्थान, पाहा कोण आहेत त्या?

पण धक्कादायक गोष्ट म्हणजे अनेक पुरुषांनी लैंगिकतावादी वादग्रस्त विधानाशी सहमती दर्शवली. त्यांच्यापैकी एकाने असेही घोषित केले की “शिक्षण एखाद्या व्यक्तीला लोभी, स्वार्थी आणि त्यागहीन बनवते”.

हेही वाचा – “मी वाईट आई आहे का?” Mamaearth Co-founder गझल अलघ यांची भावनिक पोस्ट चर्चेत

शेअर बाजार विश्लेषकाने त्याच्या मतांचे समर्थन करणाऱ्या पुरुषांच्या पोस्ट तातडीने पुन्हा शेअर केल्या आहेत,

एंकदर प्रकरण पाहाता आपल्या आसपास अशी अनेक प्रकरणे पाहायला मिळतात ज्यामध्ये काही पुरुष आणि महिला देखील जोडीदारासह चुकीच्या पद्धतीने वागतात त्यापैकी काही सुशिक्षित असतात तर काही अशिक्षित असतात. अनेक पुरुषांना उच्च शिक्षित स्त्रियांमुळे त्रास आणि समस्यांचा सामना करावा लागला असेल पण त्याच दोष उच्च शिक्षित असण्याचा नाही तर त्यांच्या मानसिकतेचा असतो. स्त्री असो वा पुरुष त्यांच्या चुकीच्या वर्तणूकीचा आणि सुशिक्षित असण्याचा काहीही संबध नाही.त्यामुळे कोणीही आपल्या वैयक्तिक अनुभवानुसार समाजातील स्त्री वर्गासाठी किंवा पुरुष वर्गासाठी एखादे मत तयार करणे चुकीचे आहे. सोशल मीडिया सारख्या माध्यमांवर असे मत व्यक्त करताना विचार करणे आवश्यक आहे याचे भान प्रत्येकाला असले पाहिजे. तुम्हाला याबाबत काय वाटते?

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Surat financial analysts remarks on marrying highly educated working woman as worst decision gets him trolled chdc snk