गौरी गणपतीत आपल्या शहरातील भाजी बाजारात एक फेरी जरी मारली तरी मला रानात फिरल्याचा फील येतो. देवपुजेला, प्रसादाला लागतात म्हणून का होईना अनेक भाज्या आणि फुलं यांनी बाजार गच्च भरलेला असतो. नऊधारी भेंडी, लाल भेंडी याच दिवसात तयार होणारी तवसं म्हणजे मोठ्या हिरव्या काकड्या, चिबूडं, पपनस, अळूची पानं, हिरवा माठ, बुटक्या हिरव्या मिरच्या, लांबलचक पडवळं, घोसाळी, दोडकी, कारली ठायी ठायी दिसतात. पपनसासारखं फळ एरवी दिसत नाही, बाहेरून हिरव्या मोसंब्यासारखं दिसणारं, पण त्यापेक्षा मोठं असं हे फळ आतून गुलाबीसर रंगाचं असतं. संत्र्याच्या कुळात मोडणारी पपनस पोटाच्या विकारात फार उपयोगी.
गौरी गणपती झाले की मन ओढ घेते ते कास पठाराकडे. सरत्या पावसात फुलांनी बहरलेलं पठार पाहणं यासारखं सुख नाही. हिमालयातील व्हॅली ऑफ फ्लॉवर्सचा ट्रेक करणं सगळ्यांनाच जामण्यासारखं नसतं, पण सड्यावर, कातळावर उमलणारं पुष्प वैभव मात्र कोणालाही पाहता येऊ शकतं.
कास हे आता प्रसिद्धी पावलेलं ठिकाणं झालंय, त्यामुळे सगळेच तिकडे धाव घेतात. खरं तर हे पुष्प सौंदर्य आपल्याला अगदी सहजी दिसू शकतं. त्यासाठी थोडी सौंदर्य पारखी नजर असली की झालं. पावसाळ्यात एरवीही केलेला प्रवास आल्हाददायक असतो. गच्च हिरवे डोंगर, अधेमधे दिसणारे छोटे पाण्याचे ओहळ, हलकंसं धुकं हे आपल्याला मोहात पाडतं. जुलै -ऑगस्ट ला दमदार पाऊस झाला की हे हिरवं वैभव अधिकच बहरतं. आता छोटी छोटी फुलं उमलू लागतात. कुठे कारळ्याची फुलं वाऱ्यावर डोलताना दिसतात, तर कुठे तेरड्याचे अनेक रंग आपलं मनोहर रूप दाखवत असतात. आघाड्याचं चंदेरी हिरवट रान त्यात फुललेली तेरडा, सोनावळीची फुलं म्हणजे या निसर्ग चित्रातली कमालच.
हेही वाचा : भारतीय वंशाची आम्रपाली गान आहे US मधील अॅडल्ट वेबसाइट ओन्लीफॅन्सची CEO
मी म्हणतेय त्याचं थोडं आश्चर्य वाटेल कदाचित, पण खरंच सिमेंट आणि डांबरी पक्क्या रस्त्याने जाताना, हायवेवरून प्रवास करतानाही आपण भरपूर फुलं पाहू शकतो. थोडी पारखी नजर असली की झालं. सोनकी, सीतेची आसवं, आयपोमियाच्या फुलांचं गच्च रान हे सगळं सगळं आपण सहज पाहू शकतो. जिथे मातीचा पट्टा दिसेल तिथे गवतफुलांच साम्राज्य पसरलेले दिसतं. थोडं आडवाटेला, कधी गावातून किंवा मग पायवाटेला वळलात तर हे पुष्प वैभव अधिकच गर्द होतं जातं.
गौरी गणपतीत आपल्या शहरातील भाजी बाजारात एक फेरी जरी मारली तरी मला रानात फिरल्याचा फील येतो. देवपुजेला, प्रसादाला लागतात म्हणून का होईना अनेक भाज्या आणि फुलं यांनी बाजार गच्च भरलेला असतो. नऊधारी भेंडी, लाल भेंडी याच दिवसात तयार होणारी तवसं म्हणजे मोठ्या हिरव्या काकड्या, चिबूडं, पपनस, अळूची पानं, हिरवा माठ, बुटक्या हिरव्या मिरच्या, लांबलचक पडवळं, घोसाळी, दोडकी, कारली ठायी ठायी दिसतात. पपनसासारखं फळ एरवी दिसत नाही, बाहेरून हिरव्या मोसंब्यासारखं दिसणारं, पण त्यापेक्षा मोठं असं हे फळ आतून गुलाबीसर रंगाचं असतं. संत्र्याच्या कुळात मोडणारी पपनस पोटाच्या विकारात फार उपयोगी. काकड्या, कलिंगड, मस्कमेलन ही तर बारामाही मिळतात, पण तवशी काकड्या आणि हिरवी चिबूडं ही खास याच दिवसांत मिळणारी फळं. तवसांकडे बघून मला आठवते ती काकडी चोचवून केलेली खमंग काकडी, पातोळे. चिबूड पिकलं की मस्त दरवळत. गणपती विसर्जनाला जाताना प्रसादाच्या फळात याच्या फोडी हव्यातच.
फळ आणि भाज्यांसोबतच फुलांनीसुद्धा बाजार ओसंडून वहात असतो. गणपतीच्या मागे आरास करण्यासाठी जरबेरा, ऑर्किड, ग्लॅडिओलसची फुलं वापरली जातात. ती आता आपल्या अगदी परिचयाची झालीत. पण आपली रानफुलं- जी या बाजारात आपल्याला विनासायास दिसतात ती मुळीच दुर्लक्षित करायची नाहीत. सोनावळीचे छोटे गुच्छ अनेक ठिकाणी दिसतील. गौरीसाठी लागणारा तेरडा हारीने सजलेला सापडेल. याशिवाय केवड्याची हिरवी पिवळी पानं, कणसं, पोसरांची फुलं, क्वचित कुठे दिसली तर कळलावी, निळी अबोली आणि कोरांटी.
काशीला गेल्यावर विश्वेश्वराचं दर्शन घेण्याआधी भैरवाचं दर्शन घेण्याची प्रथा आहे. या भैरवाच्या देवळाबाहेर निळ्या गोकर्णाचे हार विकायला असतात. अतिशय नाजूक असलेली ही छोटी फुलं सुबकपणे हरांत गुंफलेली असतात. बंगालमध्ये फिरताना काली घाटावरच्या बाजारात छोट्या कमळफुलांबरोबर गोकर्णीची फुलंही मी मोठ्याप्रमाणावर बघितली होती. अलीकडे हा निळा गोकर्ण आपल्याकडच्या बाजारातसुद्धा दिसतो.
याव्यतिरिक्त एखाद्या ठिकाणी अस्टरची फुलं आणि सीतेची आसवं म्हणजे रान हळदीचे तुरेही दिसतील. ही झाली फुलांची जंत्री. पण पानांच्या वैभवाला विसरून कसं चालेल? नाजूक पानांची, पण काटेरी शमीपत्रं पुजेला हवीतच .कधीकधी शमीच्या फांद्यांना लगडलेली पिवळी गेंददार फुलंही पाहायला मिळतील .केळीच्या पानांसोबत हळदीची पानं लागणारं. कण्हेरी, दुर्वा, जास्वंद, आघाडा, मालती, बेल, तुळस, हादगा, बोराची पानं, माका, जाई, रूई, अर्जुन, डाळिंबं, काटे रिंगणी, शंखपुष्पी, धोतरा, मारवा अशी किती प्रकारची पानं गणपतीची पत्री म्हणून मिरवताना दिसतील. यात कित्येक वनस्पती आणि फुलं ही रानफुलं आणि रानभाज्या या वर्गात मोडणारी आहेत.
हेही वाचा : अवघ्या ३२ वर्षांची प्रसिद्ध गायिका ठरली १० हजार कोटींच्या संपत्तीची मालकीण, कशी करते कमाई? जाणून घ्या
या सगळ्या औषधी वनस्पती तर आहेतच, पण कास पठारासारख्या ठिकाणी जिथे आपण आवर्जून जाणार असतो तिथे या आपल्याला भेटणार असतात, कारण या आपल्या अवती भवतीच असतात. हेच पुष्प वैभव आपल्या मोकळ्या रानात, काताळावर, सड्यावर, डोंगर उतारावर सजलेलं असतं. आपण थोडं यांना जाणून घेतलं तर वनस्पती शास्त्राची मोठी पुस्तक न वाचता ही पुष्पकुळांची भली थोरली अगम्य नावं लक्षात न ठेवता ही यांना ओळखू शकतो.
हे सगळं आपल्या अवती भवती असतं, ते निरखायच सोडून आपण लांब धाव घेत सुटतो. आधी यांना जाणलं तर याच मंडळींच्या मदतीने आपण कित्येक रानफुलं आणि वनस्पती ओळखायला शिकू, मग कासची सफर अधिकच रंगतदार होईल नाही का?
mythreye.kjkelkar@gmail.com