Tara Bhavalkar : लेखिका डॉ. तारा भवाळकर ( Tara Bhavalkar ) यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. ६ ऑक्टोबर रोजी पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेची बैठक पार पडली. या बैठकीत तारा भवाळकर यांचं नाव निश्चित करण्यात आलं. दिल्ली या ठिकाणी पार पडणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी तारा भवाळकर यांची निवड करण्यात आली आहे. तारा भवाळकर कोण आहेत याची माहिती आपण जाणून घेऊ.

कोण आहेत तारा भवाळकर?

तारा भवाळकर ( Tara Bhavalkar ) या लोकसाहित्याच्या अभ्यासक आहेत. १९७० ते १९९० या कालावधीत तारा भवाळकर या श्रीमती चंपाबेन वालचंद शाह या सांगलीतील महाविद्यालयात डॉ. तारा भवाळकर ( Tara Bhavalkar ) प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. लोकसाहित्य, लोकसंस्कृती यांच्या अभ्यासासाठी त्यांनी संपूर्ण आयु्ष्य खर्ची घातलं आहे.

What Raj Thackeray said?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी सुनावले खडे बोल, “देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्राची राजकीय भाषा इतक्या खालच्या…”
ankita walawalkar reveals marriage plans and talk about future husband
अंकिताचा ‘कोकण हार्टेड बॉय’ कोण आहे? कोकणात करणार…
Dr Tara Bhawalkar elected as President of Delhi Sahitya Sammelan Pune print news
दिल्ली साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डाॅ. तारा भवाळकर यांची निवड
caste census, Rahul Gandhi, Rahul Gandhi in Kolhapur,
मोदींनी कितीही विरोध केला तरी जाती जनगणना करणारच – राहुल गांधी
Madgulkar theater, Prashant Damle,
ग. दि. माडगूळकर नाट्यगृहाबाबत अभिनेते प्रशांत दामले यांची खंत, म्हणाले…
The death of EY employee Anna Sebastian Perayil sparked outrage over company work conditions
EY Employee Death : कामाच्या अतिताणामुळे मृत्यू झालेल्या तरुणीच्या आईसाठी कंपनीच्या अध्यक्षांचं पत्र, म्हणाले, “मी ही एक बाप…”
Rajendra Patil Yadravkar DD Chaugule and Yogesh Rajhans were awarded Karmaveer awards
यड्रावकर, चौगुले, राजहंस यांना कर्मवीर पुरस्कार जाहीर
Vanchit Bahujan aghadi agitation against senior literary figure in Nagpur
नागपुरातील ज्येष्ठ साहित्यिकाच्या विरोधात वंचितचे आंदोलन, निवासस्थानी पोलीस तैनात

लोकसंस्कृतीच्या गाढ्या अभ्यासक अशी तारा भवाळकर यांची ओळख

लोकसंस्कृतीचा अभ्यास, स्त्री मुक्ती चळवळ, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ हे देखील डॉ. तारा भवाळकर यांच्या आवडीचे वि षय आहेत. स्त्रीवादी दृष्टीकोनातून संशोधन करुन लिहिणाऱ्या महत्वाच्या लेखिका म्हणूनही डॉ. तारा भवाळकर यांची ओळख आहे. अलिकडेच त्यांनी सीतायन हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात त्यांनी सीतेच्या वेदना आणि विद्रोह यांचं चित्रण केलं आहे. सांगलीत प्रायोगिक नाट्यसंस्था सुरु करण्यातही तारा भवाळकर यांचा सहभाग होता.

हे पण वाचा- अन्वयार्थ: मातृपरंपरेच्या अभ्यासाचा (जरा उशिराच) गौरव

डॉ. तारा भवाळकर ( Tara Bhavalkar ) यांनी चाळीसहून अधिक पुस्तकं लिहिली आहेत. ‘तिसऱ्या बिंदूच्या शोधात’, ‘महामाया’, ‘आकलन आणि आस्वाद’, ‘लोकपरंपरेतील सीता’, ‘माझिये जातीच्या’, ‘लोकनागर रंगभूमी’, ‘मातीची रुपे’ ही त्यांची पुस्तकं चर्चेत राहिलेली आहेत.डॉ. तारा भवाळकर यांचा जन्म १ एप्रिल १९३९ मध्ये झाला. प्रामुख्याने वैचारिक लेखन करणाऱ्या एक मराठी लेखिका आहेत. प्राध्यापक म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलं आहे. निवृत्त झाल्यावर पुण्यातील ललित कला अकॅडमी आणि मुंबई विद्यापीठ लोककला अकॅडमीमध्ये अतिथी प्राध्यापक देखील होत्या.

डॉ.तारा भवाळकरांना मिळालेले पुरस्कार

  • पुणे विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट प्रबंधासाठी पुरस्कार, १९८२
  • बँक ऑफ बडोदा, सांगलीः कृतज्ञता पुरस्कार, १९९०
  • महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार लोकसंचित ग्रंथासाठी, १९९२
  • अखिल भारतीय दलित साहित्य अकादमी दिल्लीः डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरववृत्ती, १९९४
  • मंगल पुरस्कार, कोल्हापूर विशेष कर्तृत्ववान स्त्रीसाठी साहित्यिक क्षेत्रातील कार्यासाठी, १९९५
  • श्री. ना. बनहट्टी पुरस्कार, पुणे नगर वाचन मंदिर, पुणे मराठी नाट्यपरंपरा शोध आणि अरस्वाद या ग्रंथासाठी, १९९६
  • वि.म. गोखले पुरस्कार महाराष्ट्र साहितत्य परिषद, पुणे मराठी नाट्यपरंपरा शोध आणि आस्वाद या ग्रंथासाठी, १९९६
  • विशेष वाङमय पुरस्कार वाडमय चर्चा मंडळ, बेळगाव माझिया जातीच्या या ग्रंथासाठी, १९९७
  • वाङ्मय समीक्षा प्रथम पुरस्कार वाडमय चर्चा मंडळ, बेळगाव. मराठी नाटक नव्या दिशा नवी वळणे या ग्रंथासाठी, १९९८
  • कै. मालतीबाई दांडेकर जीवनगौरव पुरस्कार साहित्यप्रेमी मंडळ, पुणे, २००४
  • के. प्र. महिला गौरव पुरस्कार, २००५
  • शिवलीला सांस्कृतिक कलामंच, सांगली महिला गौरव पुरस्कार, २००६
  • विशाखा वतने पुरस्कार, नाट्यपंढरी लातूर. आकलन आणि आस्वाद या ग्रंथासाठी, २००६
  • महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे जीवनगौरव पुरस्कार, २००६
  • शरदचंद्र चट्टोपाध्याय पुरस्कारः म. सा. परिषद, पुणे, २००७
  • लोकसंस्कृती, नाट्यसेवा पुरस्कार नाट्य चित्रपट कलाकार तंत्रज्ञ कल्याण ट्रस्ट, सांगली, २०१०
  • विशेष सन्मानवृत्ती महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई, २०११
  • डॉ. निर्मलकुमार फडकुले प्रतिष्ठान साहित्य सेवा पुरस्कार, सोलापूर, २०११
  • सूर्योदय सेवारत्न पुरस्कार, जळगांव, २०१२
  • ज्ञानेश प्रकाशन, पुणे पुरस्कृत शैलजा काळे स्मृती पुरस्कार, २०१३
  • कै. डॉ. अ. का. प्रियोळकर स्मृती पुरस्कार मुंबई विद्यापीठ, २०१३
  • रत्नशारदा पुरस्कार सह्याद्री वाहिनी दूरदर्शन, २०१५
  • यशस्विनी पुरस्कार संवाद, वाई, २०१५
  • साहित्य रत्न पुरस्कार रत्नाप्पाअण्णा कुंभार स्मृतीमंच, जयसिंगपूर, २०१६
  • लोकमत सखीमंच जीवन गौरव पुरस्कार, सांगली, २०१६
  • गार्गी पुरस्कार श्री. सिध्दिविनायक न्यास, मुंबई, २०१६
  • सु.ल. गद्रे साहित्य पुरस्कार साहित्य संघ, मुंबई (मुलुंड), २०१६
  • काकासाहेब खाडिलकर जीवन गौरव पुरस्कार अ.भा. मराठी नाट्य परिषद, सांगली, २०१७
  • पद्मश्री विखे पाटील जीवनगौरव पुरस्कार अहमदनगर, २०२१

या पुरस्कारांनी डॉ. तारा भवाळकर ( Tara Bhavalkar ) यांचा गौरव करण्यात आला आहे. मराठी साहित्यविश्वात मोलाचं योगदान देणाऱ्या डॉ. तारा भवाळकर या आता दिल्लीत होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनात काय भूमिका मांडणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.