साधारण पाऊस सुरू झाला की आज ठिकठिकाणी रानभाज्यांची प्रदर्शनं भरवली जातात, रानभाज्यां चे मोहोत्सव भरवले जातात. पण मग पाऊस काळात येणाऱ्या भाज्या म्हणजेच रानभाज्या असतात का? त्यांची व्याप्ती एवढी मर्यादित असते का? तर असं मुळीच नाहिये. रानभाजी या शब्दातच तिचा अर्थ दडलाय. रानामध्ये, शेतामध्ये, बांधाच्या कडेला, अगदी तण म्हणून उगवणारी भाजीसुद्धा आपलं पोषण करू शकते. तिला रानभाजी म्हटलं जातं.

रानभाज्यांच्या चवीची वैविध्यता थक्क करणारी आहे. घरच्या घरी लावता येतील अशा रानभाज्या आणि कंदांच्या व्यतिरिक्त काही रानभाज्या मी आवर्जून करून पाहिल्यात्यात माझी आवडती झाली ती कर्टूल्याची भाजी. कारल्यासारखी दिसणारी, पण चवीला काहीशी वेगळी अशी ही औषधी भाजी आहे. पाऊसकाळात एकदा तरी ती आवर्जून करावीच.

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
prohibited tobacco products seized, Mhatrenagar in Dombivli, Dombivli, tobacco,
डोंबिवलीत म्हात्रेनगरमध्ये प्रतिबंधित तंबाखुजन्य पदार्थांचा साठा जप्त
kitchen Jugad Tired of removing coconut
नारळाच्या शेंड्या काढून वैतागलात? ‘हा’ सोपा जुगाड एकदा वापरा अन् झटक्यात होईल काम
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”
soil making for plants in glass pot
काचपात्रातील बागेसाठी माती तयार करताना…
In Vashis APMC market vegetable prices dropped due to increased arrivals
आवक वाढल्याने भाज्यांच्या दरात घसरण
what is the reason that Sea fish became expensive
मासे परवडत नाहीत, मत्स्याहारींनी करायचे तरी काय?

हेही वाचा : वारीच्या वाटेवर कर्तव्य अन् जबाबदारीची वीट! विठू- रखुमाईची भेट महिलांसाठी का कठीण?

साधारण पाऊस सुरू झाला की आज ठिकठिकाणी रानभाज्यांची प्रदर्शनं भरवली जातात, रानभाज्यां चे मोहोत्सव भरवले जातात.पण मग पाऊस काळात येणाऱ्या भाज्या म्हणजेच रानभाज्या असतात का? त्यांची व्याप्ती एवढी मर्यादित असते का? तर असं मुळीच नाहिये. रानभाजी या शब्दातच तिचा अर्थ दडलाय. रानामध्ये, शेतामध्ये, बांधाच्या कडेला, अगदी तण म्हणून उगवणारी भाजीसुद्धा आपलं पोषण करू शकते. तिला रानभाजी म्हटलं जातं. शहरात काही ठराविक पालेभाज्या खाल्ल्या जातात, पण बाराही महिने आपण वेगवेगळ्या पालेभाज्या मिळवू शकतो. परसदारी, कुंडीत त्या वाढवू शकतो. पावसाळ्यात जे अनुकूल वातावरण असतं त्यामुळे पालेभाज्या विविध प्रकारच्या आणि मुबलक मिळू शकतात. पण म्हणून इतर वेळी त्या उपलब्ध होणार नाहीत असं नाही. आपण प्रयत्न पूर्वक त्यांची लागवड करूच शकतो.

पण जरा सूक्ष्म विचार केला तर एक गोष्ट लक्षात येईल की अट्टहास करून वर्षभर पाऊस काळात येणार्या भाज्या जोपासण्यापेक्षा ऋतूमानानुसार उगवणाऱ्या रानभाज्यांचा वापर करण्याकडे आपला कल असला पाहिजे.

आजकाल फोडशी, कुर्डू, तांदुळजा, माठ, चिवळ, भारंगी, केना या भाज्या आपण ओळखू लागलोय आणि आवर्जून आणून करूनही बघू लागलोय, पण काही भाज्या या अगदी काही दिवसांसाठी मिळतात. यात टाकळ्याचं उदाहरण देता येईल. टाकळा हा अगदी रस्त्याच्या कडेला सहज उगवलेला आढळतो, पण तो कोवळा असताना त्याची भाजी उत्तम होते. त्याची पानं निबर झाली की मात्र टाकळा खाववत नाही. तोच प्रकार भारंगीचा आणि कुर्डूचा. या बरोबर टेर अळू नावाची जी भाजी आहे ती पावसाळ्यात चार महिने अगदी खडकावर, कपारीत वाढलेली आढळते. एरवी ती मिळणार नाही.

हेही वाचा : Female Genital Mutilation : महिलांच्या खतना प्रथेवरील बंदी कायम; या देशाच्या संसदेने ‘ते’ विधेयक का धुडकावले?

थोडक्यात काय, आपल्याला ज्या भाजीची चव आवडली आहे तिची साद्यंत माहिती घेऊन तिची लागवड करावी. पण हे सगळं करत असताना ऋतूमानाचाही विचार करायला हवा. ऋतूनुसार भाज्या तर लावाव्यातच, पण आपण जर निरीक्षण करत राहिलो तर आपल्या कुंडीतच त्या उगवलेल्या आढळतील. थंडीच्या दिवसात चंदन बटवा- ज्याला बथुआ असं म्हणतात, तो कुंडीत सहज उगवलेला सापडेल. मोहरीचा पालाही असाच सहज मिळेल. पालक, मेथी या तर थंडीत आवर्जून खाव्यात अशा भाज्या आहेत. मटाराचा कोवळा पाला, हरभऱ्याची कोवळी पानं याही रानभाज्यांचं म्हणता येतील. यांची लागवड सहज करता येईल.

रानभाज्या, रानकंद यांच्याबरोबरच रानफुलं हीसुद्धा एक समृद्ध अशी ठेव आहे. शेवग्याच्या कोवळ्या फुलांची भाजी फार सुरेख होते. लालभोपळ्याची मोठी नाजूक फुलं, कुड्याची फुलं, चाईचा मोहर यांची भाजी पावसाळ्यात आवर्जून खावी. चाईच्या मोहराची जी भाजी इतकी सुंदर दिसते. वेलाला आलेला हा मोहर एखाद्या मोत्याच्या घोसाप्रमाणे दिसतो. बघताक्षणी प्रेमात पडावं अशी ही भाजी असते. हलक्या हाताने हा मोहर निवडून घ्यायचा, त्यांचे कोवळे दांडे ठेवायचे, मग मोहर पाण्यात उकळवून, पिळून घेऊन मिरचीच्या फोडणीवर भाजी परतायची. अप्रतिम भाजी होते. अगदी ठराविक दिवसांतच हा मोहर मिळतो. शेवळांची भाजीही अशीच पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मिळते. एकंदर काय पावसाळ्यात मिळणाऱ्या भाज्याही नेमक्या कधी उपलब्ध होतील याचा अंदाज घेऊन त्या करायच्या.

हेही वाचा : Radhika Merchant Lehenga : रोज १६ तास महिनाभर रेखाटत होत्या राधिकाचा शाही लेहेंगा! ‘या’ अवलिया चित्रकार जयश्री बर्मन कोण?

नवरात्रात भारंगीच्या फुलांची भाजी होते, थंडीत मोहाची फुलं, वसंतात कांचनाची फुलं यांचाही भाजी म्हणून उत्तम उपयोग होतो. यावरून सहज लक्षात येईल की रानभाजी बरोबरच रानकंद, रानफुले आणि हो रानफळ भाज्यांचं ही अफाट समृद्ध विश्व आहे. अशाच अजून काही भाज्या जाणून घेऊ पुढच्या लेखात.

mythreye.kjkelkar@gmail.com