मुलाखत : अभिनेत्री तेजस्वी प्रकाश (वायंगणकर)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बॉलीवूड फिल्म्स, ओटीटी आणि टीव्हीच्या ग्लॅमरस जगात मुळातच मराठी भाषक मुलींची वा मराठी कलाकारांची संख्या खूपच कमी आहे. मी तेजस्वी प्रकाश वायंगणकर अर्थात महाराष्ट्रीय असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. पण मराठी चित्रपट मिळण्यासाठी तब्बल १० वर्षं इतका मोठा काळ जावा लागला. मात्र सांगायला आनंद होतोय, की नुकताच रोहित शेट्टीच्या निर्मितीतील माझा पहिला मराठी चित्रपट ‘स्कूल, कॉलेज आणि लाईफ’ प्रदर्शित झालाय. जितेन्द्र जोशी, करण परब यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या माझ्या या चित्रपटाचा दिग्दर्शक विहान सूर्यवंशी आहे.

मी खरंच माझ्या करिअरमध्ये खूपच व्यग्र आहे. माझी शीर्षक भूमिका असलेल्या ‘कलर्स’ वाहिनीवर ‘नागिन’ (सीझन -६ ) ही मालिका ‘टॉप टीआरपीमध्ये आहे ‘नागिन’ डेली सोप असल्याने मी महिन्याचे २६ ते २८ दिवस त्या मालिकेचं शूटिंग करत असते, त्यामुळे अन्य कुठलेही प्रोजेक्ट्स मला घेता येत नाहीत. पण लवकरच माझं बॉलीवूडमध्ये म्हणजे अर्थातच माझ्या पहिल्या हिंदी चित्रपटामध्ये पदार्पण होणार आहे. १० वर्षांपेक्षा अधिक काळ मी टीव्हीसाठी दिल्यानंतर आता मी मोठ्या पडद्यावर स्वतःला पाहणं माझ्यासाठी करियरची दुसरी इनिंग ठरणार आहे. माझा हा महत्त्वाकांक्षी हिंदी चित्रपट कुठला हे सगळ्यांना लवकरच कळेल.

हेही वाचा – गोल्डमन पुरस्काराने सन्मानित अलेस्सांड्रा कोरप मुंडुरूकु आहे तरी कोण?

२०१२ मध्ये माझ्या अभिनयाच्या कारकीर्दीला सुरुवात झाली. मला ब्रेक मिळाला तो ‘लाइफ ओके’ या चॅनलच्या ‘२६१२’ या थ्रिलर शोमध्ये. रश्मी भार्गव हे माझ्या पहिल्यावहिल्या व्यक्तिरेखेचे नाव. त्यानंतर लगेचच २०१३ मध्ये ‘कलर्स’ वाहिनीवर ‘संस्कार – धरोहर अपनों की’ हा शो मिळाला. एकापाठोपाठ टीव्ही शोज आणि अलीकडे ओटीटी माध्यमांवरही मी सतत बिझी असते.

यापूर्वी नोव्हेंबर २०२२ मध्ये मी मुख्य भूमिकेत असलेला माझा मराठी चित्रपट ‘मन कस्तूरी रे’ रिलीज झाला. प्रसिद्ध दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे माझा नायक होता. हा चित्रपट जरी २०२२ मध्ये रिलीज झाला असला तरी माझ्यासाठी नुकताच रिलीज झालेला ‘स्कूल, कॉलेज आणि लाईफ’ हाच खऱ्या अर्थाने मी माझा मराठीतला पदार्पणाचा चित्रपट मानते. याचे एक मुख्य कारण म्हणजे ‘स्कूल, कॉलेज आणि लाईफ’ या चित्रपटाची मला ऑफर २०१९ मध्ये रोहित शेट्टी यांनी दिली होती. शूटिंग २०२० मध्ये सुरू झाले, पण २०२०, २०२१ ही दोन्ही वर्षं आपण सगळे करोनाचा सामना करत होतो. त्यामुळे शूटिंग वेळेत पूर्ण होऊ शकलं नाही. माझ्या २०२२ मधील सगळ्या तारखा टीव्ही – वेब शोजला दिल्या होत्या, तरीही मी तारखा अड्जस्ट केल्या आणि सरते शेवटी २०२२ मध्ये ‘स्कूल, लाईफ… ’ हा चित्रपट पूर्ण केला. रोहित शेट्टीसारख्या दिग्गज निर्मात्याच्या पहिल्याच मराठी सिनेमाची मी नायिका असणे यापेक्षा मोठा आनंद कोणता? हा चित्रपट मी स्वीकारला कारण या चित्रपटाची कथा आणि व्यक्तिरेखाही आवडली.

हेही वाचा – चॉइस तर आपलाच : कम्फर्ट झोन तोडायलाच हवा…

माझा जन्म झाला जेद्दाहला (सौदी अरेबिया ). माझ्या वडिलांचं पोस्टिंग तेव्हा तिथे होतं. पुढे आम्ही मुंबईला स्थायिक झालो. माझ्या आई-वडिलांना संगीताची आवड आहे, मी संगीतात करियर करेन असं त्यांना वाटलं होतं. मी ‘टेली कम्युनिकेशन’मध्ये इंजिनियर झाले, पण अभिनयाची आवड होती, संधीही सहज मिळाली. मी ऑडिशन दिल्या आणि सगळ्याच ऑडिशनमध्ये पास झाले. ‘कलर्स’ वाहिनीच्या बिग बॉस – सीजन १५ मध्ये मी विजेती ठरले. सगळेच शो यशस्वी ठरले. माझं नाव झालं, मानधन वाढत गेलं. मला याचा जास्त आनंद आहे, की आजवरच्या माझ्या प्रवासात माझा कुणी गॉडफादर /मेंटॉर नव्हता. काम करता करता मी शिकले, चुका केल्या, पण त्यातून शिकत गेले. लवकरच मी हिंदीमध्येही पदार्पण करते आहेच. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर काम करण्यासारखा आनंद नाही.

टीव्ही ॲक्टर करण कुंद्राशी माझी मैत्री जगजाहीर आहे, पण सध्या तरी माझं लक्ष फक्त आणि फक्त म्हणजे माझं अभिनयाचं करिअर… इतकंच!

(samant.pooja@gmail.com)