संदीप चव्हाण

आपण आपल्या बागेत फुलांच्या झाडांसोबत भाजीपाला ही कसा पिकवू शकतो हे पाहणार आहोत. शहरात उपलब्ध जागेत बाग फुलवायची म्हणजे जागेची मोठी अडचण असते. कमीत कमी जागेचा अधिकाधिक उपयोग करून घेणं त्यासाठी बागेची मांडणी करणं, तसेच रोपांची कमी जागेत अधिकाधिक लागवड करणं याविषयीची कल्पकता आपणास स्वत: विकसित करावी लागते. ती सरावाने विकसित होत जाते.

The authority is taking possession of houses distributed to 21 people with fake documents
घर असतानाही पात्र झालेल्या २१ झोपडीवासीयांविरुद्ध कारवाई ! सर्व घरे ताब्यात घेणार!
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
raining in Akola district during the winter season
अकोला: ऐन हिवाळ्यात पावसाचा तडाखा; वातावरणातील बदलाने…
Prices will increase due to reduced arrival of chillies Nandurbar news
यंदा लाल तिखटाचा भडका उडणार; मिरचीची आवक घटल्याने दर वाढणार
Tire killer is going to be tested in three important areas of Thane railway station area
स्थानक परिसरात लवकरच ‘टायर किलर’
Entry to Vasota Fort banned for three days Forest Department decision satara
वासोटा किल्ला प्रवेशावर तीन दिवस बंदी; वनविभागाचा निर्णय
tiger sighted again in barshi fear continues among villagers
बार्शीत वाघाचे पुन्हा दर्शन; गावकऱ्यांमध्ये दहशत कायम
Municipal corporation issues notice to 28 constructions violating air pollution control regulations
वायू प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या २८ बांधकामांना पालिकेची नोटीस

कमी जागेचा वापर करताना कुंड्यांमध्ये तीन पायरी पिकाची पद्धत अवलंबावी. जसे की एकाच कुंडीत मातीच्या खाली येतील अशी कुंदमुळे लागवड करावीत. उदाहरणार्थ रताळी, गाजर, मुळा, लाल मुळा, बिट इत्यादी. मूळवर्गीय भाज्यांची लागवड करावी. तर कुंड्यांच्या वरच्या भागात वितभर वाढतील एवढ्या पालक, मेथी, कोथिंबीर, शेपू, लेट्य़ूस, सेलेरी, पार्सली याची लागवड करावी. तर कुंडीच्या मधोमध गुलाब, सदाफुली, झेंडू या फुलझाडांची किंवा फळभाज्याची म्हणजे मिरची, टोमॅटो, वांगी यांची लागवड करावी. जागेचा पुरेपूर वापरही होतो तसेच कुंडीतील पाण्याचे बाष्पीभवनही कमी होतं. लांब व रूंद आकाराचा मोठा पसरट ड्रम किंवा विटांचा वाफा असल्यास चार पायरी पिकपद्धती हे तंत्र वापरावे. त्यात कंदमुळं, भाजीपाला, फळवर्गीय झाडं किंवा फुल झाडं आणि वेलवर्गीय वनस्पतींची लागवड करता येते. जागेचा अधिकाधिक वापर हेच खरे शहरी शेतीचे गुपीत आहे.

आणखी वाचा-पेपरबॅग जीन्स… तरुण मुलींमधला नवीन ट्रेंड!

फळ झाडांची लागवड करताना कुंडी साधारणत: दीड ते दोन फूट खोल असावी आणि तेवढ्याच व्यासाचा वरील पृष्ठभाग असावा. फळवर्गीय झाडांमध्ये आपण शेवगा, केळी, लिंबू, कलमी अंजीर, बोर, अ‍ॅपल बोर, चेरी अशा झाडांची लागवड करू शकतो. ही झाडं वर्षभरात फळं देतात. तर कलमी आंबा, कलमी चिक्कू, सीताफळ, नारळ यास किमान तीन वर्षे वाट पाहावी लागते. तोपर्यंत त्यास वेळोवेळी छाटणी देणे गरजेचे असते. त्या दरम्यान आपण त्यातील मातीत पालेभाज्या लावून उत्पादन घेऊ शकतो.

कमीत कमी जागेचा वापर करताना तेलाचे डबे, पसरट कुंड्या, माठ, किंवा घरातील टाकाऊ पासून टिकाऊ अशा पद्धतीनेही लागवड करता येते. त्याचप्रमाणे मातीबरोबरच घरातील हरित कचऱ्यापासून बनवलेले खतही उपयोगात आणता येते. पायरी पद्धतीने बनवलेले थोड्या जागेत मोठी लागवड करता येते. गच्चीत/ बाल्कनीत बाग साकारताना जागेचे नियोजन महत्त्वाचे असते. त्यामुळे कुंड्यांबरोबर, नर्सरी बॅगही सोयीच्या पडतात. गच्चीत/ बाल्कनीत बाग साकारताना जागेचे नियोजन महत्त्वाचे असते. त्यामुळे कुंड्यांबरोबर, नर्सरी बॅगही सोयीच्या पडतात. मातीच्या पारंपरिक कुंड्यांबरोबरच जुने माठ, रांजण यांचाही झाडे लावण्यासाठी कल्पकतेने वापर करता येतो.

sandeepkchavan79@gmail.com

Story img Loader