बाग फुलवण्यासाठी खताची गरज पडतेडायजेस्टर कंपोस्टिंग ड्रम. . ही गरज घरच्या घरीच कशी पूर्ण करता येईल, हे आपण समजून घेणार आहोत. गारबेज टू गार्डन ही संकल्पना प्रत्यक्षात आणताना किचन वेस्ट व गार्डन वेस्ट यांचे विविधतेने व्यवस्थापन करू शकतो. घरच्या घरी खत तयार करण्याच्या विविध पद्धती आहेत त्यातील एक पद्धत पाहूया. ती म्हणजे डायजेस्टर कंपोस्टिंग ड्रम.

घरच्या घरीच डेव्हिल डायजेस्टर कंपोस्टिंग ड्रम तयार करण्याची पद्धत

या ड्रमचे नाव डेव्हिल डायजेस्टर असे ठेवण्यामागे कारणही तसच आहे. अगदी राक्षसी पद्धतीनं हा गार्डन वेस्ट आणि किचन वेस्ट कंपोस्टींग करतो. हा कपोस्टर तुम्ही सुध्दा घरच्या घरी तयार करू शकता. त्यासाठी ३०० लि. पाण्याची क्षमता असलेल्या प्लास्टिक ड्रमची गरज आहे. या ड्रमच्या तळाला एक इंच व्यासाच एक छिद्र पाडावे. ड्रमच झाकण ७० टक्के कापून घ्यावे. उर्वरित ३० टक्के भाग ड्रममधील खत काढण्यासाठी, ड्रम हाताळण्यासाठी सोयीस्कर होतो. या ड्रममध्ये सुरुवातीला तळाशी अर्धा फूट उंचीचा नारळाच्या सुकलेल्या शेंड्यांचा थर द्यावा. त्यानंतर त्यात परिसरातील सर्व प्रकारचा सुका पालापाचोळा दाबून भरावा. त्यात रोज पाच लिटर पाणी द्यावे. हा कचरा जस जसा खाली खाली बसेल तस तसा सुका पालापाचोळा टाकावा. रोजच्या पाच लिटर पाणी देण्याने पालापाचोळा कुजतो. १ महिन्यानंतर त्यात आपल्या घरातील ओला कचरा, खरकटे अन्न, खरकटे पाणी फरमेंट करून त्यात टाकावे.

helium leaks discovered on boeings starliner
विश्लेषण :अंतराळयानामध्ये हेलियमचा वापर का केला जातो? बोईंग स्टारलाइनरचा पेच हेलियम गळतीमुळे?
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
iPhone 15 and 14 Price cut
Apple iPhone Price in India: iPhone १६ लाँच होताच iPhone 15 आणि iPhone 14 च्या किंमती घसरल्या, जाणून घ्या नवे दर
sebi worry about sme ipo
विश्लेषण: ‘एसएमई आयपीओं’तील तेजी खुपणारी का? त्यावर सेबीची चिंता आणि उपाययोजना काय?
nsa ajit doval to visit russia for brics meeting
अजित डोभाल यांचा ‘ब्रिक्स’ बैठकीसाठी रशिया दौरा; रशिया-युक्रेन युद्धावर चर्चेची शक्यता
Sensex, Mumbai stock market, Sensex fallen,
विश्लेषण : उच्चांकी पातळीवर पोहोचलेला मुंबई शेअर बाजार ‘सेन्सेक्स’ पुन्हा का  कोसळला? पडझड किती काळ सुरू राहणार?
rbi focuses on making upi rupay truly global says rbi governor shaktikanta das
‘यूपीआय – रूपे’च्या जागतिकीकरणावर रिझर्व्ह बँकेचा भर
Navi Mumbai, construction sites, SOP, noise pollution, air pollution, blasting, CCTV, Municipal Corporation, redevelopment, Kailas Shinde, regulations, navi Mumbai, navi Mumbai news
बांधकामस्थळी सीसीटीव्हींचा पहारा, नवी मुंबईतील बांधकाम नियमावली व तक्रार निवारणाबाबतची प्रमाणित संचालन प्रक्रिया जाहीर

फरमेंटेशन कसे करावे

ओल्या कचऱ्याचे फरमेंटेशन कसे करावे हे समजून घेऊ. घरात दोन प्रकारचे किचन वेस्ट तयार होते पहिला प्रकार म्हणजे हिरवा कचरा. उदा. फळाची साल, टरफल, भाजीच्या काड्या इत्यादी. कचऱ्याचा दुसरा प्रकार म्हणजे खरकट अन्न, उदा. पोळी, भात, कोरडी भाजी, पिठले इत्यादी. बरेचदा काही कारणामुळे अन्न उरतं ते सुद्धा या खत प्रक्रियेत टाकू शकतो.

वरील दोनही प्रकारचा ओला कचरा आणि भांडी विसळल्यानंतर निर्माण होणारे खरकटे पाणी हे एका बंद झाकणाच्या डस्टबिनमध्ये तीन-चार दिवस जमा करावे. ते जमा झालेले पाणी नैसर्गिकरित्या फरमेंट होते. असा फरमेट झालेला जाडाभरडा कचरा, खरकटे अन्न व पाणी हे ड्रममध्ये टाका. एक महिन्यानंतर या ड्रम मध्ये दहा एक गांडुळे सोडवी. रोज ड्रमला दिलेलं पाच लिटर पाणी खाली झिरपून येतं. ते झिरपलेले पाणी बागेतील कुंड्यांना द्यावे. हे पाणी म्हणजे पालापाचोळ्याचा अर्क असतो. त्यास ह्युमिक ॲसिड असे म्हणतात. नंतर त्यात गांडुळांची संख्या वाढली की त्यातून वर्मी वॉशही मिळते. खरकटे अन्नाचे पाणी दिल्यामुळे एन्जाईम मिळते. ४-६ महिन्यात त्यात छान व्हर्मी कंपोस्टिंग तयार होते. ते आठवडाभर उन्हात, खुल्या जागेत वाळवावे. ते कुड्यांना पुनर्भरणासाठी तसेच वर खत म्हणून वापरावे. खरकट्या अन्नापासून फरमेंट केलेले पाणी नैसर्गिक जीवाणू वाढीच काम करते. द्रावण शेणपाण्याची कमतरता भरून काढते. अशा रितीने एकाच ड्रममध्ये अर्थात डेव्हिल डायजेस्टर कपोस्टर कचऱ्याचे खत तयार करतो. यात कोणतेही बायो कल्चर वापरण्याची गरज नाही. एका वेळेस साधारणत १०० किलो खत मिळते. तसे हे खत नसतेच ती असते उपयुक्त माती. घरच्या घरी बनवलेली. असा सेटअप शक्यतो अपार्टमेंट व बंगला असल्यास साकारता येतो तसेच तो टेरेस वर बसवल्यास उत्तम… यासाठी फक्त एकदाच गुंतवणूक करणे गरजेचे आहे.