‘देशी लाँग ऑरेंज’, ‘काली देशी’, ‘पंजाब गाजर नं. २’, ‘कल्याणपूर पिली’ या जातीही लोकप्रिय आहेत. ‘शिन कुरोडा’ ही जात खास ‘कंटेनर’मध्ये वाढवण्यासाठी तयार केलेली आहे. ‘लाँग रेड’ या जातीतले गाजर एक फुटापर्यंत वाढू शकते. पण हे गाजर जास्त दिवस जमिनीतच राहिले तर ते कडू लागते. जांभळ्या रंगाच्या गाजराच्या जातीमध्ये पोषक द्रव्ये जास्त असतात. इतर गाजरांच्या जातींपेक्षा यात ‘ॲन्टी ऑक्सिडंट्स’चे आणि ‘ॲन्थोसायनीन’चे प्रमाण जास्त असल्यामुळे यात जास्त पोषणमूल्ये असतात. लाल, नारिंगी गाजरापेक्षा ही अनाकर्षक आहे. त्यामुळे सॅलडमध्ये याचा वापर फार कमी होतो. थंडीत गाजरं येण्यासाठी गाजराचे बी सप्टेंबर/ऑक्टोबरमध्ये कुंडीत किंवा छोट्या प्लॅस्टीक पिशवीत पेरा. नंतर मोठ्या कुंडीत लावा. गाजराची रोपं नाजूक असल्यामुळे सहसा स्थलांतरित करीत नाहीत. गाजराला मुळा आणि बीटापेक्षा जास्त खत लागतं! कुंडी मोठी असेल तर एका वेळेस पाच ते सहा गाजरं चांगली वाढतात.

गाजरामध्ये अनेक पोषकद्रव्ये आहेत. त्यात ‘अ’ जीवनसत्त्व जास्त असते. त्याशिवाय ‘ब’ आणि ‘क’ जीवनसत्त्वे, तांबं, चुना, लोह, पोटॅशियम, फॉस्फरस ही खनिजे असतात. लाल गाजरात ‘ॲन्थोसायनीन’ आणि नारिंगी गाजरात ‘बीटा कॅरोटीन’ हे रंगीत द्रव्य असल्यामुळे ‘रंगीत सॅलड’मध्ये गाजराचा समावेश केला आहे. आपल्या शरीरात ‘बीटा कॅरोटीन’चे रूपांतर ‘अ’ जीवनसत्त्वात होते. त्यामुळे दृष्टी सुधारते, डोळ्याचे किरकोळ विकारही कमी होतात. आपल्या चयापचय क्रियेत अनेक विषारी द्रव्य किंवा घटक तयार होतात, पण ते किंवा त्याची तीव्रता कमी करण्याचा गुण गाजरात आहे. यात असलेल्या घटक द्रव्यांमुळे शरीरातल्या पेशींचा अकाली नाश होत नाही, त्यामुळे अनेक दिवस पेशी कार्यरत राहतात. गाजरामुळे पचनाचे विकारही कमी होतात. पाणी/ द्रव्य जास्त घेण्याची तीव्रता वाढते.

Loksatta viva safarnama Map reading and traveling
सफरनामा: नकाशावाचन आणि भटकंती
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Nisargalipi Fascinating World of Aquatic Plants
निसर्गलिपी : पाणवनस्पतींची मोहक दुनिया
A bull Picked up a four-wheeler vehicle with full of people
बापरे! बैलाने चक्क माणसांनी भरलेली चारचाकी गाडी उचलली; Video पाहून येईल अंगावर काटा
Leopard and dog Fight Dogs Fight With Leopard See Who Will Win In The War Animal shocking Video
“जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं” कुत्र्यांनी अवघ्या १० सेकंदात बिबट्याला फाडून टाकलं; VIDEO पाहून झोप उडेल
Biker performs dangerous stunt
‘यालाच खरं प्रेम म्हणतात का?’ स्टंटच्या नादात प्रेयसीचा जीव घातला धोक्यात; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप
vasai fake police blackmail couples marathi news
वसई: नकली पोलिसाची प्रेमी जोडप्यांकडून वसुली
Makhana Chivda recipes
उपवासाच्या दिवशी फक्त ५ मिनिटांत झटपट बनवा मखाण्याचा चिवडा; पटकन नोट करा साहित्य आणि कृती

हेही वाचा… ग्राहकराणी: पुड्यात एखादं बिस्किट कमी असलं तर?

गाजर जमिनीतून न काढता तसंच वाढत ठेवलं तर जमिनीच्या वर फुलं, फळं येतात. फळातल्या बियांपासून तेल काढतात. तेलाला मातकट, नवीन लाकडासारखा वास येतो. या तेलापासून ‘मॉइश्चरायझर’ करतात.

‘मुळा’ गाजरापेक्षा लवकर वाढतो. तांबडा आणि पांढरा मुळा अशा दोन जाती विशेष लोकप्रिय आहेत. गोल, लहान आणि लांबट अशा दोन तांबड्या मुळ्याच्या जाती आहेत. लांबट तांबड्या मुळ्याला ‘रॅडीश फ्रेंच ब्रेकफास्ट’ असंही नाव आहे. या दोन्हींसाठी सहा इंच खोल ‘कंटेनर’ चालतो. बी फार खोलवर पेरू नका. गाजराचं बी पेरण्यासाठी जे मातीचं मिक्स्चर वापरलं तसंच मुळ्यासाठी तयार करा. एका आठवड्यातच बी उगवून येते. एका ठिकाणी दोन रोपं आली असतील तर एकच ठेवा.

‘पांढरा’ मुळ्यासाठी मात्र एक फूट खोल ‘कंटेनर’ घ्यावा लागतो, कारण तो जास्त खोल जातो. याचंही बी लवकर उगवून येतं, त्यामुळेच गादी वाफ्यात इतर भाज्यांचं बी नक्की कुठे पेरलं आहे हे कळण्यासाठी त्याच्याजवळ मुळ्याचं बी पेरतात. फक्त मुळ्याचंच बी पेरायचं असेल तर त्या शेजारी किंवा एका आड एक मुळा आणि लेट्य़ूसचं बी पेरा. कारण वाढीसाठी ते एकमेकांना पूरक आहेत. लेट्य़ूस ऐवजी काकडी, वाटाणा किंवा नेस्ट्रॅशियम या फुलझाडाचे बी लावा. पण मुळ्याशेजारी बटाटा कधीच लावू नका. कोणत्याच झाडाची वाढ नीट होणार नाही. पांढऱ्या मुळ्याचं बी थोडं उशिरा उगवतं पण तीन आठवड्यातच कुंडी पानांनी भरून जाते.

हेही वाचा… बेकायदेशीर लग्नांमधून जन्मलेल्या अपत्यांना पालकांच्या मालमत्तेत हक्क!

बी पेरल्यानंतर एका आठवड्याने व्हर्मी कंपोस्ट घाला आणि एकवीस दिवसांनी पातळ केलेलं शेणखत घाला. जास्त घालू नका. झाडाला अपाय होण्याची शक्यता असते. एका महिन्यात लाल मुळा तयार होतो. जास्त दिवस मातीत राहिल्यास तो आतून पोकळ होतो. कारण त्यात स्टार्चचे प्रमाण वाढत जाते. पांढरा मुळा मात्र बी पेरण्यापासून ४० दिवसांत तयार होतो. सगळी झाडं तोडू नका, काही तशीच ठेवा, त्याला पांढरी नाजूक फुलं येतील आणि काही दिवसांनी त्याला ‘डिंगऱ्या’ (फळं) येतील. काही डिंगऱ्या झाडावर तशाच ठेवा. या वाळल्या की त्यातलं बी काढून पुढील वर्षीसाठी ठेवा. ‘पूसा रेशमी’ (सप्टेंबरमध्ये लागवड करतात), ‘पूसा देशी’ (ऑगस्ट), ‘जॅपनीज व्हाइट’ (ऑक्टोबर), ‘व्हाइट आयसिकल’ (नोव्हेंबर), ‘पूसा हिमानी’ (डिसेंबर), ‘पूजा चेतकी’ (मार्च ते ऑगस्ट) या पांढऱ्या मुळ्याच्या जाती आपल्याकडे चांगल्या येतात. ‘रॅटव्हेल रॅडीश’ ही जात लांब, पातळ डिंगऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे.

मुळ्यापेक्षा मुळ्याची पानं जास्त पौष्टिक आहेत. त्यात खनिजं आणि ‘अ’, ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात आहेत. मुळ्यात चुना, फॉस्फरस, पोटॅशियम ही खनिजं व काही प्रमाणात ‘अ’, ‘क’ जीवनसत्त्व आहेत. मुळा सारक आहे. अस्थमा, सायनस असणाऱ्यांनी मुळा अवश्य खायला पाहिजे.