‘देशी लाँग ऑरेंज’, ‘काली देशी’, ‘पंजाब गाजर नं. २’, ‘कल्याणपूर पिली’ या जातीही लोकप्रिय आहेत. ‘शिन कुरोडा’ ही जात खास ‘कंटेनर’मध्ये वाढवण्यासाठी तयार केलेली आहे. ‘लाँग रेड’ या जातीतले गाजर एक फुटापर्यंत वाढू शकते. पण हे गाजर जास्त दिवस जमिनीतच राहिले तर ते कडू लागते. जांभळ्या रंगाच्या गाजराच्या जातीमध्ये पोषक द्रव्ये जास्त असतात. इतर गाजरांच्या जातींपेक्षा यात ‘ॲन्टी ऑक्सिडंट्स’चे आणि ‘ॲन्थोसायनीन’चे प्रमाण जास्त असल्यामुळे यात जास्त पोषणमूल्ये असतात. लाल, नारिंगी गाजरापेक्षा ही अनाकर्षक आहे. त्यामुळे सॅलडमध्ये याचा वापर फार कमी होतो. थंडीत गाजरं येण्यासाठी गाजराचे बी सप्टेंबर/ऑक्टोबरमध्ये कुंडीत किंवा छोट्या प्लॅस्टीक पिशवीत पेरा. नंतर मोठ्या कुंडीत लावा. गाजराची रोपं नाजूक असल्यामुळे सहसा स्थलांतरित करीत नाहीत. गाजराला मुळा आणि बीटापेक्षा जास्त खत लागतं! कुंडी मोठी असेल तर एका वेळेस पाच ते सहा गाजरं चांगली वाढतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा