प्रिया भिडे

माती ही जननी आहे. जे बीज मातीत पडेल ते अंकुरणार अन् मातीतून पोषक द्रव्ये शोषणार, पाणी शोषणार, तरारणार, फुलणार अन् फळणार. आपण लावलेलं बीज अंकुरताना पाहणं यासारखा आनंद नाही. पण जर हे बीज आपण लावलं नसेल तर… तर हे तण असतं. कुंड्यांमध्ये वाफ्यामध्ये आपण लावलेल्या वनस्पतीव्यतिरिक्त जे अनाहूतपणे उगवते ते तण. तणामुळे आपण लावलेल्या वनस्पतींच्या अन्नपुरवठ्यामध्ये भागीदार निर्माण होतात आणि बागेच्या सौंदर्यास तणाच्या बेसुमार वाढण्याने बाधा येते. त्यामुळे तणाचे व्यवस्थापन गरजेचे असते.

maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Bad weather in Mumbai Measures against pollution Mumbai print news
मुंबईत निवडणुकीपर्यंत प्रदूषणाचा त्रास; मनुष्यबळाअभावी पालिकेची यंत्रणा हतबल
Onion producers suffer due to losses consumers suffer due to price hike nashik news
नुकसानीमुळे कांदा उत्पादक, तर दरवाढीमुळे ग्राहक त्रस्त; कांदा शंभरीवर
soil making for plants in glass pot
काचपात्रातील बागेसाठी माती तयार करताना…
In Vashis APMC market vegetable prices dropped due to increased arrivals
आवक वाढल्याने भाज्यांच्या दरात घसरण
banana cultivation farmer kiran gadkari tried different experiment for banana farming
लोकशिवार: आंतरपिकातील यश !
Increase in cotton soybean prices print politics news
कापूस, सोयाबीनच्या दराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; निवडणूक काळात शेतकऱ्यांमध्ये रोष

तणामध्ये गवताचे प्रकार, एकदलीय, द्विदलीय तणे असे असतात. स्थानिक वनस्पती असतात, तर काही परदेशी. आपल्या बागेत नेहमी आढळणारे तण केनी, हरळी, घोळ, आंबोशी, राजगिरा, माठ, सटायव्हा, नागरमोथा, भुईआवळा, एकदांडी असे अनेक प्रकारचे आहे. जमिनीचा कस कमी झाला व त्यातील सेंद्रिय कर्ब कमी झाला की तण माजतात. त्यासाठी जमिनीत सेंद्रिय पदार्थ वा सेंद्रिय मातीची भर घालणे गरजेचे असते. पालापाचोळा, भुसा, कोकोपीठ यामध्ये सेंद्रिय कर्ब भरपूर असते. जमिनीत खूप पाणी मुरल्यास जमीन घट्ट होते व तण वाढू लागते. जमीन भुसभुशीत ठेवण्यासाठी सेंद्रिय मातीचा उपयोग होतो व या मोकळ्या मातीमुळे तण उपटणे सहज शक्य होते.

छोट्या कुंड्यांमध्ये झाडे असल्यास वेळोवेळी खुरपणी केल्यास तणाचा त्रास होत नाही. वाफ्यांमध्ये भाजीपाला लावण्यास मुख्य भाजीची उगवण झाल्यावर सुरुवातीलाच खुरपणी करावी. तणाची छोटी रोपं काढून मातीत कुजण्यास टाकावीत. यामुळे नत्र मिळेल. यास बाळ कोळपणी म्हणतात. भाजीपाल्याची रोपं वाफ्यात व ड्रममध्ये लावल्यास त्याच्या आजूबाजूने वर्तमानपत्राचे आच्छादन करावे; ज्यामुळे जमिनीस सूर्यप्रकाश मिळणार नाही व तण उगवणार नाही. हा सोप्या बीन खर्चाचा उपाय पुढील श्रम वाचवतो.

बाळ कोळपणी करायला वेळ झाला नाही तर तण झपाट्याने वाढतात, त्यास फुलं येऊन बी धरते, जे वाऱ्यावर उडून इतस्तत: पसरते व रुजते. त्यामुळे तण काढून बादलीत घालावेत. ते बुडतील इतके पाणी बादलीत भरावे, चार-पाच दिवसांनी तण कुजतील. हे पाणी ‘एनर्जी ड्रिंक’ म्हणून झाडांना द्यावे. कुजलेले तण गांडुळांना खायला द्यावेत. या पद्धतीमुळे बीजप्रसार होऊन तण उगवण्याचे प्रमाण कमी होते. स्थानिक वनस्पतीची विविधता निसर्गातील किडींचे, जमिनीच्या कसाचे संतुलन राखते, पण आपल्याला आपण निवडलेल्या वनस्पती हव्या असतात व मूळच्या वनस्पती ‘तण’ वाटतात. या तणांचा उपयोग करून मातीतील पोषक द्रव्यांचे चक्र सांभाळता येते. तणांमध्ये नत्र, स्फुरद, पालाश व इतर सूक्ष्मद्रव्ये असतात. जमिनीचा कस वाढल्यास हरळी, नागरमोथा हे आक्रमक तण येण्याचे प्रमाण कमी होते. तणांची ओळख करून घेतल्यास अनेक भाज्या मिळू शकतात.

गुलाबी काड्यांचा, नाजूक पानांचा घोळ व एक जाडसर पानांचा पिवळ्या फुलांचा घोळ (पोर्टलाक्क) असतो. कांदा, लसूण, मिरची घालून याची भाजी छान होते. आंबुस असल्याने गूळ घालून ही भाजी छान होते. याच्या फुलांवर मधमाश्या आकर्षित होतात व आपल्या बागेला फायदा होतो. राजगिरा, माठ, चंदनबटवाची पालेभाजी छान होते. कोवळी डेरू खुडली तर बी धरत नाही व परत उगवण्याचे प्रमाण कमी होते. केनीच्या पानांची भजी छान होतात. टाकळ्याच्या पानांची भाजी छान होते व याच्या मुळांवरील गाठी जमिनीत नत्राचे प्रमाण वाढवतात. तणनाशके वापरून जमिनीत विष मिसळण्यापेक्षा जमिनीचा कस राखणे, तण वेळीच मुळांपासून काढणे, जमिनीवर पाला पसरणे हे उपाय करावेत. खाद्योपयोगी तण असल्यास वापर करणे हे शाश्वत उपाय करणे योग्य आहे.

नाजूक निळ्या फुलाची, लांब गोल पानाची केनी अनाहूत पाहुण्यासारखी बागेत येते. पण पाने खुडून, डाळीच्या पिठात बुडवून तेलात सोडली की पानाची भजी टम्म फुगतात. ही भजी तोंडात अक्षरश: विरघळतात अन् केनी बागेत आल्याचा आनंदच होतो. असे हे तण त्यांची माहिती करून घ्या, उपयोग जाणून घ्या. मग व्यवस्थापन होईल सोपं.