एका ट्रेमध्ये पेबल्स टाकून त्यावर कुंड्या ठेवल्या आणि पेबल्सवर पाणी घातलं तरी झाडांना चांगली आर्द्रता मिळते. कुंडीतला वरचा थर कोरडा झाल्याशिवाय झाडाला पाणी घालू नका. कुंडीत पाणी जास्त घालू नका. कुंडी ठेवलेल्या पाण्याचा निचरा व्यवस्थित होत आहे ना याकडेही लक्ष द्या. घातलेले पाणी मुळांपर्यंत पोचले आहे की नाही याची खात्री करण्यासाठी बांबूची काडी, खराट्याची काडी घेऊन कुंडीच्या कडेने मातीत खालपर्यंत खोचून बघा, ती ओली झाली तर झाडाला खालपर्यंत पाणी गेलेलं आहे याची खात्री होईल. काही इनडोअर प्लॅन्ट्स’च्या पानांवर पाणी साचलं तर पानं कुजतात, त्यामुळे पाणी घालताना थोडी काळजी घ्यावी लागते.

काही झाडांना विशेषत: फुलं आल्यानंतर पाणी कमी लागतं, तेव्हा कुंडी ठेवलेल्या ताटलीत थोडं पाणी घातलं तरी झाडाची मुळं पाणी शोषून घेतात, पण कुंडी सतत पाण्यातच राहणार नाही याची खबरदारी घ्या. ‘ब्रोमेलियाड्स’ सारख्या काही ‘इनडोर्अस’च्या पानांवर पाणी राहिलं तरी पानं कुजत नाहीत, अशा झाडांच्या शेंड्यांवर पाणी घातलं तर झाड जास्त टवटवीत दिसतं. झाडाची पानं एकाएकी गळून पडायला लागली तर ते झाड टवटवीत होण्यासाठी थोडी काळजी घ्यावी लागते. प्रथम झाडाला पाणी, पातळ खत घालून एक-दोन दिवसात ते टवटवीत होते आहे का ते बघावे. ते न झाल्यास, कदाचित मुळांभोवतालची माती कुंडीच्या कडांपासून सुटलेली असेल.

Crowds flocked to center area of pune on Friday night to watch the spectacle
पुणे : मध्यभागातील रस्ते गर्दीने फुलले! सलग सुट्यांमुळे सहकुटंब देखावे पाहण्याचा आनंद
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
betel leaves expensive, betel leaves,
विड्याची पाने का महागली ? जाणून घ्या, अतिवृष्टी, संततधारेचा परिणाम काय?
Bad sleep Routine can increase heart disease risk losing one hour of sleep takes four days to recover
झोपेचं रुटीन बिघडलंय! फक्त एक तासाची कमी झोप तुमच्या आरोग्यासाठी ठरेल धोक्याची घंटा? तज्ज्ञांनी केला खुलासा
simple tips the car will look like new even in rainy season
‘या’ सोप्या टिप्सच्या मदतीने पावसाळ्यातही कार दिसेल नव्यासारखी
Gold Silver Price
Gold-Silver Price: ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद! दरवाढीनंतर सोन्याचे भाव झालेत कमी, १० ग्रॅमची किंमत जाणून घ्या
These simple tips will help you keep your bike
पावसाळ्याच्या दिवसात बाईक स्वच्छ ठेवण्यासाठी ‘या’ सोप्या टिप्स करतील मदत
Pune, respiratory disorders, humidity, asthma, allergies, fungal growth, health experts, Sassoon Hospital, health news
पावसाळ्यातील ओलसर हवेमुळे आजारांना निमंत्रण! जाणून घ्या कशी घ्यावी काळजी…

हेही वाचा… लस्ट स्टोरीज् – २: घरमालकीण आणि कामवालीच्या आयुष्यातली शृंगारकथा लक्षवेधी!

अशावेळेस कुंडीतून झाड बाहेर काढून त्यात पुन्हा नवीन खत-माती घालून त्यात झाड लावल्यास ते चांगले वाढेल. किंवा धारदार चाकूने कुंडीतली वरवरची माती मोकळी करून घ्यावी, मात्र मुळांना धक्का लागणार नाही याची काळजी घ्या. नंतर कुंडी पाणी भरलेल्या बादलीत ठेवा, कुंडीतल्या मातीत बुडबुडे येतील, ते येण्याचे थांबले की कुंडी बादलीबाहेर काढा, तोपर्यंत पानांवर पाण्याचा फवारा मारा. ज्यादा झालेलं पाणी कुंडीतून काढून टाका. झाड पुन्हा ताजंतवानं होईल. पण हे असंच वारंवार होत राहिलं, तर मातीचं मिश्र बदलून पुन्हा त्यात झाड लावा. झाड दुसऱ्या कुंडीत पुन्हा लावायचे झाल्यास झाडाला एक दोन दिवस पाणी देऊ नका, माती पूर्ण कोरडी होऊ द्या. त्याचवेळेस नवीन कुंडी माती – खत मिश्रणाने पूर्ण भरून त्याला दोन-तीन दिवस पाणी द्या.

हेही वाचा… गच्चीवरची बाग: घरातल्या झाडांची काळजी

नंतर पहिल्या कुंडीतून झाड अलगद काढून त्यात लावा. झाडाला पाणी दिले नसल्यामुळे कुंडी उलटी केली की मुळासकट झाड कुंडीतून बाहेर येईल. झाडाच्या फांद्या वेडय़ावाकडय़ा वाढल्या असतील तर काही फांद्या अशा तऱ्हेने कापा, की झाडाचा मूळ आकार तसाच राहील किंवा लांब दोरा घेऊन सर्व फांद्या एकत्र राहतील, फुलं येणाऱ्या जागेच्या खाली दोरा बांधा. गावाला जायच्या अगोदर झाडाला पाणी घाला आणि वरून प्लॅस्टिकची पिशवी बांधा, जेणेकरून मातीतल्या पाण्याची वाफ होऊन प्लास्टिकमुळे पुन्हा पाणी होऊन झाडाला मिळेल किंवा एखादी पाण्याची बाटली भरून तिच्या बुचाला एक छोटे भोक पाडून ती उलटी करून मातीत खोचून ठेवा, किंवा मोठ्या बाटलीत पाणी भरून त्यात कॉटनच्या कापडाची चिंधी घालून तिचे एक टोक कुंडीत सोडा. ही बाटली उंचावर ठेवा, किंवा कुंडी बाथरूममध्ये ओल्या कापडी तरटावर ठेवा. घरात वेली वाढवायच्या असतील तर बांबूच्या काटक्या आणून त्यांना वेगवेगळे आकार द्या आणि त्यावर वेली वाढवा म्हणजे घराची शोभा नक्कीच वाढेल.