आपल्या बागेत होणाऱ्या किडीचे प्रकार आणि कीड नियंत्रण कसं करावं हे पाहणार आहोत. बागेत ठरावीक कीड येत असतात. बरेचदा कीड तिच असते पण तिचे रूप, पिढी, दर पिढी बदलेली असते. तसचं बागेतील कीड नियंत्रण हे विविध पद्धतीने करता येते. त्यासाठी काळजी करत बसण्यापेक्षा छोट्या छोट्या कृती करणं गरजेचं आहे. जसे स्वच्छता, कुंड्यांची जागा बदलवणं, बहुविध पीक पद्धत वापरणं, तीव्र गंधाच्या औषधी वनस्पतीची लागवड करणं. कीड वेचून फेकणं, पक्ष्यांसाठी दाणा-पाण्याची सोय करणं, बागेला पाण्याची आंघोळ घालणं, गोमूत्र फवारणी करणं, साबणाचं पाणी फवारणं, लसून मिरची तंबाखूची फवारणी करणं आणि निबोंळी अर्क अशा विविध पदार्थांचा, तंत्राचा वापर करता येतो.

स्वच्छता…

बागेत कीड नियंत्रण करणं हे सोपं काम आहे. त्यासाठी बागेची वेळोवेळी स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे. त्यासाठी झाडलोट करणं, ‘बागेतील काने कोपरे स्वच्छ राहतील आणि कुंडीखालील जागा झाडून काढता येतील अशा उंचीवर कुंड्या ठेवणं हे बागेच्या स्वास्थासाठी गरजेचं असतं. तसेच प्लास्टिक बॅग, कुंड्यांची बाहेरील कडा, खालील तळ या ठिकाणी कीड निवारा करतात. त्यासाठी कुंड्यांची अधून मधून तपासणी करावी. त्यासाठी कुंडी, वापयातील विटांची स्वच्छता ठेवणे गरजेचं आहे.

Graded Response Action Plan project to monitor air pollution Pune news
पिंपरी: हवा प्रदूषणावर आता ‘ग्रॅप’ची नजर; प्रदूषण करणारे उद्योग…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
mmrda acquire farmers lands in 124 villages of uran panvel and pen for third mumbai
भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांची एकजूट; उरण, पनवेलमधील १२४ गावे संपादित करण्याची अधिसूचना
Solapur jowar crops loksatta news
सोलापूर : ज्वारीच्या कोठारात यंदा ज्वारीचा पेरा निम्म्यावर, लांबलेल्या पावसाचा परिणाम
Property tax defaulters properties seized in Titwala
टिटवाळा येथे कर थकबाकीदारांच्या दोन कोटीच्या मालमत्तांना टाळे, पालिकेच्या अ प्रभागाची कारवाई
Illegal building on road in Nandivali Samarth Chowk demolished
मानपाडा-बाह्यवळण रस्ता ते कोपर रस्त्यामधील अडथळा दूर
Thane , government projects, dust, health,
सरकारी प्रकल्पांमुळेच धुळधाण, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता
clean up marshal action against those responsible for littering
क्लीन अप मार्शलकडून अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा; पालिकेच्या तिजोरीत आठ महिन्यांत ३ कोटी दंड जमा

हेही वाचा – ‘द केरला स्टोरी’: स्त्रियांच्या आकड्यापेक्षा वेदना महत्त्वाच्या नाहीत का?

कुंड्याची जागा बदलवणे…

बागेत एका कुंडीवर कीड झाली की ती दुसऱ्या कुंडीवरील वनस्पतीवर स्थलांतरीत होतात. आपल्या निरीक्षणात रोपाला कीड लागली आहे असे लक्षात आल्यास त्या कुंडीची जागा बदलावी. म्हणजे त्यावरील कीड नियंत्रित होईपर्यंत किडीचा प्रादुर्भाव झालेल्या कुंडीपासून इतर कुंड्यांचं संरक्षण करता येतं.

बहुविध पीक पद्धत वापरणे…

कीड नियंत्रणासाठी एकाच रेषेत सारख्याच वनस्पतीच्या कुंड्या नसाव्यात. वेगवेगळ्या वनस्पतीच्या कुंड्या आलटून पालटून ठेवाव्यात, तसेच बहुविध पीक पद्धत वापरावी. जसं एकाच वापयात वांगी लागवड केली तर सारख्याच वनस्पतीवर कीड लवकर पसरते, कारण ती वनस्पती त्यांच्या ओळखीची, सारख्याच चवीची आणि सरावाची असते.

तीव्र गंधाच्या औषधी वनस्पतीची लागवड करणं

तीव्र गंधाच्या औषधी वनस्पतीची लागवड करणं हे बागेचे कीड नियंत्रण करण्याचा निसर्गपूरक मार्ग आहे. बागेत तुळस, कडीपत्ता, गवती चहा, पुदिना, पेपरमिंट, इन्सुलीन अशा वनस्पतींची लागवड करावी. त्याने कीड दूर राहते. अशा झाडांच्या संपर्कात असलेली इतर झाडेही निरोगी राहतात.

कीड वेचून फेकणे..

बागेत बरेचदा गोगलगायी, पाने, फळे खाणाऱ्या अळ्या तयार होतात. आपले निरीक्षण चांगलं असेल तर त्या पटकन आपल्या नजरेस पडतात. त्या वेचून दूरवर फेकून देणं हा एक पर्याय आहे.

हेही वाचा – झोपू आनंदे : निद्रेचे घड्याळ

पक्ष्यासाठी दाणा-पाण्याची सोय…

बागेत पक्षासाठी दाणा पाणीची व्यवस्था करावी. दाने व पाणी मिळायला लागल्यानंतर बागेत पक्ष्यांचा वावर वाढतो. आपल्यापेक्षा बागेतील कीड त्यांच्या लवकर लक्षात येते. त्यांच्यासाठी ते चविष्ठ अन्न असतं. त्यामुळे पान खाणारी अळीचे ते लवकरच भक्षण करतात.

बागेला पाण्याची अंघोळ…

बागेतील झाडांना पाण्याच्या पाईपने पाण्याची हलकीशी फवारणी करावी. त्यानं झाडांवरची धूळ निघून जाते. झाडांनी स्वतःचे अन्न स्वतः तयार केलं तर रोगप्रतिकार शक्तीही वाढते. तसेच बागेला धुळीपासून होणारी कीड नियंत्रित होते.

Story img Loader