संदीप चव्हाण

हिवाळा, पावसाळा, उन्हाळा या ऋतूंत बागेतील झाडांची पाण्याची गरज ही वेगवेगळी असते. पावसाळ्यात पाऊस पडतच असतो. २ ते ३ दिवस अंतराने येणारा पाऊस, हवेतील तापमान, याचा विचार करूनच मग झाडांना पाणी द्यावे. पाऊस सलग व भुरभुर येत असल्यास व हवेत आर्द्रता असल्यास झाडांना पाण्याची गरज पडत नाही. भिजपावसात बागेतील जमीन, कुंडीतील माती चांगली भिजते, तर हिवाळ्यात सहसा एकदाच पाणी द्यावे. सकाळी, दिवसा दिलेले पाणी हे झाडांना अपायकारक ठरण्याची शक्यता असते, कारण दिवसभर वातावरणातील उष्णता वाढलेली असते. त्यामुळे कुंड्या, वाफे, जमीन तापते. आत गरजेपेक्षा अधिक वाफसा तयार झाल्यामुळे मुळ्या सडतात. हिवाळ्यात पाणी सायंकाळी द्यावे म्हणजे झाडे ही निवांतपणे पाणी ग्रहण करतात, तर उन्हाळ्यात दोनदा पाणी द्यावे. सायंकाळचे पाणी हे थोडे थांबून व जास्तीच द्यावे.

Prices will increase due to reduced arrival of chillies Nandurbar news
यंदा लाल तिखटाचा भडका उडणार; मिरचीची आवक घटल्याने दर वाढणार
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
The work on six water tanks of Pune Municipal Corporation is still not complete Pune print news
सहा टाक्या, तरी पाणी मिळेना! पुण्यातील प्रकार
Entry to Vasota Fort banned for three days Forest Department decision satara
वासोटा किल्ला प्रवेशावर तीन दिवस बंदी; वनविभागाचा निर्णय
Air quality in Borivali and Malad is dangerous
बोरिवली, मालाडची हवा धोकादायक, महिन्यातील जवळपास वीस दिवस बहुतेक भागांत वाईट हवेची नोंद
Income Tax , salary , Finance Minister,
पगारदारांच्या ‘इन्कम टॅक्स’मध्ये कपात? क्रयशक्तीत वाढीसाठी अर्थमंत्र्यांकडून उपाय शक्य
red sanders smuggling
Pushpa Box Office Collection : चंदन तस्करीवर बेतलेल्या ‘पुष्पा’नं कमवले १५०० कोटी; पण खऱ्याखुऱ्या रक्तचंदनाला मात्र ग्राहकच नाही
Water supply to Ulhasnagar Ambernath Badlapur closed for 24 hours
बारवीच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात दुरूस्ती; उल्हासनगरसह अंबरनाथ, बदलापुरातील पाणी पुरवठा २४ तास बंद

बागेला, कुंड्यांना रोज पाणी दिल्याने ती काहीशी आळशी म्हणजे त्यांची वाढ मंदावलेली जाणवते. रोजच्या वेळापत्रकात खूप सारा बदल न करता फक्त आठवड्यातून एकदा एका वेळचे पाणी बागेला देऊ नये. पाण्याची देण्याची पाळी साधारणत: सायंकाळी तोडावी. सकाळी बागेची पाहाणी करून सकाळी मात्र पाणी द्यावे. पाणी तोडल्यामुळे झाडांवर पाण्याचा ताण पडतो. मातीत असलेला ओलावा कमी होतो. झाडांची प्रतिकार क्षमता वाढते. मुळे सक्रिय होतात.

आणखी वाचा-गच्चीवरची बाग: बागेला पाणी देण्याच्या पद्धती…

अतिलाड टाळा

रोजचा नेम म्हणून आपण रोज झाडांना पाणी देतो. पण, हे पाणी झाडांसाठी घातक ठरते जसे अतिलाडामुळे मुलं बिघडतात तशीच अति पाण्यामुळे झाडांचे आरोग्य बिघडते. झाडांच्या या पाण्याच्या मानसशास्त्राला समजून घेणे गरजेचे आहे. कारण पाणी हे माध्यम असे आहे की ते झाडांवर परिणाम तर करतेच पण मातीचे आरोग्य ही घडविण्यात मदत करते. कुंडीतील झाडांना मिलीबग येणे, पाने कर्ली होणे, अकाली झाडे कोमेजून जाणे हे अति पाण्यामुळेच होते. तर कधीकधी अति पाण्यामुळे झाडांना योग्य मोसमात फळे, फुले न लागणे हे सुद्धा घडते.

आणखी वाचा-गच्चीवरची बाग- कमी जागेतील लागवड

पाण्यात नत्राचे प्रमाण अधिक असते पाण्याद्वारे नत्र हे अधिक झाडांच्या पानांमध्ये साचलं की त्यांच्या अन्न वाहून नेणाऱ्या नसात नत्र साठते. तेथे पुढील प्रक्रिया होत नाही त्यामुळे त्या गाठी अडथळा काढून टाकण्यासाठी मिलीबग, पिठ्या येतात व जर त्यांची वाढवा असल्यास तेथे पाने मुरडतात. पाने आकसली गेली की त्यांची अन्नप्रक्रिया होत नाही मग पुढे झाड आजारांना बळी पडते. अधिक पाण्यामुळे कुंडी ओली राहते. त्यामुळे तेथे विषाणूंची वाढ होते. खरंतर वर्षातून एकदा कुंड्यांचील माती एकदा पूर्णत: वाळवून घेणे गरजेचे आहे. म्हणून तर आपले पूर्वज उन्हाळ्यात शेती नांगरून ठेवत असत. तसेच वर्षा, दोन वर्षातून एकदा कुंडी रिपॉटिंग करणे म्हणजे माती बदलवणे किंवा अदलाबदल करणे गरजेचे असते.

sandeepkchavan79@gmail.com

Story img Loader