थायलंडचे राजे वजिरालोंगकॉर्न यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांची धाकटी मुलगी राजकुमारी नारीरताना हिची सैन्यात मेजर जनरल म्हणून नियुक्ती केली आहे. राजकुमारी सिरिवन्नावरीच्या नियुक्तीमुळे अनेक लोक नाराज आहेत. तिच्याकडे कोणताही लष्करी अनुभव नसतानाही सैन्यात एवढे मोठे पद दिल्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. पण सिरिवन्नावरी नेमकी करते काय? घ्या जाणून
सिरीवन्नावरी नारीरतना ही थायलंडचे राजे वजिरालॉन्गकोर्न व त्यांची पूर्वाश्रमीची पत्नी सुजारीनी विवचरावोंगसे यांची एकुलती एक मुलगी आहे. सिरिवन्नावरीचा जन्म ८ जानेवारी १९८७ रोजी झाला. तिला चार भावंडे आहेत. १५ जून २००५ रोजी तिचे आजोबा राजा भूमिबोल अदुल्यादेज यांच्या शाही आदेशानंतर सिरीवन्नावरीला राजकुमारीचा दर्जा देण्यात आला.
राजकुमारी सिरिवन्नावरीने चुलालॉन्गकॉर्न विद्यापीठातून कला शाखेची पदवी प्राप्त केली. तसेच फ्रान्सची राजधानी पॅरिस येथील प्रसिद्ध फॅशन इन्स्टिट्यूटमधून फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेतले आहे. शिक्षणानंतर सिरिवन्नारीने काही काळ फॅशन डिझायनर म्हणून कामही केले. तिने स्वतःचा ब्रँड सिरिवन्नावरी लॉन्च केला. सिरिवन्नावरीला फॅशन डिझायनिंगमध्ये नेहमीच रस होता आणि म्हणूनच तिने या क्षेत्रात करिअर करायचे ठरवले.
राजकुमारी सिरिवन्नावरी थायलंडमधील सर्वात ग्लॅमरस महिला म्हणून ओळखली जाते. फॅशन डिझायनर होण्यापूर्वी ती बॅडमिंटनपटूही होती. २००५ साली दक्षिण पूर्व आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांच्या संघाने सुवर्णपदक जिंकले. सिरीवन्नावरी घोडेस्वारीचाही आवड आहे. वयाच्या नवव्या वर्षापासून तिने घोडस्वारी करण्यास सुरुवात केली. २०१३ आणि १०१७ साली झालेल्या एसईए क्रिडा स्पर्धेत सिरिवन्नावरीने थाई घोडस्वार क्रिडा संघाचे प्रतिनिधीत्व केले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, सिरीवन्नावरी जगातील सगळ्यात श्रीमंत राजकुमारींपैकी एक आहे. तिच्याकडे एकूण ३६७ कोटी रुपयांची संपत्ती आहे. तसेच तिच्याकडे अनेक दुर्मिळ हिरे आणि रत्नाचा साठा आहे. सिरिवन्नावरीचे वडील थायलंडचे राजा, वजिरालोंगकॉर्न हे देखील जगातील सर्वात श्रीमंत राजेंपैकी एक आहेत, त्यांची एकूण संपत्ती ३० अब्ज डॉलर ते ७० अब्ज डॉलर दरम्यान आहे.