नीता जिन्यात पोहोचली तर स्वत:च्या घराचं दार आपटून बाहेर पडलेली शेजारच्या सुचेताची उर्वी तिला जवळजवळ धडकलीच. थोडी अवघडून तक्रारीच्या सुरात ती नीताला म्हणाली, “सॉरी मावशी, पण माझ्या आईला जरा समजाव ना गं. ती आणि तिचे नातलग माझ्याबद्दल बोलायचं थांबवतच नाहीत. आईसुद्धा घरातली प्रत्येक गोष्ट सगळ्यांना सांगत सुटते”, उर्वीकडे हसून पाहत नीतानं मान डोलावली.

सुचेता आणि उर्वीची रोजची वादावादी अनेकदा नीतासमोर होत असली, तरी मायलेकींच्या भांडणात ती पडायची नाही. हल्ली मात्र उर्वीची जाडी वाढलेली, चिडचिड वाढलेली आणि त्यात PCOD चं निदान झाल्यावर वादही वाढले होते.

Ajit Pawars trusted Bhausaheb Bhoir rebelled deciding to contest Chinchwad elections independently
चिंचवड : अजित पवारांच्या पक्षातून बंडखोरी; ‘या’ नेत्याने केला अपक्ष लढण्याचा निर्धार
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Loksatta Chatura Can biological mother name be added instead of step mothes on the record
सावत्र आईऐवजी जैविक आईचे नाव लावणे हा मुलीचा अधिकारच!
In Badlapur case accused Akshay Shinde Thane alleged encounter
चकमकी अखेर पोलिसांवरच का शेकतात?
women prostitution, Nagpur, husband Nagpur,
देहव्यवसायाच्या दलदलीतून बाहेर पडत ती पुन्हा संसारात रमली
Small child seriously injured in attack by dog in Pune
पुण्यात कुत्र्याच्या टोळक्यांच्या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी; चाकणमधील घटना
Itishri Expanding Horizons and Obstructing Frames
इतिश्री: विस्तारणारं क्षितिज आणि अडवणाऱ्या चौकटी
rahul gandhi statement in america, prime minister narendra modi
राहुल गांधीनी मोदींच्या पावलावर पाऊल टाकलं तर एवढं काय बिघडलं?

हेही वाचा – स्त्री-स्नेही दारूचं दुकान निघालं… बिघडलं काय?

आपली कामं आवरल्यावर नीता सुचेताकडे डोकावली. दोघींसाठी चहा टाकता टाकता सुचेता सुरूच झाली.

“आता थकले बाई या उर्वीच्या चिडचिडीपुढे. कसं व्हायचं या मुलीचं?”

“आता काय झालं?” नीतानं विचारलं.

“उर्वीचं बाहेरचं खाणं, व्यायामाचा आळस यावरून रोजचे वाद होतेच. आता PCOD चं एक नवंच टेंशन, पण उर्वीला कशाहीबद्दल काहीही म्हटलं तरी चिडणं एवढी एकच रिॲक्शन असते तिची.” सुचेता फुणफुणली.

“वयच आहे तिचं चिडण्याचं. प्रत्येक शब्द सिरिअसली कशाला घ्यायचा?”

“तू तिचीच बाजू घेणार. आज मी माझ्या बहिणींना फोनवर तिच्या PCOD बद्दल सांगितलं म्हणून भांडली माझ्याशी. ‘त्यापेक्षा फेसबुकवर रिपोर्टच टाक माझा’ म्हणाली. आपल्या सख्ख्या लोकांना माहीत नको का? अडीनडीला तेच येतात मदतीला.”

“अगं, पण एवढ्या घाईनं फोन करून सांगण्याइतकं अर्जंट काय होतं? उपचार तर डॉक्टरच करणार ना? नातलग काय करणार आहेत?”

“पण फॅमिलीला सांगितलं तर बिघडलं काय? आजकालच्या मुलांना नातीच कळत नाहीत. त्यांचे मित्र-मैत्रिणी सोडून सगळे परके.” यावर नीता काहीच बोलली नाही. सुचेताला ते जाणवलं.

“तुला नाही पटत?”

“अगं, आपल्या पिढीत आत्ते-मामे भावंडंसुद्धा खूप जवळची असायची, तेवढा सहवास असायचा. त्यामुळे एकमेकांचं सगळं सगळ्यांना माहीत असायचं. आता तसं नाहीये सुचेता. प्रायव्हसीच्या कल्पना बदलल्यात. तुझ्या मावस किंवा चुलत बहिणीला तू उर्वीच्या आजारासारखी खासगी गोष्ट सांगितलेलं कसं आवडेल?”

“खासगी काय त्यात? तुला सांगितलंच ना तिनं?”

“माझी मैत्री ती लहान असल्यापासून रोजची आहे. तिनं मला PCOD चं सांगितलं, आता रोज पोहायला जाणार आहे, जेवणात कसे बदल करणार आहे तेपण सांगितलं. ‘मला भीती वाटतेय, लवकर नॉर्मल होईन ना?’ असंही विचारत होती.”

“एवढं बोलली? मला म्हणे, ‘झाला PCOD तर झाला. मला लग्नही नको आणि बाळही नकोय.”

“हं. मग त्यावर तू पॅनिक झाली असणार. अजून जेमतेम विशीत आहे, तरी लग्न करण्यावरून विषय भरकटला असणार.”

“हो. तसंच झालं. त्या टेंशनमुळे न राहवून मी माझ्या बहिणींना फोन केलेले तिनं ऐकले आणि मग जोरदार भांडण झालं. एवढं काय चुकलं ग माझं?”

“मुलांना सतत ‘तुमचं वागणं कसं चुकतंय’ वाली टीका करून ती बदलतील का गं? उर्वीनं PCOD ची भीती तुझ्यापाशी व्यक्त केली असती तर तू तिचं बेशिस्त खाणं, जागरणं वगैरेबद्दल लेक्चर सुरू केलं असतंस की नाही?”

“अम्… हो बहुतेक.”

“नातलगांचंपण असंच होतं. तेही हक्कानं तुझ्यासारखेच सल्ले, लेक्चर उर्वीला देत असणार. त्यामुळे मुलं वैतागतातच. त्यात अशा आजारपणाबद्दल पुनःपुन्हा टीका आणि सल्लेही देणाऱ्याला आपुलकी वाटली, तरी ते सल्ले घेणाऱ्या मुलांच्या मनातली भीतीच वाढते. आपली चूक कळलेली असली तरी आपल्याला जज करणाऱ्यांसमोर मुलं बेफिकिरी दाखवतात इतकंच.”

हेही वाचा – आहारवेद : साखर नियंत्रित ठेवणारे तमालपत्र

नीताच्या स्पष्टीकरणानं आता सुचेता भांबावली. “कुठेतरी पटतंय तुझं, ही बाजू माझ्या लक्षातच आली नव्हती कधी.”

“उर्वीलाही धक्का बसलाय गं PCOD चा. तिला थोडा वेळ दे. तिच्या जागी जाऊन बघ ना. या पिढीची लाईफस्टाइल आपल्यासारखी असणारच नाहीये हे दिसेल, तेव्हा जेवणखाण, झोपण्याच्या सवयी यांचा त्यातल्या त्यात सुवर्णमध्य साधता येईल. मुलांना आपल्या काळाच्या अपेक्षांमधून जज करत राहिलं तर कुठे जुळणार? त्यामुळे उर्वीच्या काळात, उर्वीच्या जागी जाऊन समजून घ्यायचं, तिला विश्वास द्यायचा की आपली पिढी, आपल्या नात्यांच्या कल्पना यांच्या फुग्यात राहायचं याचा चॉइस तुलाच करायचाय.” नीताच्या सांगण्यावर विचार करत सुचेता म्हणाली,

“खरं आहे तुझं. उर्वीचं आणि माझं नातं मैत्रीचं असेल की अविश्वासाचं तेही कदाचित माझ्या चॉइसवरच अवलंबून असेल, नाही का?”

(लेखिका रिलेशनल कौन्सिलर आहेत)

neelima.kirane1@gmail.com