ऐश्वर्या आणि दिव्या बालवाडीपासूनच्या सख्ख्या मैत्रिणी. ऐश्वर्याच्या मुलाच्या, ‘अंश’च्या पहिल्या वाढदिवसाला येणं जमलं नव्हतं, म्हणून दिव्या आज ऐश्वर्याकडे आली होती. अंश बाबाबरोबर फिरायला बाहेर पडल्यावर मैत्रिणींच्या गप्पा सुरू झाल्या.

“कशी आहेस?” दिव्याच्या या साध्या प्रश्नावर ऐश्वर्या अचानक उसळली. “आपले सगळे नातलग ना दिव्या, म्हणण्यापुरते जवळचे असतात. पण शहाण्याने त्यांच्या भरवशावर राहू नये.” “हे जागतिक सत्य तुला आजच का बरं उमगलं?” दिव्या हसत म्हणाली. “हसू नकोस. मूल होण्याचा निर्णय मी लांबवत होते तर आमचे दोघांचे आई-बाबा, भावंडांनी मागे लागून लागून मला भरीला घातलं.” “माहितीय, पुढे?” “अगं, माझ्या नणंदेचा नवरा जुलैपासून चार महिन्यांसाठी परदेशी जातोय. त्यामुळे सासू-सासरे तिच्यासोबत राहायला जाणारेत. तिला जुळी बाळं झाली आहेत ना?” “बरं, मग?” “विरेनची बदली होतेय नाशिकला. माझ्या बाबांच्या ऑपरेशनमुळे आई-बाबाही येऊ शकणार नाहीत. माझा जॉब, शिफ्टिंग आणि अंश सगळं कसं मॅनेज करणार मी? खूप चिडचिड होतेय.

Prahlad Joshi statement that the plan of Congress in Karnataka is on the verge of closure Kolhapur news
काँग्रेसच्या कर्नाटकातील योजना बंद पडण्याच्या मार्गावर; प्रल्हाद जोशी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
chaturang article
‘भय’भूती : भयातून अभयाकडे
Maharashtra kunbi vidhan sabha
कुणबी समाजाला डावलल्याची खंत, यवतमाळात तिसरा पर्याय देण्याचा प्रयत्न
Action by the Mumbai Board of MHADA in the case of extortion of Rs 5000 from the mill workers Mumbai print news
गिरणी कामगारांकडून पाच हजार रुपये उकळणे महागात; वांगणीतील विकासकाला कारणे दाखवा नोटीस, म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून कारवाई
loksatta satire article sujay vikhe patil
उलटा चष्म: पातेले कलंडलेच..
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…

हेही वाचा – …आणि अभिनेत्री असूनही ‘ती’ आम्हाला आमच्यातलीच वाटली!

नणंदेचा फोन घेणंही दोन दिवस टाळलंय मी. ” “एवढं कसलं दडपण? तुझं तर वर्क फ्रॉम होम आहे, इथून काय आणि नाशिकहून काय?” “अगं, पण अंशकडे बघायला आजी आजोबा नकोत का? नवीन गाव, नवीन माणसं…” “नाशिक काही तुला अनोळखी नाही. विरेन आहेच, जुलैपर्यंत सासू सासरेही सोबत असतील. तोवर पाळणाघर मिळेल, नॅनी मिळेल. उगीचच पॅनिक कशासाठी व्हायचं? “पण अंश व्हायच्या वेळी, “आम्ही घेतो जबाबदारी” असं मोठ्या तोंडानं म्हणणारे आता…” ऐश्वर्या फणकारली. “मग वर्षभर घेतलीच की जबाबदारी त्यांनी. विरेनपण मदत करतो. तुझं काम स्मूथ चाललंय. नशीबवान आहेस.” “म्हणजे काय मी काहीच केलं नाही का? जागरणं, आजारपणं… आधी कुठे माहीत होतं एवढं काही असतं ते? अंश झाला त्या दिवसांपासून सगळं बदललं. पूर्वीसारखं वाट्टेल तेव्हा भटकणं, मित्रमंडळ एवढंच काय विरेनशी मनमोकळ्या गप्पा… सगळं थांबलं. मला सर्वांचा राग येतोय. स्वत:चासुद्धा.” “कशासाठी?” “एकतर मूल होणं इतकं फुल टाइम, वेळखाऊ काम आहे हे मला आधी कोणीच सांगितलं नाही. आणि आता गायब होतात. म्हणजे मी अडकलेच ना?” “म्हणजे तुला जसं माहीतच नव्हतं. त्यातून तसं कुणी सांगितलं असतं तर अंश झाला नसता? आणि नणंदेच्या जुळ्या बाळांपेक्षा तुझी गरज केवढी मोठी?” दिव्याच्या स्वरात नवल आणि थट्टेची छटा होती. त्यामुळे आपण वैतागाच्या भरात काहीही बोलत सुटलोय हे जाणवून ऐशू गडबडली.

हेही वाचा – गोल्डमन पुरस्काराने सन्मानित अलेस्सांड्रा कोरप मुंडुरूकु आहे तरी कोण?

“तसं नाही गं, अंश नसण्याची आता कल्पनाही नाही करू शकत मी. पण आधीच मला सगळे वर्कोहोलिक म्हणतात. मला एकटीला अंशची काळजी घेता येणार नाही याची सर्वांना खात्रीच आहे. त्यामुळे मला हेल्पलेस वाटतंय.” ऐशू रडकुंडीलाच आली एकदम. “अगं राणी, सासू सासरे असल्याने अंशची लिमिटेड जबाबदारी आणि बाकी पूर्णवेळ ऑफिस हा तुझा कम्फर्ट झोन झालाय. त्याची सवय झालीय. पण असंही आजी-आजोबा आयुष्यभर थोडीच जबाबदारी घेणार होते त्याची? आता दोन-तीन महिने पूर्ण जबाबदारी आपली हे एकदा मान्य झालं की आपोआप सगळं जमेल. प्लॅनिंग करशीलच की. लोकांना काहीही म्हणू दे. तू स्वत:वर विश्वास ठेव ना.” “पण इतकी भीती, चिडचिड का होतेय?” “तुझा सवयीचा कम्फर्ट झोन तुटणार आहे, त्यासाठी मनाची तयारी नाहीये एवढंच. “मला कसं जमणार?” ऐवजी, “फक्त दोन-तीन महिने थोडी तडजोड, धावपळ होईल इतकंच” असा विचार केलास तरी चिंता कमी होईल. नवीन कम्फर्ट झोन लवकर तयार होईल.” तरीही ऐश्वर्याचा चेहरा गंभीरच पाहून दिव्या समजावण्याच्या सुरात म्हणाली, “लहानपणापासून पाहतेय. जरा बदल येतोय म्हटलं, की तुझी चिडचिड सुरू होते. पण आता आपण मोठे झालोत ऐशू. चिडचिडीमुळे प्रश्न सुटत नाहीत, उलट वाढतात हे आता कळतं ना आपल्याला? अंशने तुझा हा पॅनिक स्वभाव घ्यायला हवाय का? तर मग चिडचिड करायची की स्वत:वर विश्वास ठेवायचा? हा चॉइस तुलाच करायचा आहे.”

(लेखिका रिलेशनल कौन्सिलर आहेत.)

neelima.kirane1@gmail.com