मोठ्या शहरात कामासाठी बाहेर पडणारी व्यक्ती साधारण दहा ते बारा तास घराबाहेर असते. सुटीचे दिवस वगळले तर इतर दिवशी आपल्या जोडीदारासोबत निवांत वेळ घालवण्यास मिळणं तसं दुरापास्तच. गेल्या दोन वर्षांत करोनामुळे घरून काम करण्याची प्रथा बऱ्यापैकी रुजली हे जरी खरं असलं, तरी सरसकट सगळ्याच नोकऱ्यांमध्ये ही सोय नाही हेही खरंच. थोडक्यात काय, तर नोकरी करणारी व्यक्ती आपल्या ऑफिस सहकाऱ्यांबरोबर खूप मोठा काळ एकत्र घालवत असते. कालांतराने तिथले कर्मचारी, विशेषतः एका विभागातील कर्मचारी हे एक कुटुंब होतं; पण काही वेळा ते त्याहीपेक्षा पुढे जातं. अशा वेळी सावध…

बराच काळ एकाच विभागामध्ये, एका प्रोजेक्टवर काम करणाऱ्या दोन भिन्नलिंगी व्यक्ती असतील तर त्यांच्यात खूप जवळचं नातं तयार होतं. फक्त सहकारी किंवा मित्र नाही, तर त्याही पलीकडचं नातं… कामात येणाऱ्या अनेक अडचणी मिळून सोडवणं, प्रेझेंटेशनची तयारी सोबत करणं, एकमेकांना वरिष्ठांच्या रोषापासून वाचवणं, अशा अनेक गोष्टी कामाच्या अनुषंगाने आपोआप घडतात, जे अत्यंत स्वाभाविक आहे. हे सगळं करत असताना एकमेकांच्या अनेक खासगी कौटुंबिक बाबींचा उल्लेख होतो, अनेक आतली गुपितं सांगितली जातात आणि भावनिक बंध तयार होतो, जसं आदेश आणि रीमाचं झालं होतं…

'Gir Mat Jaana': Viral MP Woman's Dance Fails To Impress Netizens funny video goes viral
गावच्या महिलेचा ट्रेंडिंग गाण्यावर तुफान डान्स; मारल्या अशा स्टेप की VIDEO पाहून पोट दुखेपर्यंत हसाल
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Marathi Actor Hemant Dhome has a new cow in his family
अभिनेता हेमंत ढोमेच्या कुटुंबात आली नवीन सदस्य, नाव आहे खूपच खास
Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
Two girls fighting at collage over a guy shocking video viral on social media
प्रेमासाठी काय पण! एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा झिंज्या उपटत तुफान राडा; VIDEO पाहून व्हाल हैराण
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…

आणखी वाचा : ती वेडी तर नाही ना?

आदेश आणि रीमा जवळपास पाच वर्षं एकाच ऑफिसमध्ये एकत्र काम करत असल्यानं एकमेकांना अतिशय चांगले ओळखत होते. त्यांच्या घरच्या सगळ्यांना या दोघांची ओळख होती, येणं-जाणं होतं. रीमाला काही कामामुळे ऑफिसला उशीर होणार असेल तर आदेश लक्ष घालून तिचं काम करणार, त्याला डार्क कॉफी आवडते म्हणून रीमा आठवणीनं जास्तीची कॉफी पावडर घालणार, सेमिनारला एकमेकांच्या शेजारीच बसणार… ग्रुपमध्ये असतानाही एकमेकांशी कुजबुजत बोलणार, अशा त्यांच्या सवयी होत्या. दोघंही आपापल्या संसारात खूश होते, पण ऑफिसमध्ये पाय टाकला, की त्यांचं जणू जगच बदलत होतं. सोबत कँटीनला जेवणं, एकमेकांसाठी खुर्ची राखून ठेवणं, औषध घेण्याची आठवण करणं, सोबत येणं-जाणं सुरू होतं.

घरी पती किंवा पत्नीला माहीत असणाऱ्या जवळपास सगळ्या आतल्या गोष्टी या ‘ऑफिस मेट्स’ना माहिती असत. मग ते दोघं एकमेकांचे ‘ऑफिस स्पाउस’ म्हणवले जाऊ लागले. घरी पत्नी काळजी घेते तशी ऑफिसमध्ये ती त्याची काळजी घेऊ लागली. हे सगळं काही काळाच्या सहवासानं आपसूक घडत होतं. ते नातं भावनिक पातळीवरच होतं; त्यात विषयवासना नव्हती किंवा अजिबात शारीरिक संबंधही नव्हते. आपण ऑफिसमध्ये ऑफिस मेट्स किंवा मित्र यापलीकडे जाऊन वागतोय असं त्यांना वाटत नव्हतं. म्हणूनच त्यांना इतरांकडून ‘ऑफिस स्पाउस’ म्हणवून घेणं अजिबातच मान्य नव्हतं.

आणखी वाचा : ‘डिझायनर व्हजायना’ म्हणजे काय?

“तू ही कंपनी सोडून दुसरीकडे जाण्याचा विचारही करू नकोस हं रीमा! आणि करणार असशील तर आपण दोघं मिळून जॉब बदलू.” आदेशचं असं बोलणं तिला कुठे तरी सुखावून जायचं. त्याचं तिच्यावर अवलंबून राहणं तिला आवडू लागलं होतं. तिची अगदी जवळची मैत्रीण सुखदा हे सगळं जाणून होती. या दोघांची इतकी जवळीक त्यांच्या वैयक्तिक कौटुंबिक जीवनासाठी घातक आहे, हे तिच्या लक्षात येत होतं. ती म्हणाली, “ रीमा, स्त्री-पुरुषात मैत्रीचं नातं नक्कीच असू शकतं. माझा त्यावर विश्वास आहे. तुमचं नातं त्यापलीकडे जातंय हे तुमच्या लक्षातही आलेलं नाहीए. इतक्या काळापासून असलेल्या ऑफिसमैत्रीच्या नात्याचं लग्नात रूपांतर होणार असेल तर ठीक असतं …पण तुम्ही दोघं तर विवाहित आहात. तो तुझा नवरा नाही! तुमच्या करियरच्या वाटा आत्ताच वेगळ्या करा. नाही तर तुला अत्यंत कणखर मन ठेवावं लागेल. ही वाट निसरडी आहे बरं!”

खरं तर आधीच विवाहित असणाऱ्या व्यक्तींना अशा नात्यात खूप काळजी घेण्याची गरज असते. ऑफिसमधील आपल्या नात्याचा घरातील नात्यावर कुठलाही परिणाम न होऊ देता, ते नातं न लपवता, एक सीमारेषा आखून वागावं लागतं. प्रत्येक नात्याचा मान राखून समतोल राखणे जमले पाहिजे, नाही तर गुंतागुंत वाढत जाते आणि जगण्यावर त्याचा परिणाम होतो.

शेवटी नातं कुठलंही असो, वागण्यात समतोल हवाच!

adaparnadeshpande@gmail.com