‘‘उद्या येतेस ना सरावाला… आपल्याला नामांकित मंडळाकडून ढोल वाजवायला सुपारी मिळाली आहे.’’ नेहाने समोरून उत्तरादखल केवळ ‘हम्म…’ उत्तर दिलं. समोरून या उत्तराने फरक न पडलेली समीरा ‘तुझी कारणं नकोत… ये मी तुझी वाट पाहते.’’ कुठल्याही उत्तराची वाट न पाहता समीराने फोन ठेवून दिला. या संवादाला निमित्त होतं नवरात्रीचं…

नवरात्रं जवळ येत असल्यानं समीराच्या ढोलपथकाला आमंत्रित करण्यात आलं होतं. या संवादानं तिच्या मनात खोलवर लपवून ठेवलेलं काही नकोसं… बोलू नये असं समोर आलं आणि ती त्याच विचारात गुंतली.

'Gir Mat Jaana': Viral MP Woman's Dance Fails To Impress Netizens funny video goes viral
गावच्या महिलेचा ट्रेंडिंग गाण्यावर तुफान डान्स; मारल्या अशा स्टेप की VIDEO पाहून पोट दुखेपर्यंत हसाल
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Marathi Actor Hemant Dhome has a new cow in his family
अभिनेता हेमंत ढोमेच्या कुटुंबात आली नवीन सदस्य, नाव आहे खूपच खास
Sanjay Bangar Son Aryan Becomes Anaya Shares Hormonal Transformation Journey Video on Instagram
Sanjay Bangar Son: भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या मुलाची हार्माेन रिप्लेसमेंट थेरपी, आर्यनने नावही बदललं, VIDEO केला शेअर
Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Two girls fighting at collage over a guy shocking video viral on social media
प्रेमासाठी काय पण! एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा झिंज्या उपटत तुफान राडा; VIDEO पाहून व्हाल हैराण
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?

हेही वाचा – निवृत्तीवेतनाकरता विधवेला वणवण करायला लावल्याने एक लाखाचा दंड

शीतल चार चौघांसारखी… टिव्हीवर दिसणाऱ्या सार्वजनिक मिरवणुकीत ऐटीत फेटा बांधत ढोल गळ्यात अडकवून वादन करणाऱ्या मुली- महिला पाहिल्या की या गर्दीचा आपणही एक भाग व्हावं असं तिला सारखं वाटे. घरी आई वडिलांकडे मोकळीक असली तरी मुलगी अंधार पडल्यावर घरात हवी या विचारानं ती घरात राहिली. सासरी लग्नानंतर नवऱ्याजवळ तिनं एकदा सहज म्हणून मलाही ढोल वादन करायची इच्छा असल्याचं सांगितल्यावर सुरुवातीला त्यानं हसण्यावारी नेलं. पण तिची तगमग पाहून घरातील सर्व कामे आटोपून नोकरी सांभाळून तुला झेपणार असेल तर नक्की कर असं सांगितल्यावर तिला खूप आनंद झाला. पण तिचा हा आनंद क्षणभंगुर असेल याची तिलाही कल्पना नव्हती.

ठरल्याप्रमाणे तिनं एका ढोल पथकात पैसे भरत नोंदणी करत प्रवेश घेतला. गणपती उत्सवाच्या दोन – तीन महिने आधीच सरावाला सुरुवात झाली. ढोल, झांज, ताशा हे सारं शिकून घेत असताना तिनं ध्वजही दिमाखात फिरवला. आवड असल्यानं कामाच्या रहाटगाड्यात ती बरोबर सवड काढत होती. तब्येतीच्या बारीकसारीक कुरबुरीकडे तिनं लक्ष दिलं नाही. ढोल वादनानंतर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद तसंच सुट्टीच्या दिवशी ती नवरा समीर यालाही सराव बघायला नेत असे. तेथील वातावरण, ढोल पथकातील अन्य पुरुष मंडळी यांना तो ओळखू लागला होता. कोणाची कोणाविषयी तक्रार नव्हती. वेळेचं गणित कधी कधी कोलमडायचं इतकीच काय ती अडचण… त्यावरून दोघांमध्ये थोडे खटके उडायचे, पण सकाळच्या चहाच्या वेळी दोघेही नव्या उमेदीनं कामाला लागायचे.

बघता बघता त्यांच्या पथकाला वादनासाठी दोन ते तीन मंडळाची सुपारी मिळाली. सरावाला वेग आला. वेगवेगळ्या गाण्यांच्या चालींवर सराव सुरू झाला. गणेशोत्सवात सार्वजनिक गणेश मंडळासमोर वादनही झालं. तिला हे सारं खूप भारी वाटत होतं. एका वेगळ्याच कैफानं तिच्यावर गारूड केलं होतं. हे गारूड उतरलं ते अनंत चतुर्दशीच्या मिरवणुकीच्या निमित्तानं झालेल्या पोलीस, प्रशासन, मंडळ यांच्या बैठकीत. प्रशासनानं लादलेले निर्बंध, पोलिसांची भूमिका, मंडळाचे बचावाचे धोरण या सगळ्यात आपण हे का करतो हा प्रश्न तिला पडला. झालं असं की, बैठकीत तिच्या मैत्रीणीनं पथकात महिला खूप आहेत. मिरवणूक सकाळी अकराला सुरू होणार तर मिरवणूक मार्गावर फिरते शौचालय, कोणाला काही त्रास झाला तर फिरते वैद्यकीय पथक, पिण्यासाठी पाणी आणि टवाळखोरांपासून सुरक्षा अशा माफक अपेक्षा व्यक्त केल्या. त्यावेळी पोलिसांनी महिलांची सुरक्षा ही पथकाची जबाबदारी आहे आम्ही आमचे काम करूच, पण तुम्ही सहकार्य करा असं सांगितलं. वादन संख्येवर निर्बंध आणताना महिला वादकांचा सहभाग कसा राहील यावर चर्चा झाली. हो नाही करत या अटी मान्य होतील असं सकारात्मक वातावरण बैठकीत राहिलं. पण प्रत्यक्षात मिरवणूक सुरू झाली तेव्हा
सकाळी अकरा वाजेला मिरवणूक असल्यानं ती घरातून दहा वाजताच बाहेर पडली. मिरवणूक मात्र पूर्व नियोजित वेळेपेक्षा उशिरा सुरू झाली. मिरवणुकीसाठी खास पांढरा झब्बा, त्यावर जॅकेट, डोक्यावर फेटा, नाकात नथ असा सारा पेहराव करत सगळ्यांसोबत फोटोसेशन झालं. मिरवणुकीला सुरुवात होताना ‘गणपती बाप्पा मोरया’ घोषही जोशात झाला. जसजशी मिरवणूक पुढे जावू लागली तसं तसं तिला अस्वस्थ व्हायला लागलं. पिण्यासाठी पाणी मिळवण्याकरताही तिला दहा दहा मिनिटं वाट पाहावी लागली. सतत वजन घेत पायी चालल्यामुळे पाणी प्यायल्यानं तिला नैसर्गिक विधीसाठी लवकर बाथरूमही सापडेना. जे सापडलं त्या ठिकाणी असणारी स्वच्छता पाहता तिनं जवळच्या एका मैत्रिणीचं घर गाठलं.

हेही वाचा – IAS टीना डाबी यांच्या आईबद्दल जाणून घ्या; UPSC उत्तीर्ण होऊन झाल्या IES अधिकारी, नंतर घेतली स्वेच्छानिवृत्ती कारण…

मिरवणूक जसजशी पुढे जावू लागली तसं ती पाहण्यासाठी येणाऱ्यांमधील काही आंबटशौकिन पुरुषांचा तिला त्रास होऊ लागला. अंधार पडत असताना हा त्रास प्रकर्षाने जाणवला. एकानं तर थेट पथकात घुसण्याचा प्रयत्न केला तेव्हा हातातील टिपरी त्याच्या पाठीत घालत तिनं त्याला पोलिसांच्या मदतीनं बाहेर काढलं. पण मुद्दाम खेटणाऱ्यांचं काय? रात्री अकरापर्यंत ही मिरवणूक रेंगाळली. थोडं खट्टू होऊनच ती घरी परतली आणि झोपी गेली. सकाळी नवऱ्याला या सगळ्या अनुभवाविषयी सांगितलं तर तो म्हणाला, ‘‘तू तिथं हौसेनं गेली होतीस, त्याला कोण काय करणार?’’ त्यांच्या या उत्तरानं ती आचंबित झाली.

याप्रकारानंतर पथकाशी असणारा संवाद काहीसा कमी झाला आणि आज हा फोन. यामुळे पुन्हा वादन सुरू करायचं, दणक्यात ढोलासोबत आंबटशौकिनांनाही वाजवायचं की दुरूनच हा प्रकार अनुभवयाचा या संभ्रमात ती होती.