सायली परांजपे

कोणाच्या पर्समध्ये डोकावणं हे खरं तर फार सभ्यपणाचं मानलं जात नाही, तरीही एखाद्या बंद पर्समध्ये नेमकं काय आहे याची उत्सुकता सगळ्यांनाच असते. त्यातही ती पर्स इंग्लंडच्या राणीची असेल, तर काही विचारायलाच नको. राणी एलिझाबेथ यांच्या हातात झुलणाऱ्या ऐटबाज पर्समध्ये नेमकं काय बरं असेल, हा प्रश्न गेल्या चार पिढ्यांत कोणा ना कोणाला तरी कधी ना कधी पडलेला असावा. अगदी पुलंसारख्या साहित्यिकानेही राणीच्या पर्सबद्दल वाटणारी उत्सुकता आपल्या लेखनातून व्यक्त केली होती. चौकोनीसर, मध्यम आकारमानाच्या काळ्या किंवा क्वचित पांढऱ्या हॅण्डबॅगशिवाय राणी एलिझाबेथ यांना सामान्यांनी क्वचितच बघितलं असेल.

London–Calcutta bus service
London–Calcutta bus service: लंडन ते कलकत्ता, सर्वाधिक लांबीचा बससेवा मार्ग; कुणी चालवली ही बससेवा? कुणासाठी?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
oil india limited portfolio
माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलिओला महारत्नाची जोड

पर्स म्हणजे पैसे हे समीकरण आता बदलू लागलं असलं, तरी अजूनही हे दोन शब्द समानार्थाने वापरले जातातच. अर्थात इंग्लंडच्या राणीला कुठं टॅक्सीचं भाडं चुकतं करावं लागत असेल किंवा दुकानात जाऊन खरेदीसाठी पर्स उघडावी लागत असेल. मग त्यांच्या हातातल्या या पर्सचं प्रयोजन काय? साठ-पासष्ट वर्षांपूर्वीच्या फोटो किंवा फुटेजमध्येही त्यांच्या डाव्या हातात पर्स हटकून दिसते आणि अगदी अलीकडच्या काळातही वृद्धत्वामुळे एका हातात काठी आली, तरी दुसऱ्या हाताने मात्र पर्सची साथ सोडलेली नव्हती.

आणखी वाचा : मोठी लागून गेली इंग्लंडची महाराणी…

राणी एलिझाबेथ पर्समध्ये नेमकं काय ठेवत असतील याबद्दलची उत्कंठा अनेकदा व्यक्त झाली आहे. हा चक्क पुस्तकाचा विषय झाला आहे. आणि बऱ्याचदा शाही कर्मचाऱ्यांनी, तर काही वेळा खुद्द राणी एलिझाबेथ यांनी नर्मविनोदाचा आधार घेत ही उत्कंठा शमवली आहे. एखाद्या मार्मालेड सॅण्डविचपासून ते रुमाल, चष्मा, फाउंटनपेनसारख्या कामाच्या वस्तू, आरसा व लिपस्टिकसारख्या ‘बायकी’ वस्तूंपर्यंत.. घशाला कोरड पडली तर चघळण्यासाठी मिंटपासून ते चर्चच्या कलेक्शन बॉक्समध्ये टाकण्यासाठी बाळगलेल्या पाच-दहा डॉलर्सच्या नोटा आणि वेळ मिळाला तर सोडवण्यासाठी वर्तमानपत्रातून कापून घेतलेल्या शब्दकोड्यापर्यंत.. प्रिन्स फिलिप यांनी वेंडिग गिफ्ट म्हणून दिलेल्या मेटलच्या मेकअप-बॉक्सपासून कुटुंबाच्या फोटोंपर्यंत.. बरंच काही राणीच्या या हॅण्डबॅगमध्ये सामावलेलं असायचं. अर्थात ही सगळी सांगोवांगीची माहिती आणि या सगळ्या वस्तूंमध्ये विशेष असं काय? त्या तर सामान्य स्त्रियांच्या हॅण्डबॅगमध्येही सहज सापडतील. मात्र, या सगळ्या सामान्य वस्तू सामावून घेणारी राणीची पर्स नक्कीच असामान्य होती, हे तिच्या इतिहासात डोकावलं तर लक्षात येईल.

एलिझाबेथ १९५२ मध्ये इंग्लंडच्या राणी झाल्या, तेव्हा त्यांच्या आईने त्यांना पर्स भेट म्हणून दिली. तेव्हापासून पर्स त्यांच्या ओळखीचा एक भाग झाला.लावनर या सुप्रसिद्ध ब्रॅण्डच्या हॅण्डबॅग्ज राणी एलिझाबेथ प्रामुख्याने वापरत होत्या. १९६८ मध्ये तर त्यांनी लावनरला आपल्या हॅण्डबॅग्ज तयार करण्याचं खास ‘वॉरंट’च प्रदान केलं. राजघराण्याला लागणाऱ्या वस्तूंचं खास उत्पादन करण्याचा विशेषाधिकार कंपन्या किंवा ब्रॅण्ड्सना दिला जातो, त्याला ‘वॉरंट’ असं म्हणतात. तेव्हापासून लावनरच्या सहा वेगवेगळ्या प्रकारच्या हॅण्डबॅग्ज राणी एलिझाबेथ यांनी वापरल्या आहेत. या हॅण्डबॅग्ज अर्थातच राणीसाठी खास तयार केल्या जायच्या.

आणखी वाचा : कधीतरी आयुष्यात राणीसारखं ऐशोआरामात जगायला मिळायला हवं….! स्त्रियांच्या मनातला बोलका प्रश्न

राणी एलिझाबेथ यांना पाहुण्यांशी हस्तांदोलन करताना बॅगचा अडथळा जाणवू नये एवढी आटोपशीर पण तरीही लागणाऱ्या सगळ्या गोष्टी सामावून घेण्याएवढी प्रशस्त असं आकारमान साधलं जात असे. या हॅण्डबॅग्ज उच्च दर्जाच्या काफ लेदरपासून तयार केल्या जायच्या. हव्या असलेल्या वस्तू विनासायास काढता याव्यात आणि पर्स वजनाने हलकी राहावी म्हणून पर्सला आतून स्वेडचं अस्तर लावलं जायचं. पर्स धरण्यासाठी लावलेले बेल्ट्स किंचित लांब ठेवले जायचे, जेणेकरून, हातात अडकवलेली पर्स घासली जाऊन राणीच्या जॅकेटची परिटघडी विस्कटू नये. राणी एलिझाबेथ यांच्या सर्व आवश्यकतांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने ही पर्स ‘कस्टमाइझ’ केली जायची.

राजवाड्यातल्या म्हणजे घरातल्या सोहळ्यांमध्येही राणी हातात पर्स का अडकवत असतील असा प्रश्नही अनेकांना पडत असेल. यामागचं गुपीत म्हणजे त्या पर्सद्वारे राणी आपल्या कर्मचाऱ्यांना सूचना, संकेत देत असे.

राणी एलिझाबेथ यांनी पर्स टेबलावर ठेवली याचा अर्थ पाचेक मिनिटांत त्यांना तिथून निघायचं आहे, असा असायचा. बॅग जमिनीवर ठेवली याचा अर्थ मदतनिसांनी पाहुण्यांशी संभाषण सुरू करावं. राणीला हजारो अपरिचित व्यक्तींनाही भेटावं लागायचं. व्यक्तीला आपल्यापासून एका ठराविक अंतरावर ठेवण्यासाठीही क्वचित या पर्सचा उपयोग व्हायचा. थोडक्यात, राणी एलिझाबेथ यांच्या व्यक्तिमत्वाचं एक वैशिष्ट्य झालेल्या त्यांच्या पर्सचे अनेक उपयोग होते.

आणखी वाचा : ….अन् तेव्हा ती बाहुलीसारखी नटलेली दिसेल

इंग्लंडमध्ये राजा किंवा राणीच्या हातात राजकीय किंवा कायदे करण्याचे अधिकार नाहीत, ते अधिकार फार पूर्वीच निर्वाचित सरकारांकडे गेले आहेत. तरीही देशाच्या सार्वजनिक पटलावर राजा किंवा राणीला प्रतिकात्मक स्थान आहे, जनतेच्या हृदयात राजघराण्याला मानाचं स्थान आहे. राणी एलिझाबेथ यांची पर्सही कदाचित अशीच प्रतिकात्मक असावी. कुठेच पैसे चुकते करण्याची गरज न भासणाऱ्या किंवा आवश्यक वस्तू वाहण्यासाठी मदतनिसांचा ताफा जवळ असणाऱ्या राणीच्या हातातली पर्स म्हणजे राजेशाही दिमाखाचं प्रतीक असावं. नुकत्याच काळाच्या पडद्याआड गेलेल्या राणीच्या स्मृती जनतेच्या मनात दीर्घकाळ राहतील आणि ही ‘सिग्नेचर’ पर्सही त्या स्मृतींचा भाग असेल, हे नक्की.