Republic Day 2024 Parade : देशभरात ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. त्यानिमित्त राजधानी दिल्लीच्या कर्तव्यपथावर नारीशक्तीचं दर्शन घडलं. १०० महिला वादकांनी या पथसंचलनाला सुरुवात केली आणि तिन्ही सैन्यदलांतील महिलांनी चित्तथरारक कवायती करून, देशाला महिलांच्या शौर्याची जाणीव करून दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सकाळी दिल्लीतील कर्तव्यपथावरून ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे प्रमुख पाहुणे होते. मॅक्रॉन यांच्यासमोर भारतानं सांस्कृतिक विविधता आणि लष्करी पराक्रमांचं दर्शन घडविलं. यंदाचे पथसंचलन महिलाकेंद्रित होतं. त्यामुळे कर्तव्यपथावर जवळपास ८० टक्के महिलांचा समावेश होता.

१०० महिला कलाकारांनी केली सुरुवात

विकसित भारत आणि भारत : लोकशाहीची जननी या दोन महिलाकेंद्रित थीमवर आधारित पथसंचलनात १३ हजारांहून अधिक पाहुण्यांनी सहभाग घेतला होता. या संचलनाला १०० महिला कलाकारांनी सुरुवात केली. शंख, नादस्वरम, नगारा, ढोल-ताशा आदी पारंपरिक भारतीय वाद्यं वाजवून महिलांनी या पथसंचलनाचं नेतृत्व केलं. या वादक पथकात देशभरातील विविध राज्यांतल्या महिला कलाकारांचा समावेश होता. म्हणजेच प्रथमच महिला कलाकारांना ही संधी देण्यात आली. पूर्वी पथसंचलनाच्या सुरुवातीला पारंपरिक लष्करी बॅण्डचा वापर केला जाई.

तिन्ही सैन्यदलांतील महिलांचं शक्तीप्रदर्शन

कर्तव्यपथावर भारताच्या तिन्ही सैन्यदलांतर्फे शक्तिप्रदर्शन आणि पथसंचलन करण्यात आलं. राज्यांच्या चित्ररथांचं पथसंचलन झाल्यानंतर तिन्ही सैन्यदलांतर्फे पथसंचलन करण्यात आलं. भारतीय हवाई दलाच्या फ्लाय-पास्टमध्ये १५ महिला वैमानिकांनी सहभाग घेतला होता. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील महिला कर्मचाऱ्यांनी नारीशक्ती दाखवून देताना विविध साहसी कलाकृतींचे दर्शन घडविले. २६५ महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी मोटरसायकलवर उभे राहून शौर्य आणि चित्तथरारक कवायती सादर केल्या. त्यामध्ये त्यांनी मोटरसायकलवर स्वार होऊन, रायफल्स, तलवार, कॅमेरा व लॅपटॉप हाताळले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

भारतीय नौदलाच्या तुकडीत १४४ पुरुष आणि महिला अग्निवीरांचा समावेश होता. याचं नेतृत्व लेफ्टनंट प्रज्वल एम, लेफ्टनंट मुदिता गोयल, लेफ्टनंट शर्वणी सुप्रेया आणि लेफ्टनंट देविका एच प्लाटून यांच्याकडे होते. त्यानंतर ‘नारी शक्ती’ आणि ‘सी पॉवर अॅक्रॉस द ओशियन्स थ्रू इंडिजिनेझेशन’ या थीमचे चित्रण करणारी नौदलाचं पथसंचलन करण्यात आलं.

पथसंचलनाचा पहिल्या भागात भारतीय नौदलातील महिलांच्या कर्तव्यांचं दर्शन घडवण्यात आलं.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The vision of nari shakti on the kartavya path exciting drills by women from all three armed forces with 100 female players sgk