स्टारबक्सला देशभर नाव मिळवून देणाऱ्या अवनी दावडा या टाटा समूहाच्या सर्वात तरुण सीईओ झाल्या आहेत. त्या ३३ वर्षीय असून कमी वयात त्यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने हे पद प्राप्त केले आहे. अवनी या मूळ मुंबईतील असून त्यांनी आधी स्टारबक्सच्या सीईओ पदासाठी काम केले आहे. परंतु, हे यश त्यांना सहजासहजी मिळालेले नाही. यासाठी २००२ पासून त्या कार्यरत आहेत. त्यांचा प्रवास जाणून घेणे महत्त्वपूर्ण ठरेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोण आहेत अवनी दावडा ?

ज्या वयात अनेकजण आपल्या करिअरची दिशा ठरवत असतात किंवा स्थिरस्थावर होण्याचा प्रयत्न करत असतात त्या वयात म्हणजे वयाच्या ३३ व्या वर्षी टाटा समूहाचे सीईओ होणे, सोप्पे नाही. अवनी दावडा हे पद भूषवणाऱ्या सर्वात तरुण सीईओ आहेत. सर्व मोठ्या शहरांमध्ये ‘स्टारबक्स’ असून अनेक कॉफी शौकिनांच्या पसंतीचे ते ठिकाण आहे. टाटा समूहातील या कंपनीला देशभर ओळख मिळवून देण्यात ३३ वर्षीय अवनी दावडा यांनी निर्णायक भूमिका आहे
मूळच्या मुंबईच्या अवनी यांनी प्रतिष्ठित एचआर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून बॅचलर पदवी घेऊन तिच्या शैक्षणिक प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर अवनीने नर्सी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमधून व्यवसाय प्रशासनात पदव्युत्तर पदवी मिळवली. अवनीने २००२ मध्ये कॉर्पोरेट विश्वात पाऊल ठेवले आणि टाटा समूहात टाटा प्रशासकीय सेवेत (TAS) अर्ज केला.

हेही वाचा : “आम्ही लिव्ह इनमध्ये राहतो कारण…” काय मते आहेत तरुणाईची

टाटा समूहात त्यांचा प्रवेश झाला. त्यानंतर त्यांनी टाटा कंपन्यांमध्ये प्रतिष्ठित TAJ लक्झरी हॉटेल्स (IHCL) आणि टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड अशा कंपन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली.
अवनी दावडा यांनी टाटा सन्सचे डायरेक्टर आर.के. कृष्ण कुमार यांच्यासोबत काम केले. त्यांनी अवनी यांना या प्रवासात मोलाचे मार्गदर्शन केले. कुमार यांनी अवनी यांची क्षमता आणि उल्लेखनीय गुण ओळखून टाटा ग्लोबल बेव्हरेजेस लिमिटेड आणि स्टारबक्स कॉफी कंपनीतील संयुक्त उपक्रमाची देखरेख करण्यासाठी निवड केली. कृष्णा कुमार यांचे हे पाऊल ब्रँडसाठी टर्निंग पॉईंट ठरले.
अवनीने ब्रँडला लोकप्रियता मिळवून देण्याबरोबरच कंपनीची आर्थिक स्थिती मजबूत केली. टाटा स्टारबक्सने नुकताच एक हजार कोटी रुपयांच्या कमाईचा टप्पा ओलांडला असून स्टारबक्सच्या सीईओ म्हणून यशस्वी कारकीर्दीनंतर अवनी दावडा यांनी गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेडची उपकंपनी असलेल्या गोदरेज नेचर्स बास्केट लिमिटेडमध्ये व्यवस्थापकीय संचालक म्हणून भूमिका स्वीकारली.

हेही वाचा : सीमा, अंजू… अशी कोणती परिस्थिती परदेशातील प्रियकराकडे नेते ? काय असू शकतात कारणे…

अवनी यांचे यश महत्त्वाचे का ?

वयाच्या ३३व्या वर्षी टाटा समूहाच्या सीईओ पदी नेमणूक होणे ही सोप्पी गोष्ट नाही. यामागे अवनी यांचे कष्ट आहेत. कॉर्पोरेट जगतात त्यांनी आपला ठसा उमटवल्यामुळे अवनी दावडा या तरुण पिढीसाठी आदर्श उदाहरण ठरल्या आहेत. ‘एज इज जस्ट नंबर’ म्हणणे सोप्पे आहे, पण ते अवनी यांनी आपल्या कार्यातून सिद्ध करून दाखवले आहे. इच्छाशक्ती आणि उत्कृष्टतेसाठी समर्पण, सामाजिक जबाबदारी आणि सक्षम नेतृत्वकौशल्य आणि अनुभव उच्च पदाला नेऊ शकतात, याचे अवनी एक उज्ज्वल उदाहरण आहेत.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The youngest ceo of tata group is a marathi woman who is avni davda vvk
Show comments