त्वचा तेलकट असण्याची विविध कारणं सांगितली जातात. काही जणांच्या बाबतीत आनुवंशिकतेनंच त्वचा तेलकट असते. परंतु शरीरातल्या संप्रेरकांमध्ये घडून येणारे चढउतार, ताणतणाव, हवेतली आर्द्रता या कारणांमुळेही त्वचा तेलकट होऊ शकते. त्वचा तेलकट असेल, तर त्वचेची रंध्रं (पोअर्स) बंद होऊन ॲक्ने-पिंपल्स होण्याची शक्यता बळावते. पण तेलकटपणाचे त्वचेला काही फायदेही होत असतात हे लक्षात घ्यायला हवं.

तेलकट त्वचा असलेल्यांची त्वचा तुलनेनं जाड असते, तसंच कोरडी त्वचा असणाऱ्यांपेक्षा तेलकट त्वचा असलेल्या व्यक्तींना त्वचेवरच्या सुरकुत्यांची समस्या तुलनेनं कमी प्रमाणात असते. त्यामुळे त्वचेवरचं तेल संपूर्णपणानं घालवून टाकणं हे काही योग्य नाहीच. केवळ खूप तेलकटपणा आणि आवश्यक तेलकटपणा यात आपल्याला संतुलन साधायचं आहे. तेलकट त्वचेची आणि चेहऱ्याची निगा राखण्याच्या बाबतीत काही गोष्टी पाळल्या तर फायदा होतो. याबद्दल ‘अमेरिकन अकॅडमी ऑफ डरमॅटोलॉजी असोसिएशन’नं (एएडी) काही टिप्स देऊन ठेवल्या आहेत, त्या पाहू या-

Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Five detox tips for rejuvenate your body
Post Diwali Detox Tips : सणासुदीला भरपूर गोड, तेलकट पदार्थ खाल्ले का? मग शरीर डिटॉक्स करण्यासाठी करून पाहा हे पाच उपाय
petrol diesel price today in marathi
Price of Petrol And Diesel : पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? तुमच्या शहरातील आजचे दर येथे चेक करा
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
dudhi barfi recipe
अवघ्या काही मिनिटांत बनवा दुधी भोपळ्याची पौष्टिक बर्फी; वाचा साहित्य आणि कृती…
Matar Puri recipe
चविष्ट आणि पौष्टिक मटार पुरी अवघ्या काही मिनिटांत बनवा; जाणून घ्या साहित्य आणि कृती
quickly make delicious egg cutlets Read materials and actions
व्हेज कटलेट खाऊन कंटाळा आलाय? मग झटपट बनवा अंड्याचे स्वादिष्ट कटलेट; वाचा साहित्य आणि कृती

चेहरा धुताना…
तेलकट त्वचा असणाऱ्यांनी सकाळी, संध्याकाळी आणि व्यायामानंतर चेहरा जरूर धुवावा. धुताना त्वचा रगडून रगडून धुण्याची आवश्यकता नाही. तसंच काही जणांना असं वाटतं, की तेलकट त्वचा असताना हार्श फेसवॉश वापरला तरी चालेल. हे चुकीचं आहे. तुम्ही खूप कठोर (हार्श) फेसवॉश किंवा क्लिंझर वापरलंत, तर त्वचेवर ‘इरिटेशन’ होतं. ते टाळायला हवं. त्यामुळे तेलकट त्वचेसाठीही सौम्यच (माईल्ड) साबण, फेसवॉश किंवा क्लिंझर वापरायला हवं.

‘ऑईल फ्री’ सौंदर्यप्रसाधनं वापरा!
तुम्ही अनेक सौंदर्यप्रसाधनांवर ‘ऑईल फ्री’ किंवा ‘नॉन कोमेडोजेनिक’ हे शब्द वाचलेले असतील. असं क्लिंझर, मॉईश्चरायझर किंवा अशी मेकअपमधली प्रसाधनं तेलकट त्वचेला चालतील. अशा उत्पादनांमुळे त्वचंची रंध्रं बंद होणार नाहीत आणि त्वचेवर त्यामुळे पिंपल्स येणार नाहीत.

मॉईश्चरायझर हवंच
तुमची त्वचा जरी तेलकट असेल, तरी दररोज मॉईश्चरायझर वापरायलाच हवं. कोणत्याही सौंदर्यप्रसाधनावर ‘स्किन टाईप’ लिहिलेला असतो- म्हणजे कोणत्या प्रकारच्या त्वचेला ते उत्पादन चालेल असं नमूद केलेलं असतं, ते तपासा.

सनस्क्रीन जरूर वापरा
तेलकट त्वचा असणाऱ्यांनीही बाहेर जाताना जरूर सनस्क्रीन वापरायला हवं. पिंपल्स येणं टाळण्यासाठी झिंक ऑक्साइड, टायटॅनियम डायऑक्साइडसारखे घटक असलेलं सनस्क्रीन निवडता येईल. तसंच शक्यतो बिनवासाचं- ‘फ्रेगरन्स फ्री’ उत्पादन निवडा. तुम्हाला सनस्क्रीन वेगळ्यानं वापरायचं नसेल, तर तुम्ही असं मॉईश्चरायझर निवडू शकता, जे मॉईश्चरायझर आणि सनस्क्रीन या दोन्हीचं काम एकत्रितपणे करेल. मात्र सनस्क्रीन (किंवा सनस्क्रीनयुक्त मॉईश्चरायझर) हे ‘ब्रॉड स्पेक्ट्रम’ आणि ‘एसपीएफ ३०’ किंवा त्याहून अधिक एसपीएफ असलेलं चांगलं.

मेकअप उत्पादनं निवडताना…
मेकअप उत्पादनांमध्येही ‘ऑईल बेस्ड’ किंवा ‘ऑईल फ्री’ असे प्रकार मिळतात. तेलकट त्वचेसाठी ‘ऑईल फ्री’, ‘वॉटर बेस्ड’ मेकअप उत्पादनं वापरता येतील. झोपण्यापूर्वी चेहऱ्यावरून मेकअप काढायला विसरू नका.

टिश्यू पेपर पर्समध्ये हवेतच
तुमच्या पर्समध्ये केव्हाही वापरता येतील असे मऊ टिश्यू पेपर्स ठेवा. चेहरा जेव्हा जेव्हा तेलकट वाटेल, तेव्हा अलगदपणे टिश्यूनं त्यावरचं तेल टिपा. टिश्यू चेहऱ्यावर फिरवण्याची किंवा घासून घासून पुसण्याची गरज नाही.

चेहऱ्याला सारखा हात लावू नका
काही जणांना सारखा चेहऱ्याला हात लावण्याची सवय असते. त्यात वरवर पाहता काही विशेष वाटतही नाही, परंतु ही सवय प्रयत्नपूर्वक सोडायला हवी. कारण त्यामुळे हातांना लागलेली धूळ-माती, जंतू-जीवाणू चेहऱ्याला लागतात. त्यामुळे चेहऱ्याला हात लावायचा, तो चेहरा धुताना किंवा मॉईश्चराईझ करतानाच, हे लक्षात ठेवा.