आपलं नाव श्रीमंतांच्या यादीत असावं असं कुणाला वाटत नाही? पण काही जणांचंच हे स्वप्नं पूर्ण होतं. पूर्वी नवऱ्याच्या संपत्तीवरच बायकोची श्रीमंती मोजली जायची. आता मात्र काळ बदलला आहे. त्यामुळे स्वत: उद्योजिका असलेल्या आणि अब्जावधींचा कारभार एकहाती चालविणाऱ्या अनेक उद्योगिनींचा समावेश अतिश्रीमंतांच्या यादीत होतो. ‘फोर्ब्स’च्या वतीने ही यादी दरवर्षी जाहीर केली जाते. भारतातील उद्योगपतींचा यामध्ये समावेश असतो हे आपल्याला माहिती आहेच. पण त्याचबरोबर फोर्ब्सच्या अतिश्रीमंतांच्या २०२३ सालच्या यादीत भारतीय महिलांनी बाजी मारली आहे. सावित्री जिंदाल या देशातील सर्वांत श्रीमंत महिला ठरल्या आहेत. सावित्री जिंदाल या प्रसिद्ध जिंदाल ग्रुपच्या अध्यक्ष आहेत. भारतीय श्रीमंतांची यादी, २०२३ मध्ये १६ नवीन नावे समाविष्ट झाली आहेत, त्यांतील तीन महिला आहेत. जाणून घेऊ या भारतातील या अतिश्रीमंत महिलांबद्दल-

आणखी वाचा : मँचेस्टर मॅरेथॉनमधे लक्ष वेधलं ते संबलपूरी साडीने!

woman voters chatura article
तू मात्र या फुकट योजनांच्या अमिषाला बळी पडू नकोस…
Sanskruti More, a visually challenged chess player, satara district
अंधत्वावर मात करून यशशिखर गाठणारी बुद्धीबळपटू संस्कृती मोरे
chatura cesarean delivery
स्त्री आरोग्य: गर्भजल कमी असल्यास ‘सिझेरियन’ अनिवार्य आहे?
vidya balan bhool bhulaiyaa 3
‘भूल भुलैया -३’मधली माधुरी आणि माझी जुगलबंदी अविस्मरणीय…- विद्या बालन
soil making for plants in glass pot
काचपात्रातील बागेसाठी माती तयार करताना…
Loksatta Chatura How to identify children racket filling
मुलांचे ‘रॅकेट फिलिंग’ ओळखा
MVA demand menstrual leave
Menstrual Leave: मासिक पाळीदरम्यान दोन दिवसांची सुट्टी देण्याचे मविआचे आश्वासन; संसद ते स्मृती इराणींपर्यंत या विषयाशी निगडित कोणते वाद झाले?
sexual harassment crime victim, compensation,
लैंगिक छळाच्या गुन्ह्यात पीडितेला नुकसान भरपाईचा आदेश देणे अपेक्षित…
स्त्री आरोग्य : मासिकपाळीचा त्रास
स्त्री आरोग्य : मासिकपाळीचा त्रास

१) सावित्री जिंदाल (संपत्ती – १७ दशकोटी डॉलर्स)
जिंदाल ग्रुपच्या अध्यक्ष सावित्री जिंदाल यांनी श्रीमंत महिलांच्या यादीत बाजी मारली आहे. त्या ७३ वर्षांच्या आहेत. देशातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये त्यांचा क्रमांक सहावा आहे. तर जगभरातील श्रीमंतांमध्ये त्या ९४व्या स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती १७ दशकोटी डॉलर्स इतकी आहे. सावित्री जिंदाल या एक यशस्वी बिझनेसवुमन तर आहेतच पण त्याचबरोबर राजकीय नेत्याही आहेत. ज्या वयामध्ये महिला निवृत्त होऊन आरामाचे आयुष्य जगायचे बेत आखतात, त्याच वयात सावित्री जिंदाल यांच्या कारकीर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. सावित्री जिंदाल यांचा जन्म २० मार्च १९५० रोजी आसाममधल्या तिनसुकीयामध्ये झाला. १९७० मध्ये त्यांचे लग्न ओमप्रकाश जिंदाल यांच्याशी झाले. त्यांनीच स्टील आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपनी जिंदाल ग्रुपची स्थापना केली. जिंदाल कुटुंब पूर्वीपासूनच हरियाणातील राजकारणात सक्रिय राहिले आहे. ओमप्रकाश जिंदाल काँग्रेसच्या तिकिटावर सलग तीन वेळा हरियाणातील हिसार विधानसभेतून आमदार म्हणून निवडून गेले होते. त्यांच्या निधनानंतर सावित्री जिंदाल यांनी निवडणूक लढवली आणि त्या हरियाणा सरकारमध्ये मंत्रीही झाल्या. वयाच्या ५५व्या वर्षापर्यंत गृहिणीची जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडणाऱ्या सावित्री जिंदाल यांनी आपला व्यवसायही तितक्याच समर्थपणे सांभाळला आणि राजकीय नेत्या तसेच सामाजिक कार्यकर्त्याची भूमिकाही चोखपणे बजावली.

आणखी वाचा : व्यथा काश्मीरच्या: तब्बल ७५ वर्षे वीज नाही, डॉक्टर नाही, बाळंतपण केवळ सुईणीवरच अवलंबून!

२) रोहिका सायरस मिस्त्री (संपत्ती – ७ दशकोटी डॉलर्स)
भारतातील श्रीमंत महिलांच्या यादीत दुसरा क्रमांक आहे रोहिका सायरस मिस्त्री यांचा. दिवंगत प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या त्या पत्नी आहेत. रोहिका मिस्त्री यांची एकूण संपत्ती ७ दशकोटी डॉलर्स इतकी आहे. दिवंगत कन्स्ट्रक्शन टायकून पल्लोनजी मिस्त्री हे रोहिका यांचे सासरे. सायरस मिस्त्री यांचे सप्टेंबर २०२२ मध्ये अपघातात निधन झाले. त्यानंतर वारसा हक्काने रोहिका मिस्त्री यांना संपत्तीचा वाटा मिळाला. पण त्याचबरोबर त्या स्वत:ही अनेक पब्लिक लिमिटेड आणि खासगी कंपन्यांच्या संचालक आहेत. कॉर्पोरेट लीडर म्हणूनही रोहिका मिस्त्री यांना ओळखले जाते. रोहिका मिस्त्री यांचे लग्नाआधीचे नाव रोहिका छागल, त्या मुस्लीम आहेत. त्यांचे वडील इक्बाल छागला हे देशातील नामांकित वकील म्हणून ओळखले जातात, तर त्यांचे भाऊ रियाज छागला २०१७ मध्ये मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश होते.

आणखी वाचा : गृहिणी असलेली आई की, नोकरदार आई? हायकोर्टाने स्पष्ट केले की…

३)रेखा झुनझुनवाला (संपत्ती- ५.१ दशकोटी डॉलर्स)
स्टॉक मार्केटमधील तज्ज्ञ म्हणून ओळखल्या रेखा झुनझुनवाला देशातील श्रीमंत महिलांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. भारतातील शेअर मार्केटमधील बिग बुल म्हणून ओळखले जाणारे दिवंगत राकेश झुनझुनवाला यांच्या त्या पत्नी. पण त्यांची ओळख इतकीच मर्यादित नाही. तर गुंतवणूक कुठे आणि कधी केली पाहिजे याचा अचूक अंदाज रेखा झुनझुनवाला यांना आहे असे म्हटले जाते. त्यामुळेच फेब्रुवारी महिन्यात त्यांनी फक्त १५ दिवसांत १००० कोटी रुपयांची कमाई केली. टायटन कंपनीच्या शेअर्सवर त्यांनी ही कमाई केली होती, ज्याची देशभरात चर्चा झाली होती. ५९ वर्षांच्या रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये टायटन, स्टार हेल्थ अँड अलायन इन्शुरन्स आणि मेट्रो असे ब्रँड्स आहेत. राकेश झुनझुनवाला यांनी १९८५ मध्ये शेअर मार्केमध्ये गुंतवणुकीला फक्त पाच हजार रुपयांपासून सुरुवात केली. रेखा यांच्याच सल्ल्यावरून त्यांनी ट्रेडिंग कंपनी सुरू केली. ‘रेअर एंटरप्रायझेस’ या नावाच्या या कंपनीत रेखा यांचीही भागीदारी होती.

४) विनोद राय गुप्ता (४ दशकोटी डॉलर्स)
Havells India चे मॅनेजिंग डायरेक्टर अनिल गुप्ता यांच्या आई विनोद राय गुप्ता या देशातील श्रीमंत महिलांच्या यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती ४ दशकोटी डॉलर्स् इतकी आहे. पंखे, स्विच, फ्रिज यांच्यासारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणे बनवणारी कंपनी म्हणून हॅवेल्स ओळखली जाते. विनोद राय गुप्ता या ७८ वर्षांच्या असून त्यांचा मुलगा अनिल यांचाही देशातील श्रीमंतांच्या यादीत समावेश आहे. त्यांच्या कंपनीचे एकूण १४ कारखाने असून ५० पेक्षा जास्त देशांमध्ये त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तू विकल्या जातात. विनोद राय गुप्ता यांच्या पतींनी १९५८ मध्ये या कंपनीची सुरुवात केली होती.

५) सरोज राणी गुप्ता (संपत्ती – १.२ दशकोटी डॉलर्स)
महालक्ष्मी एसोबिल्ड प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालिका सरोज राणी गुप्ता श्रीमंत महिलांच्या यादीत पाचव्या स्थानावर आहेत. ७२ वर्षांच्या सरोज राणी गुप्ता यांची एकूण संपत्ती १.२ दशकोटी डॉलर्स इतकी आहे. एपीएल अपोलो ट्यूब्जच्या त्या सहसंस्थापिका आहेत. १९८६ मध्ये त्यांनी त्यांचे दिवंगत पती एस के गुप्ता यांच्यासोबर अपोलो ट्यूब्ज ही कंपनी स्थापन केली. पतीच्या निधनानंतर त्यांनी व्यवसाय सांभाळला.