मूल होऊ द्यायचं की नाही आणि जर होऊ दिलं तर ते कधी होऊ द्यायचं, हा प्रश्न पूर्णपणे स्त्रीचा असतो, असं सर्वांसाठीचं सत्य आहे; परंतु अनेकदा तिच्यावर मातृत्व लादलं जातं तेही अनेक कारणांनी आणि हे जगभरात आहे. या गृहीतकाला मोठ्या प्रमाणावर छेद दिला जातोय तो तैवानमध्ये. तेथे एक मोठा बदल घडतोय. 

तैवानमधील स्त्रिया त्यांच्या इच्छेनुसार आपली स्त्रीबीजे म्हणजे ‘एग्ज’ गोठवत आहेत. म्हणजेच ज्यांना आत्ता आई व्हायचं नाही त्या ही स्त्रीबीजे गोठवून ठेवतात आणि ज्या वेळी त्यांची मातृत्व स्वीकारण्याची तयारी असेल त्याच वेळी याचा वापर करतात. सध्या तैवानमध्ये ही संख्या वाढत चालली आहे. याला काही तरुण मुलींनी ‘इन्शुरन्स पॉलिसी’ अर्थात जीवन विमा असे नाव दिले आहे. सध्या ‘एग्ज फ्रीजिंग’ करण्याची मागणी वाढत चालली आहे. ३५ ते ३९ वर्षांच्या स्त्रियांमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा ट्रेंड जास्त दिसतो, असं नॅशनल तैवान युनिव्हर्सिटी हॉस्पिटलच्या एका अभ्यासातून समोर आलं आहे. गेल्या तीन वर्षांत ३५ ते ३९ वर्षे वयोगटातील जवळपास ८६ टक्के स्त्रियांनी या तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याचंही या अभ्यासात म्हटलं आहे. सध्या अविवाहित तरुणी ‘एग्ज फ्रीजिंग’ करू शकत असल्या तरीही लग्न झाल्याशिवाय त्यांना ही गोठवलेली स्त्रीबीजे वापरण्याची परवानगी तैवानमध्ये कायद्याने देण्यात आलेली नाही. स्त्री आणि पुरुष अशा लग्नानंतरच स्त्रिया आपली स्वत:चीच गोठवलेली स्त्रीबीजे वापरू शकतात. सेम सेक्स मॅरेज किंवा अविवाहित स्त्रियांना अशा पद्धतीने मुले जन्माला घालण्याचा अधिकार सध्यातरी तैवानमध्ये नाही. 

Anti corruption department filed case against Wangani Sarpanch Vanita Adhav for demanding bribe
लाच मागितल्याने महिला सरपंचावर गुन्हा, बदलापूर जवळच्या वांगणी ग्रामपंचायतीतील प्रकार
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Local fishermen save life of couple stuck in rough sea in ratnagiri
दाम्पत्याला भाट्ये समुद्रात खेळणे पडले महागात; स्थानिक मच्छीमारांनी वाचविले प्राण
What Nitesh Rane Said?
Ladki Bahin Yojana : “दोनपेक्षा जास्त मुलं असणाऱ्या मुस्लिम कुटुंबांना लाडकी बहीण योजनेतून वगळा”, आमदार नितेश राणेंची मागणी
Six Bangladeshi women arrested from Bhiwandi
Bangladeshi women arrested : भिवंडीतून सहा बांगलादेशी महिलांना अटक
sex ratio of birth in nashik municipal corporation
जिल्ह्यात लिंगोत्तर प्रमाणात घट; लिंग चाचणीची दक्षता समिती बैठकीत साशंकता
PM Modi
PM मोदींचा ‘मेक इन इंडिया’ पाठोपाठ आता ‘वेड इन इंडिया’वर भर; देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दलही केलं मोठं वक्तव्य
mla satyajeet tambe writes letter to maharashtra cm devendra fadnavis for bangladesh hindu protection
बांगलादेश मधील हिंदूंचे रक्षण करा; आमदार सत्यजित तांबे यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

सध्या गोठवलेली स्त्रीबीजे आणि त्याचा नंतर वापर याबद्दल तैवानच्या लोकांमध्ये जागरुकता वाढत आहे. त्यामुळे तैवानी सरकार याची नक्की दखल घेईल आणि त्याप्रमाणे कायद्यात सुधारणा करेल, असं अनेकींना वाटतं. या अटींमुळे सध्या तैवानमध्ये फक्त ८ टक्के स्त्रियाच त्यांची गोठवलेली स्त्रीबीजे लग्नानंतर वापरू शकतात. अमेरिकेत हेच प्रमाण ३८ टक्के इतकं आहे, असं तैवानमधल्या डॉक्टरांचं म्हणणं आहे. स्त्रीबीजे गोठवण्याची प्रक्रिया सध्या तरी खर्चिक आहे. सध्या तैवानमध्ये स्त्रीबीजे गोठवणाऱ्या केंद्रांची संख्या वाढली असली तरी अजूनही हे तंत्रज्ञान अनेकींच्या आवाक्याबाहेरचं आहे. ही सोपी प्रक्रिया नाही. मात्र हॉस्पिटलच्या वाऱ्या, विविध चाचण्या आणि स्त्रीबीजे गोठवण्याची प्रत्यक्ष प्रक्रिया यासाठी पैसा आणि शारीरिक कष्ट आहेत. मात्र सुदैवाची गोष्ट म्हणजे अनेकींचे कुटुंबीय तिच्यासोबत आहेत हे विशेष. 

तैवानमध्ये स्त्रियांच्या शिक्षणाचं प्रमाण झपाट्यानं वाढत आहे. करियरवर भर देणाऱ्या, आर्थिक स्वावलंबी स्त्रियांची संख्या वाढत आहे. फक्त मुलं होण्यासाठीच लग्न आवश्यक असतं, या समजातून आता त्या बाहेर पडत आहे. अविवाहित मुलींना मूल हवं आहे, पण त्यासाठी आयुष्यभर लग्नाच्या बंधनात अडकायचं नाही, त्यासाठी हा उत्तम पर्याय असू शकतो; पण त्यासाठी काही कालावधी जावा लागेल. खरं तर तैवानमध्ये अनेक क्रांतिकारी निर्णय घेण्यात आले आहेत. समलिंगी वा ‘सेम सेक्स मॅरेज’ला परवानगी देणारा तैवान हा आशियातील पहिला देश आहे. २०१९ मध्ये ‘सेम सेक्स मॅरेज’ला परवानगी देण्यात आली आणि सेम सेक्स मॅरेज कपल्सही मूल दत्तक घेऊ शकतात, असाही महत्त्वाचा निर्णय तैवानमध्ये घेण्यात आला. आता लवकरच अविवाहित तरुणीही गोठवलेल्या स्त्रीबीजांच्या माध्यमातून मुलं जन्माला घालू शकतात, असा निर्णय तैवान सरकार घेईल, अशी आशा अनेकींना आहे. अनेकदा करियरच्या मागे लागल्यानंतर काही वर्षांनी आई होण्याची इच्छा असूनही वैद्यकीय समस्यांमुळे होता येत नाही. त्यांच्यासाठीही हा दिलासा ठरू शकतो. 

पण हा मुद्दा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे, असं तैवानच्या सरकारचं मत आहे. यासाठी वैद्यकीय आणि कायदा क्षेत्रातील तज्ञांची सध्या मदत घेतली जात आहे. अनेक अविवाहित तरुणी सध्या करियरसाठी, आपलं स्वप्नं साकारण्यासाठी आई होण्याला ब्रेक देत आहेत. करियरमधली झेप आणि त्याच वेळी मुलांचं संगोपन यांच्यात या तरुणी करियरला प्राधान्य देत आहेत. आपल्या आजूबाजूला अनेक एकल माता आपण बघतो. काही जणींवर हे एकल मातृत्व लादलेलं असतं, तर काहीजणींनी ते आपणहून स्वीकारलेलं असतं. पण काही असलं तरी ती आई आपल्या मुलाचा किंवा मुलीचा सांभाळ सक्षमपणे करत असते. तैवानमधल्या तरुणीही हेच सिद्ध करू पाहत आहेत. लग्न म्हणजे फक्त मुलं जन्माला घालण्यासाठी केलेली तडजोड, या विचारातून बाहेर पडण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. 

ketakijoshi.329@gmail.com 

Story img Loader