Money lessons from female entrepreneurs :दरवर्षी ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो. प्रत्येक महिलेच्या अस्तित्वासाठी आणि सन्मानासाठी एक खास दिवस साजरा केला जातो. आज महिला पुरुषांच्या खांद्याला खादा लावून प्रत्येक क्षेत्रात काम करत आहे. महिलांना त्यांच्या हक्काबाबत जागरुक करणे आणि महिलांच्या स्वातंत्र्यासाठी मोलाची कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान करणे हा जागतिक महिला दिन साजरा करण्याचा मुख्य हेतु आहे. महिलाचा सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीचा उत्सव या दिवशी उत्साहात साजरा केला जातो.
महिलांच्या अंगी अनेक कलागुण आणि कौशल्य आहेत ज्याच्या मदतीने त्या आज विविध क्षेत्रात उंच भरारी घेत आहे. तुम्हालाही तुमच्या क्षेत्रात उंच भरारी घ्यायची असेल तर महिला उद्योजकांकडून काही महत्त्वाच्या गोष्टी शिकल्या पाहिजेत. आपल्यापैकी बऱ्याच जणांना आर्थिक गोष्टींबद्दल नेहमी चिंता वाटते आर्थिक नियोजनचे सुत्र आपण काही महिला उद्योजकाकडून जाणून घेऊ या. …
१) सातत्य महत्वाचे
“बचत करणे हे किती अवघड वाटत असले तरी त्यासाठी फक्त थोडेसे नियोजन करण्याची आवश्यकता असते. पण बचतीमध्ये सातत्याचे असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुमच्याकडे जे काही आहे त्यापैकी तुम्ही कदाचित १ टक्का बचत करू शकत असाल तरी हरकत नाही कारण दिर्घकाळानंतर हीच थोडी थोडी करून बाजूला ठेवलेली बचत कामी येते.”असे मॅडचॅटर ब्रँड सोल्यूशन्सच्या संस्थापक रचना बरुआ यांनी मिंट या वृत्तसंस्थेला माहिती देताना सांगितले.
हेही वाचा – एकेकाळी मिस इंडिया होण्याचे स्वप्न पाहत होती, आज आहे IAS अधिकारी! तस्कीन खानची यशोगाथा
२) दिर्घकाळ फायदा मिळेल अशी गुंतवणूक
बरुआ यांनी महिला दृष्टीकोनातून गुंतवणूक करण्याच्या महत्त्वावरही भर दिले.”सुरुवातीला ते क्षुल्लक वाटत असले तरी, प्रत्येक योगदान कालांतराने एकत्रित होते, शेवटी भविष्यामध्ये महत्त्वपूर्ण संपत्ती निर्माण करू शकते आणि आर्थिक ताण कमी करते.”
“दीर्घकालीन फायद्यांसाठी विविध उद्देश्यांसाठी बचत केली पाहिजे त्यामुळे हातात असलेल्या पैश्यांचे योग्य नियोजन करता येते आणि दिर्घकाळ गुंतवणूकीतून फायदे मिळतात. तुमची आर्थिक क्षमता पाहून जोखीम स्विकारा. जोखीम स्विकारण्यास तयार राहा पण जोखीम नेहमी विचार करून स्वीकारा:” असा सल्ला बूमलेट ग्रूपच्या व्यवस्थापकीय संचालक आणि सह-संस्थापक प्रीती सिंग यांनी सांगितले आहे.
३) आर्थिक साक्षरता महत्त्वाची
उद्योजक आणि कवयित्री,मेघा चोप्रा यांनी आर्थिक साक्षरतेचे महत्त्व अधोरेखित केले.”महिला आर्थिकदृष्ट्या साक्षर असणे गरजेचे आहे. विशेषत: उद्योग क्षेत्रात माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी गुंतवणूकमधील गुंतागंत समजून घेण्यासाठी, अर्थसंकल्प आणि रोख रक्कमेचा प्रवाहाचे व्यवस्थापन कसे करावे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. दीर्घकाळ टिकणारा व्यवसाय सुरु करायचा असेल तर कोणालाही गुंतवणूक, बजेट आणि रोख रक्कमेचे व्यवस्थापन समजून घेणे आवश्यक आहे. पटकन निर्णय घेण्याचा आणि उद्योजकतेच्या आव्हानांवर सामना करण्याचा मजबूत पाया आर्थिक साक्षरतेतून मिळतो,”