‘टॉयलेट एटिकेट’ या शब्दांचं आपल्याकडे बहुतेक जणांना वावडं असतं! सार्वजनिक ठिकाणची प्रसाधनगृह (टॉयलेटस्) तर सोडाच, पण अगदी ठिकठिकाणच्या ऑफिसमधल्या टॉयलेटस् ची किळसवाणी अवस्था पाहिली तरी याचा प्रत्यय येतो. अर्थात आता आपल्याला टॉयलेटसच्या स्वच्छतेबाबत बोलायचे नाहीये! तो विषय बाजूला ठेवूनसुद्धा असे काही टॉयलेट एटिकेटस् आहेत जे खास प्रत्येक स्त्रीने अंगिकारायलाच हवेत!

हल्ली बहुतेक घरं आणि ऑफिसमध्ये पाश्चिमात्य प्रकारची टॉयलेटस असतात. आणि दिवसातून किमान ६-७ वेळा तरी त्याचा वापर करण्याची वेळ येतेच. तुमचे कधी याकडे लक्ष गेलेय का, की आपल्याकडे फारच कमी जणांच्या घरी टॉयलेटमध्ये टिश्यू पेपरचा रोल असतो. कित्येक ऑफिसमध्येही टॉयलेटमध्ये ‘टॉयलेट पेपर’ उपलब्ध नसतोच आणि तरीही कुणीही स्त्री त्याबद्दल खळखळ करत नाही किंवा तक्रारही करत नाही… पण तुम्हाला हे माहिती आहे का, की मूत्रविसर्जनानंतर विशेषत: स्त्रियांनी वापरायलाच हवी अशी वस्तू म्हणजे टॉयलेट पेपर!

Viral Video of Desi Jugaad
VIRAL VIDEO: जुगाड तर बघा! बॅनर लावून तयार केली सायकल, तीन मित्र बसले ऐटीत अन् निघाली स्वारी
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Viral Video Of Girls Hostel
आनंदच निराळा…! अंघोळीसाठी रांगा, केसांत ब्रश अन्… VIRAL VIDEO पाहून डोळ्यांसमोर येईल तुमची ‘हॉस्टेल लाईफ’
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
Shortage of public toilets in Pune city
वानवा.. स्वच्छतागृहांची
Comprehensive sanitation campaign begins in slums in Thane
ठाण्यातील झोपडपट्ट्यांमध्ये सर्वंकष स्वच्छता मोहीमेला सुरूवात
Shocking video Bat Spotted Eating Chikoo In Pune Market; Video Raises Health Concerns
पुणेकरांनो तुम्हीही बाजारातून फळं घेताय का? थांबा! ‘हा’ प्रकार पाहून पायाखालची जमीन सरकेल; VIDEO एकदा पाहाच
how to remove bad smell from bathroom
बाथरूम आणि टॉयलेटमधील दुर्गंधी दूर करण्यासाठी वापरा ‘ही’ घरगुती ट्रिक

बहुतेक स्त्रिया मूत्रविसर्जनानंतर टॉयलेटमधल्या फॉसेट पंपचा (त्याला काही लोक ‘बम गन’सुद्धा म्हणतात!) वापर करतात. पाण्याने मूत्रविसर्जनाची जागा स्वच्छ ठेवण्यासाठीचा हा उपाय. ते योग्यच. पण टिश्यू पेपरचं काय?…आता अनेक जणी म्हणतील,“पण पाणी वापरलं ना आम्ही?… आणखी टिश्यू पेपरची गरजच काय?…” गरज आहे हो! पाणी वापरलं तरी ती जागा कोरडी ठेवणं गरजेचं आहे. डॉक्टरसुद्धा याला दुजोरा देतात.

‘नो टिश्यू, नो टुशी!’

तुम्ही ‘फ्रेन्डस्’ ही लोकप्रिय मालिका पाहिलीय का? त्यातली रेचेल सार्वजनिक ठिकाणच्या टॉयलेटमध्ये टिश्यू रोल नाही म्हणून तिथे जायचे नाकारते आणि बाणेदारपणाने म्हणते, “नो टिश्यू नो टुशी!” (म्हणजे, जिथे टिश्यू उपलब्ध नसेल तिथे मी मुळीच टेकवायची नाही!) यातला विनोदाचा भाग सोडून दिला, तरी टिश्यू रोल ही टॉयलेटमधली महत्त्वाची वस्तू आहे बरं! यातला शास्त्रीय भाग जाणून घेऊ या.

women toilet
women toilet

अनेक स्त्रिया वारंवार ‘युरिन इन्फेक्शन’ झाल्याची तक्रार करत असतात. मूत्र विसर्जनासाठीच्या मुळातल्याच शारीरिक रचनेमुळे स्त्रियांना तो भाग नीट स्वच्छ ठेवला नाही तर ‘युरिन इन्फेक्शन’ होण्याचा धोका अधिक असतो. यासाठी अनेक स्त्रिया वेस्टर्न टॉयलेटमध्ये गेल्यावर त्या जागी फॉसेट पंपाचा वापर करतात. पाण्याने ती जागा धुतली, तरी तो भाग न टिपल्यास बराच वेळ ओलसरच राहतो. ओलसर आणि उबदार जागी सूक्ष्मजंतूंची वाढ लगेच होते. यामुळे ती जागा आणि पँटीचा भाग ओलसर राहिल्यास युरिन इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते.

हा धोका कमी करण्यासाठीचा चांगला उपाय म्हणजे पाण्याने ती जागा धुतल्यावर दुहेरी किंवा तिहेरी टिश्यू पेपरने हलक्या हाताने पुसून तो भाग कोरडा ठेवणे. पाणी वापरायचे नसेल, तर तुम्ही नुसत्या टिश्यू पेपरचा वापरही करू शकता. नंतर टिश्यूपेपर व्यवस्थित फ्लश करावेत. क्वचित कुठे फ्लशिंगची समस्या असल्यास वापरलेले टिश्यू पेपर टाकायला वेगळा कचरा डबा ठेवलेला असतो. हल्ली पर्यावरणपूरक टिश्यू पेपरही मिळू लागले आहेत.

Woman in toilet
Woman in toilet

प्रवासात काय करावे?

प्रवासात सगळीकडे आपल्या मनासारखे टॉयलेटस उपलब्ध नसतात. बहुतेक ठिकाणी पाण्याचीच वानवा असते, मग टिश्यू पेपर मिळणे दुरापास्तच. अशा परिस्थितीत प्रवास करताना स्वत:कडे पँटच्या/ कुडत्याच्या खिशात वा पर्समध्ये एक छोटीशी प्लास्टिकची झिप लॉक बॅग ठेवता येईल. त्यात टॉयलेट पेपरचे दुहेरी वा तिहेरी तुकडे पुरेशा संख्येनं ठेवले, तर प्रवासात सोय होईल. वापरून झाल्यावर त्या ठिकाणी फ्लशची सोय नसल्यास वापरलेले टिश्यू पेपर साध्या कागदात नीट गुंडाळून कचरा डब्यामध्ये टाकता येतील.

प्रवासात ‘पँटी लायनर्स’ वापरणं हाही एक उपाय आहे. पँटी लायनर्स अगदी पातळ आणि खूपच छोट्याशा आकाराच्या सॅनिटरी पॅडसारखे असते. त्यात ओलावा शोषून घेतला जातो. सॅनिटरी नॅपकिन प्रमाणेच त्याची विल्हेवाट लावली जाते.

Story img Loader