डॉ. शारदा महांडुळे
टोमॅटो ही फळभाजी संपूर्ण जगात आवडीने खाल्ली जाते. लालबुंद गोल गरगरीत, लंबगोल पाणीदार असे हे टोमॅटो सर्वासाठीच उपयुक्त आहेत. हिंदीमध्ये टमाटर, इंग्रजीमध्ये टोमॅटो, संस्कृतमध्ये रक्तफल तर शास्त्रीय भाषेमध्ये सोलॅनम लायकोपरसिकम या नावाने ओळखली जाणारी ही वनस्पती सोलॅनसी कुळातील आहे. टोमॅटो हा मूळचा दक्षिण अमेरिकेतील आहे. नंतर तो मलेशिया, भारत, अमेरिका, आफ्रिका असा संपूर्ण जगामध्ये आला. संपूर्ण जगात बटाट्या खालोखाल जास्त पिकवले जाणारे टोमॅटो हे लोकप्रिय पीक आहे.

औषधी गुणधर्म

कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस ‘अ’, ‘क’ जीवनसत्त्व, प्रथिने, आद्र्रता, खनिजे, तंतुमय व पिष्टमय पदार्थ अशा सर्व घटकांनी टोमॅटो परिपूर्ण आहे. आयुर्वेदानुसार टोमॅटो हे अग्निप्रदीपक, पाचक, सारक, रक्तशोधक मधुर आम्ल गुणात्मक, रुचकर, हृदय, लघु स्निग्ध व उष्ण वीर्यात्मक आहे. टोमॅटोमध्ये कमी उष्मांक असल्यामुळे मधुमेहींसाठी, हृदयरोग्यांसाठी एक वरदानच आहे.

ayurvedic experts to hold seminar on garbhavigyan event at iit bombay
आयआयटी प्रांगणात ‘गर्भविज्ञान’ धडे; उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून विरोध
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Farmers demand geographical classification for organic vaal in Chirner uran news
उरण: चिरनेरच्या सेंद्रिय गोड वालांना हवे भौगोलिक मानांकन
Rose Winter Care: 7 Tips To Take Care of Your Rose Plants In Cold Weather
हिवाळ्यातसुद्धा गुलाबाच्या झाडावर उमलतील टवटवीत फुले; रिझल्ट बघून आनंदून जाल, बहरून जाईल घर, जाणून घ्या टीप्स
strawberry navi Mumbai marathi news
नवी मुंबई : एपीएमसीत लालचुटूक स्ट्रॉबेरींचा बहर, दरातही घसरण
Nashik, Kumbh Mela , meeting ,
नाशिक : कुंभमेळा तयारीसाठी लवकरच स्थानिक पातळीवर बैठक, संशयास्पद भूसंपादनाची चौकशी
Kalyan-Dombivli Municipal corporation,
महाराष्ट्रातून कोठूनही पाहता येणार कल्याण-डोंबिवली पालिकेच्या बांधकाम परवानग्या
What happens to your body if you eat raw onions every day
तुम्ही रोज कच्चा कांदा खाल्ला तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात…

हेही वाचा: मासिक स्रावाच्या नियमितपणासाठी पपई

उपयोग

० आहारामध्ये टोमॅटो हा उत्तम औषधी गुणयुक्त आहारीय पदार्थ आहे. टोमॅटोची भाजी, रस काढून सूप, तर जेवणामध्ये टोमॅटो कोशिंबीर, सॅलॅड अशा अनेकविध प्रकारांनी टोमॅटो वापरण्यात येतो.
० टोमॅटोमध्ये उष्मांकाचे प्रमाण तसेच कबरेदकाचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे रक्तदाब, हाय कोलेस्टेरॉल, हृदयविकार, मधुमेह या विकारांमध्ये टोमॅटोचा औषधासारखा वापर करता येतो. वरील विकार असणाऱ्यांनी टोमॅटो नियमितपणे आहारात वापरावा.
० अति वजन असणाऱ्या व्यक्तींनी वजन कमी करण्यासाठी आहारामध्ये नियमितपणे टोमॅटोचे सेवन करावे. टोमॅटो खाल्ल्याने पोट भरल्याची भावना निर्माण होते व त्यामध्ये कमी उष्मांक असल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
० टोमॅटोमध्ये ‘अ’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्याने रातआंधळेपणा, दृष्टिदोष या विकारांवर टोमॅटो उपयुक्त आहे. हा दोष असणाऱ्या व्यक्तीने जेवणामध्ये रोज १ टोमॅटो नियमितपणे खावा. तसेच टोमॅटोची मूठभर पाने कुस्करून १ लिटर पाण्यात उकळावीत व हे पाणी दिवसातून तीन वेळा जेवण्यापूर्वी अर्धा कप प्यावे. यामुळे दृष्टीला तेज प्राप्त होते.
० रक्ताची कमतरता (अ‍ॅनिमिया) असणाऱ्या रुग्णांनी नियमितपणे रोज २ टोमॅटो खावेत. यामुळे रक्ताचे प्रमाण प्राकृत होण्यास मदत होते.
० टोमॅटोच्या १ कप रसामध्ये १००० इ.यु. ‘अ’ जीवनसत्त्व असते. तसेच ‘क’ जीवनसत्त्वही भरपूर प्रमाणात
असते. त्यामुळे यकृताच्या विकारांमध्ये टोमॅटोचा रस गुणकारी आहे.
० टोमॅटोमध्ये मॅलिक आणि सायट्रिक अ‍ॅसिड भरपूर प्रमाणात असल्याने टोमॅटो खाल्ल्याने लहान व मोठे आतडे अधिक कार्यक्षम होते व शरीरात साचलेला घट्ट मल पुढे ढकलण्यास मदत होते. म्हणून मलावरोधाची तक्रार असणाऱ्यांनी टोमॅटोचे सेवन नियमितपणे करावे.
० पिकलेल्या टोमॅटोचा ताजा रस लहान मुलांना २ ते ३ वेळा दिल्यास मुले निरोगी, बलवान व सुदृढ होतात.
टोमॅटोच्या रसात अर्जुनसाल चूर्ण व साखर घालून अवलेह बनवून तो नियमितपणे खाल्ल्यास हृदयविकार कमी होतो.

सावधानता
टोमॅटो आरोग्यास लाभदायक असला तरी मूतखडा, संधिवात, आमवात व आम्लपित्त असणाऱ्या रुग्णांनी टोमॅटो सेवन करू नये.

 sharda.mahandule@gmail.com

Story img Loader