Countries Led by Women : गेल्या काही वर्षांपासून जगभरातील सक्रिय राजकारणात महिलांचा सहभाग वाढत आहे. केवळ पक्षीय पदे न घेता देशाच्या निर्णय प्रक्रियेतही सहभागी होत आहेत. एवढंच नव्हे तर देशाच्या सर्वोच्च पदीही विराजमान झाल्या आहेत. अमेरिकेत ५ नोव्हेंबर रोजी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक आहे. या निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाच्या कमला हॅरिस शर्यतीत आहेत. त्या ही निवडणूक जिंकल्या तर त्या अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्षा ठरणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आतापर्यंत ५९ राष्ट्रांचं नेतृत्व महिलांच्या हाती राहिलं आहे. १९६० मध्ये श्रीलंकेच्या सिरिमावो बंदरानायके या श्रीलंकेच्या आणि जगातील पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. तर आता १३ महिला नेत्यांच्या हाती देशाची सत्ता आहे. यापैकी ९ महिला या त्यांच्या पदावर कार्यरत असलेल्या पहिल्या महिला आहेत. यामध्ये पेरूच्या दिना बोलुआर्टे आणि इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांसारख्या महिला नेत्यांचा समावेश आहे.

हेही वाचा >> Afghanistan Taliban Rules For Women : आता स्त्रियांच्या आवाजावरही बंदी, तालिबानच्या नव्या फतव्यात महिलांवर जाचक निर्बंध!

स्वित्झर्लंड आघाडीवर

महिला नेतृत्वात स्वित्झर्लंड आघाडीवर आहे. स्विस कॉन्फेडरेशनच्या अध्यक्षपदी आतापर्यंत पाच महिला निवडून आल्या आहेत; फिनलंडमध्ये चार महिला सर्वोच्च स्थानी होत्या, तर आइसलँडमध्ये तीन महिलांनी सर्वोच्च पद भूषवलं आहे. त्यापैकी Vigdís Finnbogadóttir यांनी १९८० ते १९९६ या काळात जगातील पहिल्या निवडून आलेल्या महिला अध्यक्ष म्हणून इतिहास रचला.

भारतातही आतापर्यंत तीन महिला नेत्या सर्वोच्च स्थानावर

भारतात आतापर्यंत तीन महिला सर्वोच्च स्थानी पोहोचल्या आहेत. इंदिरा गांधी या देशाच्या पहिल्या पंतप्रधान होत्या. १९६६ ते १९८४ या काळात त्यांनी देशाचं नेतृत्त्व केलं. तर, डॉ. प्रतिभा पाटील (२००७-२०१२) या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून नियुक्त झाल्या. तसंच, सध्याच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या भारताच्या पहिल्या आदिवासी समाजातील राष्ट्रपती आहेत.

प्यू संशोधन केंद्रानुसार, संयुक्त राष्ट्रसंघाच्या १९३ सदस्य राष्ट्रांपैकी १३ देशांमध्येच महिलांचं नेतृत्व आहे. तर त्यापैकी एक तृतीयांश देशांमध्येही कधीतरी महिला नेत्या होत्या. संशोधनात असे दिसून आले आहे की जेव्हा स्त्रिया विधानसभेच्या सदस्या बनतात तेव्हा त्या पारंपरिक नियमांना आव्हान देऊन धोरणांवर प्रभाव टाकण्यास प्रवृत्त करतात. दरम्यान, आज महिला समानता दिन साजरा करत असातना २५ देशांमध्ये १० देशांमध्ये स्त्रिया प्रमुख आहेत. तसंच, देशातील राज्य सरकारांमध्येही महिलांचं वर्चस्व आहे.

क्रमांकदेशविद्यमान नेतृत्त्वपद१९४६ पासून महिला नेतृत्त्व
आईसलँडHalla Tómasdóttirराष्ट्राध्यक्ष
माल्टाMyriam Spiteri Debonoराष्ट्रपती
मॉलदोवाMaia Sanduराष्ट्रपाती
लिथुनिआIngrida Šimonytėपंतप्रधान
भारतDroupadi Murmuराष्ट्रपती
डेन्मार्कMette Frederiksenपंतप्रधान
थायलंडPaetongtarn Shinawatraपंतप्रधान
इटलीGiorgia Meloniपंतप्रधान
जॉर्जियाSalome Zourabichviliराष्ट्राध्यक्ष
१०इथिओपियाSahle-Work Zewdeराष्ट्राध्यक्ष
स्रोत: Women Power Index, Council of Foreign Relations
मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Top 10 countries led by women ten countries having women at high post chdc sgk