Top 10 self-made women billionaires in India 2024 : भारताने या वर्षी २०२४ मध्ये संपत्ती निर्मितीमध्ये एक विलक्षण वाढ पाहिली आहे. जागतिक संपत्ती निर्मितीच्या प्रक्रियेत भारताने चांगली कामगिरी केली आहे. हुरुन इंडिया रिच यादीत अति श्रीमंतांच्या श्रेणीत २२० व्यक्तींचा समावेश झाला आहे. त्यामुळे भारताच्या एकूण संपत्तीत हजार कोटींहून अधिक वाढ झाली आहे. याच यादीत अनेक महिला उद्योगपतींचाही समावेश झाला आहे.

झोहो कॉर्पच्या सह-संस्थापक राधा वेंबू या यादीत आघाडीवर आहेत. त्यांची एक जागतिक तंत्रज्ञान कंपनी असून या कंपनीमार्फत व्यवसायांसाठी सॉफ्टवेअर सोल्यूशन्स दिले जातात. ४७ हजार ५०० कोटींची निव्वळ संपत्ती असलेली, वेम्बू ही भारतातील सर्वात श्रीमंत महिला बनली आहे. त्यानंतर Nykaa च्या संस्थापक फाल्गुनी नायर यांचा क्रमांक लागत. २०२ रोजी लॉन्च केलेल्या नायका संकेतस्थळाच्या माध्यमातून त्यांची आर्थिक उन्नती झाली. तिसऱ्या क्रमांकावर लेन्सकार्टच्या नेहा बन्सल यांचा समावेश आहे. या सर्वांत तरुण महिला उद्योजिका आहेत. बॉलीवूड अभिनेत्री जुही चावलाचाही या यादीत आहे. कोलकाता नाईट रायडर्स क्रिकेट संघाचे सहसंस्थापक असलेली जुही चावलाने उद्योग क्षेत्रात पाऊल ठेवले आहे.

Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
Vasai, bhayandar railway station suicide, father and son suicide, Jai Mehta, dual marriage, Bhayandar railway station, southern girl
वसई : पिता पुत्राचे रेल्वे रूळावरील आत्महत्येचे गूढ उकलले; मुलाचे प्रेमसंबंध उघड
Rupali Patil Thombare VS Rupali Chakankar
NCP Ajit Pawar Group : “एकाच महिलेला किती पदे देणार?”, अजित पवार गटात वादाची ठिणगी? रुपाली पाटील-ठोंबरे विरुद्ध चाकणकर वाद चव्हाट्यावर
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
Hungama 2 actress Pranitha Subhash blessed with baby boy
बॉलीवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, तीन वर्षांपूर्वी बिझनेसमनशी केलंय लग्न
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
malaika arora father anil arora suicide
अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांची आत्महत्या, इमारतीवरून उडी घेत संपवलं जीवन

हेही वाचा >> India’s Top 10 Billionaire : अंबानींपेक्षा अदाणी श्रीमंत, भारतातील अब्जाधिशांची यादी जाहीर; कोण कितव्या स्थानावर?

झोहोच्या राधा वेंबू या ४७ हजार ५०० कोटींसह आघाडीवर आहेत, त्यानंतर Nykaa च्या फाल्गुनी नायर आणि Arista Networks च्या जयश्री उल्लाल या दोघी ३२ हजार कोटींसह अनुक्रमे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. यासह देशभरातील इतर महिला उद्योगपतींची नावे पाहुयात.

क्रमांकनावकंपनीनेट वर्थ (कोटींमध्ये)
राधा वेंबूZoho४७,५००
फाल्गुनी नायर आणि कुटुंबNykaa३२, २००
जयश्री उल्लालArista Networks३२, १००
किरण माझुमदार शॉBiocon२९,०००
नेहा नारखेडे आणि कुटुंबConfluent४,९००
जुही चावला आणि कुटुंबKnight Riders Sports४, ६००
इंद्रा के नुयीPepsico३,९००
नेहा बंन्सालLenskart३,१००
देविता राजकुमार सराफVU Technologies३,०००
१०कविता सुब्रमण्यमUpstox२,७००

अदाणी ठरले सर्वांत श्रीमंत व्यक्ती

सुमारे ११.६ लाख कोटी रुपयांच्या मालमत्तेसह अदानी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांनी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांना मागे टाकत पुन्हा अव्वल स्थान पटकावले आहे. हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालातील आरोपांमुळे अदानी समूहाच्या समभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पडझड झाली होती. मात्र गेल्यावर्षी त्यांची मालमत्ता ९५ टक्क्यांनी वधारून ११.६ लाख कोटी रुपयांवर पोहोचली. ज्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा अंबानींना मागे सारत देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा किताब पटकावला आहे