बॉलीवूडमध्ये वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट बनताना दिसत आहेत. चित्रपट हिट किंवा फ्लॉप ठरण्यामागे केवळ चित्रपटाची कथाच पुरेशी नसते तर त्यातील संवाद, कलाकारांचा अभिनय आणि मुख्य करुन दिग्दर्शकाची नजरही तेवढीच महत्वाची असते. बॉलीवूडमध्ये दिग्दर्शन क्षेत्रात आत्तापर्यंत पुरुषी वर्चस्व बघायला मिळत होतं. चित्रपटांमध्ये महिलांचा सहभाग केवळ अभिनेत्री म्हणून मिरवण्यापुरताच असायचा.
हेही वाचा- मासिक पाळीदरम्यान महिलांना पगारी सुट्यांची आवश्यकता आहे? महिलांनीच दिले उत्तर
मात्र, आता काळ बदलला आहे. चित्रपटाच्या संबंधित प्रत्येक विभागात आज महिला उत्तम काम करताना दिसत आहेत. दिग्दर्शन क्षेत्रातही महिलांनी आपली वेगळी छाप निर्माण केली आहे. २०२३ मध्ये असे अनेक चित्रपट होऊन गेले ज्याचे दिग्दर्शन महिलांनी केले होते. काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले तर काही चित्रपट फ्लॉप. मात्र, या चित्रपटाच्या माध्यमातून महिलांनी दिग्दर्शन क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
१ सॅम बहादूर
बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा ‘सॅम बहादुर’ चित्रपट चांगलाच गाजला. या चित्रपटात लष्करी अधिकारी सॅम माणेकशॉ यांची कथा दाखवण्यात आली आहे. बॉलीवूडमधील प्रसिद्धी दिग्दर्शिका मेघना गुलजार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर अभिनेता विकी कौशलने या चित्रपटात सॅम माणेकशॉ यांची भूमिका साकारली आहे. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या राजी चित्रपटाचे दिग्दर्शनही मेघना गुलजार यांनी केले आहे. सॅम बहादूर चित्रपटाचे १३ हून अधिक शहरांमध्ये चित्रीकरण करण्यात आले आहे.
२ ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’
अभिनेत्री राणी मुखर्जीचा ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली. बॉक्स ऑफिसवर जरी या चित्रपटाने चांगली कमाई केली नसली तरी या चित्रपटाची कथेने अनेकांना प्रभावित केले. आशिमा चिब्बर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ या चित्रपटाची कथा नॉर्वेमध्ये राहणाऱ्या एका भारतीय जोडप्यावर आधारित आहे. युरोपमधील देशांमध्ये पालकांना मुलांचे नीट संगोपन करण्यास सक्षम नसल्यास त्या मुलांना सरकारच्या बाल कल्याण विभागाकडे देण्यात येते. या विभागातर्फ ठराविक वर्षांपर्यंत त्यांच्या संगोपनाची काळजी घेतली जाते. पालकांकडून बळजबरीने त्यांची मुले हिसकावून फॉस्टर केअरमध्ये पाठवण्याचे प्रकार तेथील काही देशांमध्ये सुरु आहेत. अशाच एका प्रकारणावर राणी मुखर्जीचा हा चित्रपट आधारलेला आहे.
हेही वाचा- ‘जावई माझा भला!’ महेंद्रसिंग धोनीने बायको अन् सासूलाच बनवले ८०० कोटींच्या कंपनीचे सीईओ
३ लस्ट स्टोरीज् – २
काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झलेल्या लस्ट स्टोरीज’ २ या चित्रपटाने एकच खळबळ उडून दिली. नेटफ्लिक्स प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात स्त्रियांची कामेच्छा हा विषय मांडण्यात आला होता. पाच वर्षांपूर्वी या चित्रपटाचा पहिला भाग ‘लस्ट स्टोरीज’ प्रदर्शित झाला होता. त्यावेळेस या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली होती.
यातल्या चार कथांमध्ये कोंकणा सेन शर्मा दिग्दर्शित कथा- ‘द मिरर’ सर्वोत्तम आणि संवेदनशील असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. या कथेत मराठी अभिनेत्री अमृता सुभाषची प्रमुख भूमिका होती.
४ ‘मिसेस अंडरकव्हर’
दिग्दर्शित ‘मिसेस अंडरकव्हर’ चित्रपटाने सगळयांचे लक्ष वेधून घेतले. या चित्रपटात अभिनेत्री राधिका आपटेची मुख्य भूमिका होती. या चित्रपटात राधिकाने दिवसा एक गृहिणी आणि रात्री अंडरकव्हर एजंटची भूमिका साकारली होती.
५ ‘ज्विगाटो’
कॉमेडियन कपिल शर्माची मुख्य भूमिका असलेला ‘ज्विगाटो’ चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन नंदिता दास यांनी केले होते. या चित्रपटात कपिलने एका डिलीव्हरी बॉयचे पात्र साकारले होते.