स्त्री-पुरुष समानता म्हणजे काय रे भाऊ?, असा प्रश्न तुम्ही कोणाला विचारला तर याबाबत प्रत्येकजण आपल्या परीने उत्तर देताना तुम्हाला दिसेल. आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषांबरोबर स्त्रियादेखील आघाडीवर आहेत. पण देश, समाज कितीही प्रगत झाला तरी काही अंशी स्त्रियांना समान वागणूक मात्र मिळत नाही अशी तक्रार कानी पडते. असे असले तरी बऱ्याचदा स्त्रिया या तक्रारींना आपल्या कामगिरीमधून चोख उत्तर देताना दिसतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
२६ ऑगस्ट रोजी ‘महिला समानता दिवस’ साजरा केला जातो. कायद्याने महिलांना अनेक अधिकार प्रदान केले. त्यातीलच एक महत्त्वाचा अधिकार म्हणजे मतदानचा. २६ ऑगस्ट १९२० रोजी पहिल्यांदा महिलांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आणि याच स्मरणार्थ ‘महिला समानता दिवस’ साजरा केला जातो. महिला समानता म्हणजे काय? स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात कशाप्रकारे कर्तृत्व सिद्ध करू शकतात, चार भिंतीमध्ये राहून ‘फक्त चूल आणि मूल ‘ न सांभाळता महिलांनी हिंमतीने कशाप्रकारे जगात वावरलं पाहिजे याचा शोध या निमित्ताने घ्यायला हवा.
बॉलीवूडमध्ये प्रदर्शित झालेल्या काही चित्रपटांनीही हा विषय यशस्वीरीत्या हाताळला. यामधीलच काही निवडक चित्रपट, याप्रमाणे…
गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल
‘गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल’ या चित्रपटामध्ये अभिनेत्री जान्हवी कपूरची मुख्य भूमिका होती. या चित्रपटामध्ये गुंजन सक्सेनाची कथा दाखवण्यात आली आहे. गुंजन या भारतीय हवाई दलातील पहिल्या महिला वैमानिक आहेत. त्या कारगिल युद्धाचा एक महत्त्वपूर्ण भाग होत्या. १९९९मध्ये झालेल्या या युद्धात त्यांनी सैनिकांचे प्राण वाचवले. गुंजन यांनी यादरम्यान अनेक आव्हानांचा सामना केला. कित्येक अडचणी आल्या मात्र गुंजन सक्सेना मागे हटल्या नाहीत. त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल त्यांना ‘शौर्य चक्र’ प्रदान करून गौरविण्यात आले.
थप्पड
एका सामान्य महिलेची असामान्य गोष्ट सांगणारा चित्रपट म्हणजे ‘थप्पड’. अभिनेत्री तापसी पन्नूची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट २०२०मध्ये प्रदर्शित झाला. स्वतःवर झालेला अन्याय सहन न करण्याचा निर्धार केलेल्या एका महिलेची ही गोष्ट आहे. पती, कुटुंब आणि घर संसारात रमलेली एक गृहिणी स्वतःचं अस्तित्व विसरून जाते. गृहिणीवर उचलला जाणारा हात म्हणजे घरगुती हिंसा असते याची याची जाणीव करून देणारा हा चित्रपट आहे.
मेरी कोम
आजवर बॉलिवूडमध्ये खेळाडूंच्या जीवनावर आधारित चित्रपटही प्रदर्शित झाले. खरं तर या नव्या ट्रेण्डची सुरुवात ‘मेरी कोम’ या चित्रपटामुळे झाली. या चित्रपटामध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्राने मुख्य भूमिका साकारली. विशेष म्हणजे हा चित्रपट केवळ बॉक्स ऑफिसवरच गाजला नाही. तर या चित्रपटाने अनेक पुरस्कारही पटकावले. विशेष म्हणजे मेरी कोम यांचा संपूर्ण प्रवास प्रेक्षकांसाठी प्रेरणादायी ठरला.
लिपस्टिक अंडर माय बुरखा
लिपस्टिक अंडर माय बुरखा हा दिग्दर्शक अलंकार श्रीवास्तव यांचा हा चित्रपट २०१६ साली प्रदर्शित झाला होता. भोपाळमधील एका गल्लीबोळात राहणाऱ्या चार महिलांची कथा या चित्रपटामध्ये दाखवण्यात आली. समाजाच्या रूढी परंपरांना छेद देऊन नवीन आणि मोकळं आयुष्य जगायचं कसं हे हा चित्रपट पाहिलं की लक्षात येतं. या चित्रपटाला अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं.
दंगल
बॉलिवूडमधील सुपरहिट चित्रपटांच्या यादीमध्ये ‘दंगल’चा देखील समावेश आहे. कुस्ती हा खेळ फक्त पुरुषांसाठी नसून महिला देखील या खेळामध्ये उत्तम कामगिरी करू शकतात हे या चित्रपटाने दाखवून दिलं. महावरी सिंह फोगट यांनी आपल्या मुलींना कुस्तीच्या आखाड्यात कशाप्रकारे तयार केलं? याची कथा दंगलमध्ये दाखवण्यात आली. स्वतः वडिलांनीच आपल्या मुलींना या खेळामध्ये पुढे जाण्यासाठी प्रेरणा दिली असं या चित्रपटामध्ये पाहायला मिळालं. समाजासाठी हा चित्रपट म्हणजे उत्तम धडाच ठरला.