Tafe Success story: : वाहतूक व्यवसायाच्या क्षेत्रातील पुरुषांची नावे तुम्हाला परिचित असतीलच. परंतु, आज आम्ही तुम्हाला अशा एका महिलेची ओळख करून देणार आहोत, ज्यांना “भारताची ट्रॅक्टर क्वीन” म्हणून ओळखले जाते. आपल्या जिद्द आणि प्रबळ इच्छाशक्तीमुळे त्यांनी वाहतूक क्षेत्रात आपले नाव कमावले आहे.
भारताची ‘ट्रॅक्टर क्वीन’ म्हणून ओळखल्या जाणार्या, मल्लिका श्रीनिवासन TAFE (Tractors and Farm Equipment Limited) च्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. TAFE ही भारतातील दुसरी सर्वात मोठी ट्रॅक्टर उत्पादक कंपनी आहे. मल्लिकाने वडिलांच्या सल्ल्यानुसार त्यांच्या कौटुंबिक व्यवसायातून तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिच्या कठोर परिश्रम आणि धाडसी निर्णयांमुळे कौटुंबिक व्यवसायाला लाखो डॉलर्सच्या व्यवसायापर्यंत पोहचवले. पद्मश्री पुरस्कारप्राप्त श्रीनिवासनने जगाला दाखवून दिले आहे की, कोणतेही स्वप्न पूर्ण होऊ शकते. ट्रॅक्टर व्यवसायाची त्या खरी मल्लिका(रानी) आहे. त्यांच्या कंपनीच्या स्वस्त ट्रॅक्टरमुळे मध्यमवर्गीय आणि शेती करणाऱ्या लोकांना खूप दिलासा मिळाला आहे.
मल्लिका श्रीनिवासनचे सुरुवातीचे जीवन आणि कारकीर्द (Early Life And Career Of Mallika Srinivasan )
१९५९ मध्ये जन्मलेल्या मल्लिका श्रीनिवासन यांनी मद्रास विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतले आणि युनायटेड स्टेट्समधील व्हार्टन येथून एमबीए केले. मल्लिका भारतात परत आल्यावर, तिच्या वडिलांनी तिला TAFE या कौटुंबिक कंपनीत काम करण्याचा सल्ला दिला. हा व्यवसाय तिच्या आजोबांनी १९६० मध्ये सुरू केला होता. १९८६ मध्ये मल्लिका कौटुंबिक व्यवसायात सामील झाली. जेव्हा तिने ग्राहकांबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला ग्राहकांची गरज लक्षात आली, ट्रेंड ओळखले आणि कंपनीची उत्पादने त्या संबंधित आहेत याची खात्री केली
मल्लिका श्रीनिवासन यांनी छोट्या शेतकर्यांच्या कामाची पद्धत कशी बदलली (How Mallika Srinivasan Transformed The Way Small Farmers Work )
मल्लिका श्रीनिवासन यांना मध्यमवर्ग आणि शेतकरी लोकसंख्येबद्दल गंभीर चिंता होती. मध्यमवर्गीय लोकांना भेडसावणाऱ्या समस्यांचा तिने नेहमीच विचार केला. लहान शेतकर्यांच्या कामाच्या पद्धतीमध्ये बदल घडवून आणतील आणि अगदी सामान्य खेड्यांचे स्वरूप देखील बदलेल असे उपाय शोधण्यावर तिचे नेहमी लक्ष असे. प्रत्यक्षात शेतात टॅक्टर चालवणाऱ्यांची मत जाणून घेण्याची संधी मिळण्यासाठी मल्लिकाने सर्व प्रयत्न केले कारण तिला त्यांच्या मतांची कदर केली होती. ग्रामीण भागातील शेतकरी, कामगारांना भेट देताना, तिने नेहमी चहाच्या दुकानांवर थांबून स्थानिकांशी संवाद साधला. शेती पद्धतींच्या संदर्भात कोणते उपाय लागू केले आहेत हे जाणून घेण्यासाठी वेळ दिला. व्यवसायात तिने कंपनीच्या उत्पादनांच्या किंमती परवडणाऱ्या असतील, शेतकरी-संबंधित उत्पादनांच्या निर्मितीवर लक्ष केंद्रित केले जेणेकरून त्यांना फायदा होईल.
मल्लिका श्रीनिवासन यांनी Tafeला भारतातील दुसरा सर्वात मोठा ट्रॅक्टर निर्माता कसा बनवला? (How Mallika Srinivasan Made Tafe India’s Second Largest Tractor Maker?)
कोणताही व्यवसाय सुरळीत चालत नाही. प्रत्येक व्यवसायात चढ-उतारांचा अनुभव येतो. मल्लिका श्रीनिवासन यांच्याबरोबरही हेच घडले. “ट्रॅक्टर क्वीन” मल्लिकासाठी TAFE प्रवास नेहमीच आव्हानात्मक होता. मात्र, बाजारातील चढ-उताराचा तिने चिकाटीने सामाना केला. कंपनीच्या विकासामध्ये वाढ व्हावी यासाठी ती सतत नवीन उत्पादने बाजारात आणत होती. तिने कंपनीच्या समर्पक आणि वाजवी किंमतीच्या उत्पादनांच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित केले. व्यवसायाचा विस्तार होत राहिला आणि अखेरीस भारतातील महिंद्रा अँड महिंद्रा नंतर दुसरा सर्वात मोठा ट्रॅक्टर उत्पादक बनला. मल्लिकाने २००५ मध्ये आयशरच्या ट्रॅक्टर विभागाच्या खरेदीवर लक्ष केंद्रित केले. निर्यातीमुळे TAFE लाही फायदा झाला. तिने तुर्कीमध्ये कारखानाही काढला.
TAFE – ट्रॅक्टर आणि फार्म इक्विपमेंट लिमिटेड चेन्नई येथे १९६० मध्ये स्थापन करण्यात आली. १९६१ मध्ये फक्त एका ट्रॅक्टर मॉडेलसह सुरू झालेल्या TAFE ची सध्या वार्षिक उलाढाल १०,००० कोटी रुपयांपर्यंत पोहचली आहे.
मल्लिका श्रीनिवासन यांना मिळाले पुरस्कार आणि सन्मान (Awards And Recognition For Mallika Srinivasan )
मल्लिका श्रीनिवासन या भारत सरकारच्या सार्वजनिक उपक्रम निवड मंडळाच्या अध्यक्षा आहेत. इतरांबरोबर, ती यूएस इंडिया बिझनेस कौन्सिलच्या ग्लोबल बोर्डावर आणि BRICS महिला व्यवसाय आघाडीच्या प्रमुख सदस्या म्हणून काम करते. मल्लिकाने फोर्ब्स इंडियाच्या ‘वुमन लीडर ऑफ द इअर’ पुरस्कारासह अनेक सन्मान जिंकले आहेत; फोर्ब्स आशियाची यादीमध्ये ‘टॉप ५० आशियाई पॉवर बिझनेस वुमन’पैकी एक आहे. अनेक दक्षिण भारतीय शैक्षणिक आणि वैद्यकीय संस्था, शंकर नेत्रालय आणि चेन्नईतील कर्करोग रुग्णालय इत्यादींसाठी ती वकील म्हणून काम करते आहे.