Aashka Goradia Renee Cosmetics : एका क्षेत्रात यशस्वी करिअर केल्यानंतर ते क्षेत्र मागे सोडून दुसऱ्या क्षेत्रात तितक्याच दिमाखात यशस्वी होणं सोपं नसतं. पण आशका गोराडियाने हे करून दाखवलंय. टीव्ही मालिकांमधून घराघरात पोहोचलेल्या आशकाने करिअर ऐन भरात आलेले असताना अभिनय क्षेत्र सोडले अन् सौंदर्य प्रसाधनाचा व्यवसाय सुरू केला. तिचा हाच व्यवसाय आता जवळपास ८३० कोटी रुपयांचा बनला आहे.

२०२० मध्ये आशका गोराडियाने तिचा कॉलेजचा मित्र आशुतोष वलानी आणि प्रियांक शाह यांच्यासह रेनी कॉस्मेटिक्सची स्थापना केली. यांच्या कंपनीने फार कमी वेळात भरारी घेतली. सौंदर्य प्रसाधन उत्पादनांची विस्तृत श्रेणी या कंपनीने लॉन्च केली. कंपनीने अवघ्या दोन वर्षांत ८३४ कोटी रुपयांचा व्यवसाय केला.

aishwarya narkar faces trolling for wearing sleeveless blouse
स्लिव्हलेस ब्लाऊजमुळे शिव्या घातल्या, संस्कृती दाखवली…; ऐश्वर्या नारकरांनी ट्रोलर्सना विचारला जाब, ‘तो’ अनुभव सांगत म्हणाल्या…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Marathi Actress Deepali Sayed new hotel
अभिनेत्री दीपाली सय्यद यांचं नव्या क्षेत्रात पदार्पण! शिर्डीत भाविकांसाठी सुरू केलं हॉटेल, अनेक राजकीय मान्यवरांनी दिली भेट
premachi goshta after tejashri pradhan exit now this actress will play mukta role
तेजश्री प्रधानने मालिका सोडल्यावर ‘प्रेमाची गोष्ट’च्या सेटवर आली नवीन ‘मुक्ता’! शेअर केला स्क्रिप्टचा पहिला फोटो…
truti dimri left aashiquie 3
Aashiqui 3 चित्रपटातून ‘या’ अभिनेत्रीचा पत्ता कट? याआधीच्या बोल्ड भूमिका ठरल्या कारणीभूत
Marathi Actress Tejashri Pradhan exit from Premachi goshta marathi serial
तेजश्री प्रधानची ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतून एक्झिट! आता मुक्ताच्या भूमिकेत झळकणार ‘ही’ अभिनेत्री
Loksatta vyaktivedh Actress Demi Moore autobiography Inside Out
व्यक्तिवेध: डेमी मूर
Marathi Actress Rucha Vaidya Engagement
अडीच महिन्यांपूर्वी आदिनाथ कोठारेच्या चित्रपटातून सिनेविश्वात पदार्पण करणाऱ्या मराठी अभिनेत्रीने उरकला साखरपुडा, फोटो आले समोर

अहमदाबाद येथे मुख्यालय असलेल्या रेनी कॉम्सेटिक्सने उल्लेखनीय यश मिळवले आहे. डिसेंबर २०२२ मध्ये कंपनीने २५ दशलक्ष डॉलर्स निधी उभारला. त्यानतंर १०० दशलक्ष डॉलर्सपर्यंत (८३० कोटी) याचं मूल्य वाढत गेलं. कंपनीची वैविध्यपूर्ण उत्पादनांमध्ये २०० हून अधिक वस्तूंचा समावेश आहे. अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, नायका आणि मिंत्रासारख्या प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर आणि ६५० हून अधिक स्टोअर्समध्ये ही उत्पादने उपलब्ध असतात.

हेही वाचा >> Who is Mohana Singh : घरातूनच लढण्याचं बाळकडू अन् आकाशी झेप घेण्याचं स्वप्न; मोहना सिंग यांची यशस्वी भरारी!

उत्पादनांचं मार्केटिंग आणि सेलिंगच्या कामात आशका गोराडिया महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. तर तिचे सहसंस्थापक वित्त ऑपरेशन्स आणि वितरणावर देखरेख करतात. कंपनी आर्थिक वर्ष २०२४ साठी ४०० कोटी रुपयांची कमाई करणार आहे. आशकाने तिच्या ब्रँडच्या पहिल्या उत्पदानांना अभिनेत्री जुही परमार, मौनी रॉय आणि अबीगेल जैन यांची नावे दिली होती.

आशका गोरडियाने कोणत्या मालिकांमध्ये केलंय काम

आशका गोराडिया एक प्रसिद्ध टीव्ही स्टार होती. तिने २००२ मध्ये अचानक ३७ साल बाद या शोमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आणि कुसुम कुमुदच्या भूमिकेसाठी तिला प्रसिद्धी मिळाली. अकेला, सिंदूर तेरे नाम का, मेरे अपने आणि विरुद्ध सारख्या इतर लोकप्रिय मालिकांमध्ये ती दिसली. २०१९ मध्ये दयान या शोमध्ये तिची शेवटची प्रमुख भूमिका होती. २०१८ मध्ये तिने नाकाची सर्जरी केली होती. यावरून तिला टीकेचा सामना करावा लागला होता. त्यामुळे तिने अभिनय क्षेत्र सोडून व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला होता. २०१९ पर्यंत आशका अभिनय, योग आणि फिटनेससाठी ओळखली जात होती. त्यानंतर २०२० मध्ये तिने रेनी कॉस्मेटिक्सवर लक्षकेंद्रित केले. २०१७ मध्ये आशका गोरडियाने अमेरिकन व्यवसायिक ब्रेंट गोबल याच्याशी लग्न केलं. ऑक्टोबर २०२३ मध्ये तिला एक मुलगाही झाला.

Story img Loader