प्राची पाठक

देशाचा अमुक टक्के भूभाग जंगलाने व्यापलेला असावा, असं सर्वांनी शाळेत असताना वाचलेलं असतं, परंतु आपलं रुटीन आयुष्य जगत असताना जंगल वाचवा, वाघ वाचवा म्हणजे नेमकं काय करा, हे अनेकांना माहीत नसतं. मग हळूच हे काम सरकारचं, आपलं नाही, असं म्हणत आपण त्यातून बाजूला होतो. जंगल वाचवा, वाघ वाचवा हे मुद्दे फक्त एक घोषवाक्य बनून राहतात.

Patra Chawl Redevelopment Project
विश्लेषण: पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प अखेर मार्गी लागणार… विलंब का? लाभ कुणाला मिळणार?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
During the blockade gold and silver worth six crores were seized Pune news
नाकाबंदीत पावणेसहा कोटींचे सोने, चांदी जप्त; ओैंध परिसरात कारवाई
if want vote then Save rivers trees and hills
मत हवं? नद्या, झाडे, टेकड्या वाचवा…
readers feedback on loksatta editorial
लोकमानस : कणा आणखी किती भार सोसणार?
redevelopment plan of dharavi
धारावीविषयी नवा दृष्टिकोन हवा!
flat Palava Colony animals, Dombivli Palava Colony animals, Dombivli flat animals
डोंबिवली पलावा वसाहतीमधील अलिशान सदनिकेतून विदेशी वन्यजीव जप्त, ठाणे वन विभागाची कारवाई

केतकी घाटे आणि मानसी करंदीकर या निसर्गप्रेमी मैत्रिणींनी मात्र आपला वाटा उचलत खासगी अभयारण्य उभारायची संकल्पना पुढे आणली. लोकसहभागातून खासगी जमिनीवर तिथल्या स्थानिक जैववैविध्याचे पुनरुज्जीवन आणि जतन असा हा प्रकल्प आहे. त्यासाठी त्यांनी २०१८ मध्ये ‘अधिवास फाऊंडेशन’ या संस्थेची निर्मिती केली. पुण्यापासून साधारण चाळीस किलोमीटरवर वेल्हे तालुक्यातील शिरकोली गावाजवळ पानशेत धरणाच्या बॅकवॉटरला लागून असलेल्या बासष्ट एकर जागेत ‘अधिवास फाऊंडेशन’ने ‘रहाळ’ हे अनोखे खासगी अभयारण्य उभारण्याचा प्रयोग केला आहे. केतकी आणि मानसी या दोघी जणी ‘ऑयकॉस’ या कंपनीच्या संचालिका आहेत. २००२ मध्ये स्थापन केलेल्या या कंपनीमार्फत त्या पर्यावरण पुनरुज्जीवनाचं काम करतात. त्यासंबंधी सल्ला, मार्गदर्शन देतात. ‘हे म्हणजे नेमकं काय?’, असं विचारणाऱ्यांचा तो काळ होता. तिथून आजवर जवळपास पन्नास हजार एकरांपेक्षा जास्त जागेवर दीडशेहून अधिक प्रोजेक्ट्स त्यांनी केलेले आहेत.

ज्यांच्याकडे खासगी जागा आहे, ज्यांना तिथे जैववैविध्य जपायचं, फुलवायचं आहे, तिथे त्या परिसंस्थेच्या पुनरुज्जीवनाची सेवा पुरवतात. हे काम ‘ऑयकॉस’ कंपनीमार्फत करत असतानाच ‘अधिवास’ या संस्थेची स्थापना करून लोकांच्या सहभागातून निसर्गाचे पुनरुज्जीवन करायचा देशातला अनोखा प्रकल्प ‘रहाळ’च्या माध्यमातून त्या करत आहेत. भारतात आजवर खासगी जागेत वननिर्मिती करायचे लहान-मोठे प्रयत्न वैयक्तिक स्तरावर झालेले आहेत. रहाळच्या या मॉडेलमध्ये संबंधित जागेची नोंदणी फी भरून तीस ते पस्तीस लोक या प्रकल्पाचे सदस्य आणि भागीदार होऊ शकतात. हा संपूर्ण परिसर केवळ जैववैविध्य जपण्यासाठी कायमस्वरूपी राखीव ठेवला जाणार असल्याने इथे शेती किंवा इतर लागवडीतून काही उत्पन्न सदस्यांना मिळणार नाही.

जैववैविध्य पुनरुज्जीवन, जतन आणि संवर्धन हा विषय असा आहे की त्याचे थेट फायदे चटकन दिसत नाहीत. ती एक वेळखाऊ आणि निरंतर प्रक्रिया असते. त्यासाठी निधी उभारणे हे अवघड काम आहे. म्हणूनच याची जाण असलेले आणि आर्थिक भार उचलू शकणारे काही मोजके सदस्य त्यातले भागीदार असतील. निसर्गाचे पुनरुज्जीवन, जतन याचा आनंद आणि निसर्गाचा सहवास त्यांना त्या बदल्यात मिळू शकतो. ज्यांना आर्थिक योगदान देणं शक्य नाही, अशांना या परिसरात अभ्यास, संशोधन करण्यासाठी आणि संस्थेच्या इतर कामांमध्ये मदत करायची संधी उपलब्ध आहे. यात विशिष्ट प्रकारची निसर्गस्नेही घर बांधणी करण्यासाठी, वृक्ष लागवड आणि लँडस्केपिंग करण्यासाठी स्थानिकांना प्राधान्य आणि रोजगार मिळेल. संपूर्ण भूभागाला कंपाऊंड घालायच्या कामातदेखील तिथल्याच दगडांचा, कंपाऊंडसाठी योग्य अशा झाडाझुडपांचा विचार केला जाईल, जेणेकरून नैसर्गिक आडोसा तर मिळेलच, परंतु त्यात नव्याने वेगळे अधिवास सजीवांना तयार होतील. पर्यावरणाशी संबंधित शिक्षण देणाऱ्या संस्था, आर्किटेक्चरल कॉलेजेस, इतर शैक्षणिक संस्था इथे विविध प्रकारे अभ्यास आणि संशोधन करू शकतात. निसर्गवाचन, निसर्ग शिक्षण यासाठी हा प्रकल्प सर्वांना खुला असेल.

कोणत्याही भूभागाचे मूळ वैशिष्ट्य काय आहे, तिथल्या स्थानिक जैववैविध्याची नोंद करणे इथपासून हा प्रवास सुरू होतो. त्यात ऋतूंनुसार होणारे त्या भागातले बदल वर्ष-दोन वर्ष नोंदवले जातात. गवताळ कुरणांपासून ते तिथल्या घनदाट झाडीच्या प्रदेशांपर्यंत सर्व भागाचा अभ्यास केला जातो. तिथे कोणती झाडे आहेत, कोणते पक्षी त्या भागात येतात, मुंग्यांच्या कोणत्या प्रजाती आहेत, फुलपारखे, कीटक, सरीसृप, उभयचर कोणते आहेत, असं सगळं नोंदवलं जातं. त्या भागात असलेले नैसर्गिक ओढे कोणते, त्यात पावसाळ्यात कोणते प्रवाह दिसतात, मोकळ्या गवती कुरणांचं त्या भागासाठी असलेलं महत्त्व बघितलं जातं. निवडलेल्या जागेतील मातीचा पोत कसा आहे, तिथे आसपास देवाच्या नावाने जपलेली देवराई असेल, तर तिच्यात जपलेला निसर्ग कशा स्वरूपाचा आहे, अशा अनेक बारीकसारीक मुद्द्यांचा विचार केला जातो. पश्चिम घाटाचा भाग असलेल्या या परिसरात सुरुवातीची दहा, बारा वर्षं निसर्गाचे पुनरुज्जीवन, वृक्ष लागवड आणि जतन यासाठी दिली जातील. सध्या इथे दोनशेहून अधिक प्रकारची वृक्षसंपदा आहे. त्यात दुर्मीळ असे जांभळा, काळा शिरीष हे वृक्ष आहेत. विशिष्ट गरुडांची मोठाली घरटी आहेत. हरीण आणि क्वचित प्रसंगी बिबटेदेखील या परिसरात आढळले आहेत.

रहाळला भेट देण्यासाठी नेचर ट्रेलच्या माध्यमातून दिवसभराचा उपक्रम आखलेला आहे. शिरकोली गावातून थोडं पुढे जाऊन डोंगर रांगातून, जंगलातून ‘ऑर्किड’ नावाच्या एका झोपडीपर्यंत चालत जायचं. वाटेत दिसणारं जैववैविध्य समजून घ्यायचं. त्यावर चर्चा, आजूबाजूच्या झाडांचा रानमेवा खायचा. गप्पा मारत, माहिती घेत जवळपास पाऊण तास ते एक तास निसर्गात चालत जायचं. निसर्गतः आलेले ऑर्किड्स, वाटेत दिसणारे विविध पक्षी, कोळी, सापांची बिळं, झाडांची-गवताची-कीटकांची ओळख असं सगळं करतांना त्या अधिवासात फिरायचा आनंद मिळतो.

केतकी आणि मानसी एक वसा घेतल्यासारखं हे काम करत आहेत. स्त्रियांनी जपलेला निसर्ग, स्त्रियांनी जपलेले विविध भाषिक शब्द, स्त्रियांनी जपलेल्या स्थानिक पाकशैली याचं जगभरात फार महत्त्व आहे. त्यातच आता दोन मैत्रिणींनी व्यवसायाच्या माध्यमातून जपलेला, रुजवलेला, फुलवलेला आणि पुनरुज्जीवित केलेला निसर्ग, त्याबद्दल लोकांना दिलेला नवा दृष्टिकोन, नवं मॉडेल ही फारच प्रेरणादायी गोष्ट आहे.

prachi333@hotmail.com