Archana devi in U19 Women T20 WC Final: टीम इंडियाने रविवारी अंडर-१९ महिला टी२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये इंग्लंडचा पराभव करून इतिहास रचला. इंग्लंडचा संघ ६८ धावांत सर्वबाद झाला. भारताने ३ गडी गमावून लक्ष्य गाठले. या गौरवशाली विजयाचा पाया अर्चना देवी हिने रचला. तिने ग्रेस स्क्रिव्हन्स आणि नियाह हॉलंडला बाद करून चांगली सुरुवात केली. उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातील केरताई पूर्वा गावात राहणाऱ्या अर्चनादेवीच्या या यशामागे तिची जिद्दी आई सावित्री देवी यांचा हात आहे, ज्यांना आयुष्यात अनेक लोकांचे टोमणे ऐकावे लागले. जेव्हा तिचा नवरा आणि मुलगा सर्पदंशामुळे कर्करोगाने मरण पावला तेव्हा तिला डायन म्हटले गेले.

एवढेच नाही तर जेव्हा सावित्री देवींनी अर्चना देवी हिला क्रिकेटर बनवण्याचा निर्णय घेतला तेव्हा तिच्या नातेवाईकांनी, आजूबाजूच्या लोकांनी सांगितले की, “ती आपल्या मुलीला चुकीच्या मार्गावर पाठवत आहे.” यामुळे सावित्री देवी मागे हटल्या नाहीत आणि त्यांनी आपल्या क्रिकेटसाठी महत्त्वाकांक्षी असणाऱ्या मुलीला गावापासून ३४५ किमी अंतरावर असलेल्या मुरादाबाद येथील ‘कस्तुरबा गांधी निवासी बालिका विद्यालय’ या मुलींच्या बोर्डिंग स्कूलमध्ये प्रवेश मिळवून दिला. हे धाडस केल्यानंतर आजूबाजूचे लोक त्यांच्या मुलीला चुकीच्या क्षेत्रात पाठवल्याचा आरोप करायचे आणि यावरून रोज टोमणे मारायचे.

मुलीला चुकीच्या क्षेत्रात पाठवले

“मुलगी विकली गेली,” सावित्री देवी यांनी इंडियन एक्सप्रेसला फोनवर सांगितले. मुलीला चुकीच्या व्यवसायात, क्षेत्रात टाकले आहे. या सगळ्या गोष्टी लोकं माझ्या तोंडावर सांगत असे. अर्चनादेवीच्या यशानंतर सर्वांचा दृष्टिकोन बदलला आहे. “माझे घर आता पाहुण्यांनी भरले आहे पण माझ्याकडे त्यांच्यासाठी पुरेसे ब्लँकेट नाहीत,” माझी मुलगी अंडर-१९ महिला विश्वचषक फायनलमध्ये खेळताना दिसली आणि त्यानंतर चित्रच पालटल, ज्यांनी कधी माझ्या घरचे पाणी पिले नाही ते आज सर्वच बाबतीत मदत करत आहेत.”

डायनचे घर असे हिणवायचे

अर्चना देवी यांचे वडील शिवराम यांचे २००८ मध्ये कर्करोगामुळे निधन झाले. आधीच गरिबीमुळे कुटुंबावर प्रचंड कर्ज होते आणि तीन लहान मुलांच्या संगोपनाची जबाबदारी सावित्रीवर होती. २०१७ मध्ये त्यांचा धाकटा मुलगा वाइज सिंगचा साप चावल्याने मृत्यू झाला. मृत्यूनंतर देखील शेजारी आणि नातेवाईकांनी त्याच्यावर वाईटसाईट बोलणे सुरूच ठेवले. याविषयी अर्चना देवीचा मोठा भाऊ रोहित कुमार सांगतो की, “गावकरी माझ्या आईला डायन म्हणायचे. ते म्हणायचे की आधी तिने तिच्या नवऱ्याला खाल्ले, मग तिच्या मुलाला, आम्हाला पाहून ते लोकं रस्ता बदलायचे, आमच्या घराला डायनचे घर असे नाव पडले होते.”

हेही वाचा: IND vs NZ 2nd T20: “लखनऊची खेळपट्टी ही फलंदाजीसाठी…!” भारताची फिरकी जोडी ‘कुलच्या’समोर ‘मिस्टर ३६०’ ची कबुली

भावाची नोकरी लॉकडाऊनमध्ये गेली

मार्च २०२२ मध्ये पहिल्या लॉकडाऊन दरम्यान, रोहितची नवी दिल्लीतील कापशेरा सीमेवरील कपड्याच्या कारखान्यातील नोकरी गेली. या धक्क्यानंतर आपल्या मुलांचे संगोपन करण्यासाठी त्याच्या आईला खूप यातना सहन कराव्या लागल्याचे तो सांगतो. तो म्हणाला की, “आम्हाला दरवर्षी पुराचा सामना करावा लागतो. गंगा नदीच्या पाण्याने आमची अर्धी शेतं पाण्याने भरलेली असतात. आम्ही फक्त आमच्या गाई आणि म्हशीच्या (प्रत्येकी एक) दुधावर अवलंबून होतो. आईमुळे आम्ही इतकी वर्षे जिवंत राहिलो. तिने माझे ग्रॅज्युएशन पूर्ण करण्यासाठी माझ्यापाठीमागे हट्ट केला एकप्रकारे धोशा लावला. त्याचे फलित म्हणजे आता मी सरकारी नोकरीसाठी तयारी करत असून ही सुद्धा आईचीच इच्छा होती.”

मृत मुलाची शेवटची इच्छा पूर्ण केली

आयुष्यात आलेल्या पहाडाएवढ्या संकटांचा सामना करून त्यावर मात करत सावित्री देवी पुढे जात राहिल्या. तिला आपल्या मृत मुलाची शेवटची इच्छा पूर्ण करायची होती. तिने अर्चना देवीला तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अक्षरशः जिवाचे रान केले. अर्चनाचा भाऊ रोहित म्हणाला की, “ती फक्त एक वर्ष क्रिकेटचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणाऱ्या बुद्धिवान क्रिकेटपटूंसोबत खेळली इतरवेळी भाऊ बुधिमानसोबत तिने सराव करत खेळायची.”

अर्चना देवीने तिच्या भावा संदर्भातील घटना पुढे सांगितली. ती सांगते, “तिने असा एक शॉट मारला आणि चेंडू एका बांधकामाधीन इमारतीत गेला, जी आम्ही वडिलांच्या मृत्यूनंतर बांधली नाही. प्रत्येक वेळी तो चेंडू भग्नावस्थेतून बाहेर काढण्यासाठी बॅटचा वापर करत असे. मात्र एकेदिवशी कातरवेळ असताना असाच एक शॉट अर्चानाने मारला आणि तो चेंडू आणण्यासाठी तिचा भाऊ रोहित त्या भग्न इमारतीत गेला. बॅटचा वापर न करता त्याने हाताने चेंडू काढण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या हाताला नागाने चावा घेतला. दवाखान्यात नेत असताना माझ्या हातावर त्याचा मृत्यू झाला. मृत्याच्या शेवटच्या क्षणी “अर्चनादेवीला क्रिकेट मध्ये पुढे करिअर करू द्या ती एक दिवस भारताला विश्वचषक जिंकून देईल हे त्याचे शेवटचे शब्द होते.” बुधिमानच्या मृत्यूनंतर जेव्हा ती तिच्या शाळेत परत गेली तेव्हा तिने क्रिकेटला गांभीर्याने घ्यायला सुरुवात केली आणि तिच्या आईने तिला प्रोत्साहन देत कधीही रोखले नाही.

पूनम गुप्ताने आशेचा किरण जागवला, म्हणाली ‘काहीतरी नक्की होईल’

सरिता देवी पुढे म्हणतात, “तिचा (अर्चनाचा) हेतू होता की आपण काहीतरी बनले पाहिजे. आम्ही म्हणालो की बेटा, तू येथे काहीही बनू शकणार नाहीस. जर तुझ्याकडे इतके पैसे नाहीत तर तू पोहोचू शकणार नाहीस. ती जागा. पण पूनम गुप्ता आशा द्यायची. ती म्हणायची, आशा सोडू नकोस. देवाने आशीर्वाद दिला तर नक्कीच काहीतरी घडेल.”

हेही वाचा: Women U19 WC: ‘अंडर-१९ विश्वविजेता कर्णधार पृथ्वी शॉ ते शफाली वर्मा…,’ राहुल द्रविडने खास शब्दात दिल्या शुभेच्छा, Video व्हायरल

रोव्हर्सचे प्रशिक्षक कपिल पांडे यांनी अर्चनाची प्रतिभा ओळखली

अर्चनाची क्षमता पाहून पूनम गुप्ताने तिला २०१६ मध्ये कानपूरच्या रोव्हर्स क्रिकेट क्लबमध्ये सामील करून घेतले. रोव्हर्सचे प्रशिक्षक कपिल पांडे यांनी अर्चनाची प्रतिभा लक्षात घेतली आणि तिला वेगवान गोलंदाजीऐवजी फिरकी गोलंदाजी करण्यास सांगितले. कपिल पांडे हे गोलंदाज कुलदीप यादवचे प्रशिक्षकही राहिले आहेत. कुलदीप यादवलाही ते म्हणाले होते.

अर्चना म्हणते, “प्रथम मी एक महिना वेगवान गोलंदाजी केली. त्यानंतर कपिल सरांनी मला ऑफ स्पिनर बनवले. त्यांनी मला प्रथम मध्यमगती गोलंदाजी करायला लावली. त्यानंतर माझा सर्वोत्तम ऑफस्पिनर होता त्यामुळे सरांनी मला फोकस करण्यास सांगितले”

Story img Loader