‘स्वलेखन’ या ॲपद्वारे दृष्टीहिन विद्यार्थ्यांना परीक्षा देता यावी, त्यांचे परालंबित्व कमी होऊन ते नव्या दमाने शिक्षणाच्या प्रवाहात यावेत यासाठी प्रयत्न करणाऱ्या उमा बडवे यांच्याविषयी…

आजचे युग हे डिजिटलचे आहे. मग या डिजिटल युगात दृष्टीहिन व्यक्ती मागे पडू नयेत, त्यांनाही या युगाचे दार खुले व्हावे या हेतूने उमा बडवे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने ‘स्वलेखन’ या ॲपची निर्मिती केली. या ॲपमुळे दृष्टीहिन व्यक्ती मराठी, हिंदी भाषांत लिहू शकतात आणि लवकरच या ॲपवर कन्नड भाषेत टाईप करण्याची सुविधाही उपलब्ध होणार आहे. उमाताईंना दृष्टीहिनांसाठीच काम करावं असं का वाटलं, त्याला कारणही तसंच आहे.

religious reform in india social transformation in religion hindu religious reform
पातक, प्रायश्चित्त आणि शुद्धीविचार
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव कसा असतो?
Maha Kumbh Mela World largest gathering begins in India
दीड कोटी भाविकांचे पवित्र स्नान; भक्तिमय वातावरणात महाकुंभाला सुरुवात
tulja bhavani shakambhari navratrotsav loksatta news
शाकंभरी नवरात्र महोत्सव : सहाव्या माळेला महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा
History , Art , Contemporary Visual Art , Feminist ,
दर्शिका : ‘अनंतकाळच्या माते’ची अनंतकाळची लढाई…
Special article on occasion of Swami Vivekanandas birth anniversary
धर्म, अस्मिता आणि हिंदू!
woman in the womens movement and Gender inequality
स्त्री चळवळीतील ‘स्त्री’ : अभूतपूर्व‘स्त्री’

उमाताईंच्या आई मीरा बडवे दृष्टीहिन विद्यार्थ्यांच्या शाळेत रीडर म्हणून काम पाहत होत्या. तेव्हापासूनच त्यांचा परिचय दृष्टीहिन मुलांच्या विश्वाशी झाला. उमाताईँच्या आईने दृष्टीहिन मुलांच्या अडचणी समजून घेण्यासाठी खास ब्रेल लिपीचा अभ्यास सुरू केला आणि त्यातूनच त्यांनी ‘निवांत’ या संस्थेची स्थापना केली. या संस्थेद्वारे त्यांनी दृष्टीहिन मुलांना प्राथमिक शिक्षणाची व्यवस्था केली.

हेही वाचा : लग्नानंतर नाव बदलायचं नव्हतं, पण सासरच्यांनी केला विरोध अन्…

या काळात आईसोबतच उमा दृष्टीहिन विद्यार्थ्यांच्या समस्या अगदी जवळून पाहत होत्या. त्याविषयी अभ्यास करत होत्या, त्यांच्या अडचणी समजून घेत होत्या. पुढे मेकॅनिकल इंजिनिअर झाल्यानंतर त्या कॉर्पोरेट क्षेत्रात स्थिरावल्या. पण त्याच दरम्यान त्या ‘निवांत’च्या माध्यमातून दृष्टीहिन मुलांना शिक्षणासाठी प्रयत्न करीत होत्या. ही मुले आणि त्यांचे कुटुंब यांच्यात संवादक म्हणून काम करत होत्या. २०१९ मध्ये गुरूगाव येथे नोकरी करत असतानाच कॉर्पोरेट क्षेत्रातली स्पर्धा, तिथला कामाचा ताण पाहता त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाविषयी वडिलांशी चर्चा करत असताना वडिलांना त्यांना ‘निवांत’ साठी काम करण्याचा सल्ला दिला. आणि वडिलांच्या सल्ल्याने त्या पूर्ववेळ ‘निवांत’साठी काम करू लागल्या. हे काम करताना त्या दृष्टीहिन विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी भेडसावणारी रायटरची समस्या पाहता होत्या. हा प्रश्न कसा सोडवायचा याच विचारात असताना त्यांनी टायपिंग ट्युटर या संकल्पनेवर काम केलं आणि त्यातून ‘स्वलेखन’ हे ॲप आकारास आलं. या ॲपद्वारे दृष्टीहिन विद्यार्थ्यांना शालेयवयापासून मजकूर टाईप करायला शिकण्यासाठी प्रशिक्षित केलं जातं. दुसऱ्यांवर अवलंबून न राहता विद्यार्थ्यांना स्वतःच परीक्षा देण्यास मोलाची मदत होते. रायटर शोधण्याचा खटाटोप करावा लागत नाही. एखादी दृष्टीहिन व्यक्ती या ॲपद्वारे एखादा मजकूर स्वत:च टाईप करू शकते. हे ॲप प्ले स्टोअरवर सर्वांसाठी खुले आहे. ‘स्वलेखन’ ॲप शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे या करता पुणे येथील १६ शाळांमध्ये याविषयीच्या प्रशिक्षणाचे काम सुरू झाले. प्राथमिक शाळेतील दृष्टीहिन विद्यार्थ्यांना मोबालवरच ७८ धड्यांच्या अभ्यासक्रमातून लेखन कसे करायचे याचे धडे देण्यास सुरुवात झाली. मात्र मधल्या काळात करोनामुळे हे काम थोडे थांबले. पण याकाळात त्यांनी या ॲपमध्ये अधिक सुधारणा करून सुलभीकरण केले.

पुढे ‘स्वलेखन’मध्येच मराठीमधून हिंदी भाषेतील टायपिंग सुरू केले. ‘स्वलेखना’मुळे दृष्टीहिन विदयार्थी कशा प्रकारे परीक्षा देऊ शकतील यासाठी प्रयत्न सुरू झाले. करोनानंतर पुन्हा जोमाने कामास सुरुवात झाली. शाळा, महाविद्यालयांमध्ये याचे प्रशिक्षण दिले गेले. आतापर्यंत राज्यातील १२०० विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण दिले असून ४० विद्यार्थ्यांनी या ॲपद्वारे परीक्षा दिली आहे. पुणे येथील शुभम वाघमारे या दृष्टीहिन विद्यार्थ्याने पुणे विद्यापीठाची कला शाखेचे पदव्युत्तर परीक्षा ‘स्वलेखन’च्या माध्यमातून देत उल्लेखनीय यश संपादन केले. त्याचे यश पाहता आणखी ७० अंध विद्यार्थ्यांनी या ॲपद्वारे परीक्षा दिली आहे. आता हे ‘स्वलेखन’ लवकरच कन्नड भाषेतही उपलब्ध होणार आहे. सध्या १० दृष्टीहिन प्रशिक्षक सरकारी, निमसरकारी शाळेतील दृष्टीहिन विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहेत.

हेही वाचा : एकेकाळी नव्हते भाजीसाठी पैसे, आता आहे कोट्यवधींच्या कंपनीची मालकीण, जाणून घ्या महिला उद्योजिकेविषयी..

इंग्रजी भाषेत व्यवहारांचे प्रमाण पाहता आता मराठीत सूचना देऊन इंग्रजीभाषेत टायपिंग कसे करता येईल यावरही काम सुरू आहे. दृष्टीहिन विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येता यावे यासाठी संस्था विनाशुल्क प्रयत्न करत आहे ही कौतुकाची बाब.

‘स्वलेखन’द्वारे दृष्टीहिन विद्यार्थ्यांचे परालंबित्व कमी होऊन ते नव्या उत्साहात शिक्षणाकडे वळतील असा विश्वास उमा यांना आहे.

Story img Loader