सुचित्रा प्रभुणे

भारतीय स्त्री पन्नशीच्या उंबरठ्यावर पोहोचली की, तिला निवृत्तीचे वेध लागतात. एव्हाना मुलं आपापल्या मार्गाला लागलेली असतात. घराची जबाबदारी बऱ्यापैकी कमी झालेली असते. आता ५० ते ६० या वयाच्या टप्प्यात हात-पाय धड-धाकट असेपर्यंत मुलांचे लग्न आणि आजीपण निभावलं की झाली आयुष्याची इतिकर्तव्यता. या ५० च्या उंबरठ्यावर एखादी स्त्री गिर्यारोहक किंवा स्कुबा डायव्हर अशी काही धाडसी स्वप्ने बघायची हिंमत करू शकते का? पण नियमाला अपवाद असतातच. याच अपवादातले एक नाव म्हणजे उमा मणी.

lata argade, mumbai suburban local train, railway women passenger
प्रवासी महिलांचे प्रश्न सोडविणाऱ्या लता अरगडे
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Delhi Crime Case Doctor Murder
Delhi Doctor Murder Case : विवाहबाह्य संबंध, लग्नाचं आमिष अन् हत्या; दिल्लीतील हत्याप्रकरणी डॉक्टर, नर्स आणि अल्पवयीन मुलामधील संबंधांचा उलगडा!
Amitabh Bachchan And Rajesh Khanna
“आम्ही अमिताभ बच्चन यांना आणून राजेश खन्नाचे करिअर संपवले, तुझ्याबरोबरही तेच करू…”, सलीम खान यांनी कोणाला दिली होती ही धमकी?
Indian education system
पुन्हा अविद्येकडे नेणारे षड्यंत्र?
Hansa Kurve, Mahavitaran, Nagpur ,
विजेचा खांब हेच कर्मक्षेत्र असलेल्या हंसा कुर्वे
Cars of visitors to karvi flowers crushed bushes along road
कारवीचं फुलणं… एक क्लेशदायक अनुभव
meena bindra a women who once took 8 thousand loan now owns company of 800 cr
२० व्या वर्षी लग्न; वयाच्या चाळीशीत ८ हजारांचं कर्ज घेऊन आज उभं केलंय ८०० कोटींचं साम्राज्य; बॉलीवूडमध्येही योगदान, कोण आहेत ‘त्या’?

उमा मणी आज वयाच्या ४९ व्या वर्षी ‘कोरल वुमन’ म्हणून जगभरात ओळखल्या जातात. तामिळनाडू येथील एका पारंपरिक विचारसरणी असलेल्या कुटुंबात त्यंचा जन्म झाला. लहानपणापासून त्यांना चित्रकलेची आवड होती, पण कागदावर रंग-रेषा काढणे म्हणजे वेळ आणि वस्तू या दोहोंचा अपव्यय, या आजीच्या विचारसरणीमुळे चित्रकलेचे स्वप्न रुजण्याआधीच विरून गेले.

हे ही वाचा… प्रवासी महिलांचे प्रश्न सोडविणाऱ्या लता अरगडे

पुढे इंग्रजी साहित्यात एम.ए.केल्यानंतर चांगले स्थळ पाहून लग्न झालं. नवरा डॉक्टर असल्यामुळे कामानिमित्त मालदिव येथे स्थलांतर झालं. दोन मुलं झाली आणि उमा आपल्या संसारात इतर स्त्रियांसारखी रममाण झाल्या.

मोठा मुलगा कॉलेजला गेल्यानंतर उमा फ्रेंच भाषा शिकू लागल्या. त्याचवेळी त्यांना चित्रकलेचे व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या कोर्सविषयी समजलं आणि मनात दडून राहिलेली चित्रकलेची उर्मी उफाळून आली. एव्हाना ती ४५ वर्षांची झाली होती. त्यांच्या या आवडीला घरच्यांनी देखील चांगलाच पाठिंबा दिला. त्या कॅनव्हासवर मनमुरादपणे चित्रे काढू लागल्या.

आपली ही चित्रे जेव्हा फ्रेंच टीचरला दाखविली, तेव्हा खुश होऊन त्यांनी त्याना अशा प्रकारची ३० चित्रे तयार करण्यास सांगितलं. इतकंच नाही तर या चित्रांचं प्रदर्शन देखील भरविलं.

या प्रदर्शनाला मिळालेला अमाप प्रतिसाद पाहून विविध विषय घेऊन प्रदर्शन भरविण्यास सुरुवात केली. असाच एकदा कोरल रीफ(प्रवाळ भिंत) हा विषय घेऊन प्रदर्शन भरविलं.

त्यावेळी प्रदर्शनाला आलेल्या एका महिलेनं त्यना विचारलं की, तू कधी प्रत्यक्षात कोरल पहिलं आहेस का? कोरलची तुझी चित्रं उत्तम आहेत, पण ती फक्त सिनेमात किंवा पुस्तकातच चांगली दिसतात. प्रत्यक्ष स्थिती खूपच वेगळी आहे. त्या महिलेच्या या प्रतिक्रयेमुळे त्यानी पाण्याखाली जाऊन कोरल रीफ पाहण्याचा निश्चय केला.

आता गंमत अशी होती की, उमाला पोहता येत नव्हतं. तेव्हा चेन्नईला येऊन त्यानी १५ दिवसांचा पोहण्याचा प्रशिक्षण वर्ग पूर्ण केला. त्याच सुमारास उमाच्या लग्नाला २५ वर्षे पूर्ण झाली म्हणून त्याच्या मुलानं गिफ्ट म्हणून मालदीव येथे स्कुबा डायव्हिंग प्रशिक्षण वर्गाला त्यांचं नाव घातलं.

हे ही वाचा… समुपदेशन…. तुम्ही कर्मकांडाचा अट्टाहास करीत आहात का?

या वर्गाच्या पहिल्याच दिवशी उमा मोठ्या उत्सुकतेने पोहोचल्या खऱ्या, पण समोर अफाट समुद्र पाहून, त्यात खोलवर उडी मारण्याचा धीर होत नव्हता. कसाबसा पहिला दिवस पार पडला.

दुसऱ्या दिवशी हा वर्ग आता करायचा नाही, हा विचार मनाशी ठरवून उमा वर्गाला हजर राहिल्या. तेव्हा कोचने त्यांना धीर दिला. वर हेही समजावून सांगितलं की, या वयात सगळ्यांनाच ही संधी प्राप्त होत नाही. हळूहळू जाण्याचा प्रयत्न कर आणखीन दोन दिवस घ्या आणि त्यातूनही नाही जमलं तर सोडून द्या. निदान प्रयत्न केल्याचं सुख तरी तुमच्याजवळ असेल.

त्यांच्या या शब्दानं उमाला चांगलाच धीर मिळाला.आणि खोल समुद्राच्या तळाशी जायला चांगलंच जमू लागलं. तिथे दिसणारे कोरल, समुद्र साप, बेबी शार्क, वेगवेगळ्या रंगातील खडक हे त्याच्या कॅनव्हासचा विषय होऊ लागले, पण जसजशी ती जगातल्या विविध भागातील समुद्रात तळाशी जाऊ लागल्या तसतसं त्यांना कोरल रीफची सत्य स्थिती दिसू लागली. समुद्रात टाकला जाणारा कचरा, तेलाचे तवंग, प्लास्टिक, तऱ्हेतऱ्हेची रासायनिक द्रव्ये आणि या सर्वांचा कोरल रीफ आणि त्याभोवतालच्या वातावरणावर होणारा गंभीर परिणाम या गोष्टी त्यांच्या मनाला खदखदू लागल्या. वरून शांत, सुंदर वाटणारा समुद्र तळातून किती प्रचंड कचराकुंडी बनत चाललाय, याबाबत जागृती होणं गरजेचं आहे,असं वाटू लागलं.

मग त्या शुटिंग कॅमेरा घेऊन समुद्राच्या तळाशी जाऊ लागल्या. जिथे जिथे भयानक स्थिती दिसे, ती कॅमेऱ्यात बंदिस्त करू लागल्या. कोरल रीफ संदर्भात ती जास्तीजास्त संशोधन करू केलं. यावेळी त्यांना एक गोष्ट निदर्शनास आली की, जेव्हा काही वर्षांपूर्वी त्सुनामी आली होती, त्यावेळी इतर ठिकाणांपेक्षा मालदीवमध्ये कमी नुकसान झालं कारण तिथे कार्यरत असलेल्या कोरल रीफमुळे.

कोरल रीफचे हे महत्त्व घरोघरी पोहचलं पाहिजे त्याच बरोबर समुद्राला कचराभूमीचे स्वरूप देणं, हे मानवी जीवनासाठी किती धोकादायक आहे, ही बाब जगासमोर येणं गरजेचे आहे, या उद्देशाानं त्यानी डॉक्युमेंटरी करायचं ठरविलं.

हे ही वाचा… २० व्या वर्षी लग्न; वयाच्या चाळीशीत ८ हजारांचं कर्ज घेऊन आज उभं केलंय ८०० कोटींचं साम्राज्य; बॉलीवूडमध्येही योगदान, कोण आहेत ‘त्या’?

सुरुवातीला याबाबतीत त्यंना खूप नकार पचवावे लागले. पण एनडी टीव्हीच्या टी. प्रिया यांनी त्यांना सहकार्य करावयाचे ठरविले. या विषयाच्या निमित्ताने उमाशी चर्चा करताना प्रिया यांना४९ वर्षीय उमाची कहाणी जास्त रोचक वाटली. आणि त्यांनी त्याच्यावरच लघुपट तयार केला. आणि अलिकडेच या लघुपटाला सोनी बीबीसी चा मानाचा ‘अर्थ चम्पिओन ऑफ द मंथ’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. आणि कोरल वुमन म्हणून उमा मणी जगभर प्रसिद्ध झाल्या.

सध्या उमा मणी दिंडीगुल (तामिळनाडू) येथून आपलं जागृतीचं कार्य करीत आहेत. अनेक शाळा- महाविद्यालयात जाऊन या विषयाबाबत माहिती देत असतात. समुद्राच्या तळाशी असलेला कचरा कसा काय हटविता येईल, याबाबतीत जर प्रत्येकानं थोडाफार प्रयत्न केला तरी स्थिती नक्कीच बदलू शकेल,असा विश्वास त्यांना वाटतो.