यूपीएससी ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी कठोर परिश्रम घेत असतात. काहींना या परीक्षेत यश मिळतं तर काही अपयशी ठरतात. पण असे काही विद्यार्थी आहेत जे पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास होतात व आपलं स्वप्न पूर्ण करतात. आम्ही तुम्हाला अशाच एका आयएएस महिला अधिकारी बद्दल सांगणार आहोत ज्यांनी पहिल्याच प्रयत्नात यीपीएससी परीक्षा पास करत आयएएस बनण्याचे स्वप्न पूर्ण केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- कोण आहे भक्ती मोदी? इशा अंबानीच्या रिलायन्स रिटेलमध्ये काय आहे तिची जबाबदारी?

सौम्या शर्मा असे त्या महिला आएएस अधिकरीचे नाव आहे. सौम्या यांनी २०१७ मध्ये झालेल्या यूपीएसी परीक्षेत AIR 9 क्रमांक मिळवला. आयएएस बनण्यापर्यंतचा सौम्याचा प्रवास म्हणावा तेवढा सोप्पा नव्हता. या प्रवासात तिला अनेक संकटांचा सामना करावा लागला. मात्र, तिने परिश्रमाच्या जोरावर आपले ध्येय साध्य केलेच.

हेही वाचा- वयाच्या २२ व्या वर्षी कॅन्सरशी लढून, भारतातील श्रीमंत महिलांच्या यादीत मिळवले स्थान! पाहा,’कनिका टेकरीवाल’चा प्रवास

सौम्याचे संपूर्ण शिक्षण दिल्लीत झाले आहे. सौम्याने नॅशनल लॉ स्कूलमधून कायद्याची पदवी प्राप्तक केली आहे. सौम्या जेव्हा पदवीच्या शेवटच्या वर्षात होती तेव्हा तिने यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यावेळेस यूपीएससीच्या पूर्व परीक्षेला काही मोजकेच दिवस शिल्लक होते. तरीसुद्धा सौम्याने ही परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि आभ्यासाला सुरुवात केली. दिवसरात्र आभ्यास करुन सौम्या यूपीएससीची पूर्व परीक्षा पास झाली. मात्र, आता तिला मुख्य परीक्षेची तयारी करायची होती.

यूपीएससीच्या मुख्य परीक्षेची तयारी करत असताना सौम्याला अनेक संकटांचा सामना करावा लागला. ज्या दिवशी परीक्षा होती त्याच दिवशी सौम्याची तब्येत बिघडली. तिला तीव्र ताप आला होता. हा ताप एवढा वाढला होता की ती चक्कर येऊन पडली. मात्र, सौम्याने हार मानली नाही. आजारी असतानाही तिने यूपीएससीची मुख्य परीक्षा दिली. सौम्याच्या कष्टाचे चीज झाले. ती या परीक्षेत पास झाली. संपूर्ण भारतात तिचा नववा क्रमांक आला.

हेही वाचा- अमेरिकेतली नोकरी सोडून ‘ती’ भारतात आली; आज १०० करोड टर्नओव्हर असलेल्या कंपनीची आहे मालकीण

सौम्यानेचे पती पोलीस विभागात कार्यरत आहे. सौम्याने २०१८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी अर्चित चांडक यांच्याबरोबर लग्नगाठ बांधली. अर्चित यांनी आयआयटी दिल्लीतून बीटेक केले आहे. सौम्या व अर्चित सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. अनेकदा ते आपले निरनिराळे फोटो शेअर करताना दिसतात.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc success story ias saumya sharma air 9th rank cracked upsc cse 4 month dpj