जर एखाद्या उमेदवाराला यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस किंवा आयपीएस व्हायचे असेल, तर त्याचा एकच मंत्र आहे, तो म्हणजे दृढनिश्चय आणि सातत्य. परीक्षेची तयारी करताना या दोन गोष्टींकडे लक्ष देणारा उमेदवार या परीक्षेत नक्कीच यशस्वी होतो. आज आम्ही तुम्हाला अशाच एका आयएएस महिला अधिकारीबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी दृढनिश्चय व सातत्यच्या जोरावर यूपीएससी परीक्षेत यश मिळवले आहे.
लघिमा तिवारी असे त्या आयएएस महिला अधिकारीचे नाव आहे. लघिमा यांनी २०२२ मध्ये कोणत्याही कोचिंगशिवाय पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करत संपूर्ण भारतात १९ वा क्रमांक मिळवला आहे. यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करण्यासाटी त्यांनी कोणत्याही कोचिंग क्लासची मदत घेतली नाही. त्यांनी स्वयं-अध्ययनाच्या जोरावर ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
हेही वाचा- इन्फ्लुअन्सर नव्हे, किर्तनकार! तरुणांना अध्यात्माची गोडी लावणाऱ्या २४ वर्षीय भारतीताई आडसूळ कोण?
लघिमा तिवारी राजस्थानच्या अलवर येथील रहिवासी आहे. लघिमा यांनी दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी मधील इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंग पदवी मिळवली आहे. २०२१ मध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची तयारी सुरू केली. वर्षभर त्यांनी रात्र-दिवस आभ्यास केला. या परीक्षेच्या आभ्यासासाठी त्यांनी युट्यूबची मदत घेतली. एका मुलाखतीत लघिमा यांनी सांगितले होते की, यूट्यूबवर यूपीएससी परीक्षेत टॉप केलेल्या अनेक उमेदवारांच्या मुलाखतींमधून त्यांना बरेच ज्ञान मिळाले. या व्हिडीओतून त्यांना चालू घडामोडी व आभ्यासक्रमातील इतर भागांची माहिती मिळाली .
हेही वाचा- तालिबान सरकारकडून अफगाणिस्तानमध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन; घराबाहेर पडण्यास महिलांना वाटते भीती
लघिमा निरंतर प्रयत्न करण्यावर विश्वास ठेवतात. त्यांच्या मते जो प्रयत्नात सातत्य ठेवतो तो यशस्वी होतोच. यूपीएससीचा आभ्यास करणाऱ्या उमेदवारांनाही त्या नेहमी प्रयत्नात सातत्य ठेवण्याचा सल्ला देते. तसेच त्या परीक्षेच्या अगोदर आभ्यासाचे वेळापत्रक बनवून त्यानुसारच आभ्यास करण्याचे आवाहन करताना दिसतात. पदवीची शेवटी परीक्षा संपताच उमेदवारांनी वेळ वाया न घालवता, मुख्य परीक्षेची तयारी तातडीने सुरू करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.