-सिद्धी शिंदे

Urfi Javed vs Chitra Wagh Controversy: गेल्या काही दिवसांपासून उर्फी जावेद विरुद्ध चित्रा वाघ हा वाद असा काही चिघळला आहे की ऑनलाईन- ऑफलाईन सगळीकडे हीच चर्चा आहे. उर्फीची बाजू पटत नसणारे खूप जण आहेत. कदाचित तुमच्या इतकीच मी सुद्धा; पण मुळात तिच्याविरुद्ध बाजू घेताना अनेकदा सगळ्याच मुलींची तुलना एकाच पारड्यात केली जात आहे. मुंबईच्या लोकलमध्ये महिलांच्या डब्ब्यात घडलेला एक असाच प्रसंग तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न..

Woman dies after falling off her bike in Kondhwa Pune news
कोंढव्यात दुचाकी घसरुन महिलेचा मृत्यू; दुचाकीस्वार पती जखमी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Maharani Laxmi Bai Medical College, in Jhansi district
Jhansi Hospital Fire : नर्सने काडीपेटी पेटवली अन्… १० अर्भकांचा जीव घेणाऱ्या झाशी रुग्णालयात आग कशी लागली?
Mangalsutra thief arrested thane, Mangalsutra thief,
ठाणे : महिलेला ढकलून मंगळसूत्र चोरणारा अटकेत
bihar man murder Mumbai
मुंबई: हातावर गोंदवलेल्या प्रेयसीच्या नावामुळे लागला हत्येचा छडा, प्रेमप्रकरणावरून बिहारमधील तरुणाची मुंबईत हत्या
Important research Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University shows that mosquitoes are repelled by yellow light of LED
डासांपासून त्रस्त झाले का? हे करून बघा, काय सांगते पिवळ्या दिव्याचे नवे संशोधन
emboldened rioters attacked police officer in nashik
पतीचा पत्नी, मेहुणी, सासऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला
Aruna Sabane asked harassed Priya Phuke is not beloved BJP sister
प्रिया फुके ही सरकारची ‘लाडकी बहीण ‘नाही आहे का? सामाजिक कार्यकर्त्या अरुणा सबाने यांचा सवाल

सकाळी १०. ३५ ची फास्ट लोकल डोंबिवलीवरून सुटली. वेळ सांगण्याचं कारण म्हणजे वेळेनुसार ट्रेनमध्ये चढणाऱ्या बायकांचा प्रकारही बदलतो. म्हणजेच पाहा, सकाळी ७ च्या आधीची गर्दी ही साधारण दूरवरून आलेली असते. या बायकांना झोपेहून अधिक काही प्रायॉरिटीज नसतात. आठ ते साडेनऊ पर्यंत कामावर जाणाऱ्या बायकांची गर्दी असते यात अंदर चलो, बाहेर लोक लटकले आहेत यापलीकडे काही बोलण्यात किंवा इतरांचं काही ऐकण्यात कुणालाही रस नसतो. निदान दादरपर्यंत तरी एकमेकींना पाहणं शक्य नसतं. १० नंतरची गर्दी थोडी सुस्तावलेली असते. थोड्या वयस्कर मावश्या, सासूबरोबर कुटुंबातल्या लग्नाला निघालेल्या नव्या सुना असा एक साधारण वर्ग या वेळेत ट्रेनमध्ये चढतो. याच गर्दीत त्यादिवशी मी पण होते, वरच्या दोन्ही गटात नसले तरी त्यादिवशी जरा आरामात कामाला निघाले होते.

ठाण्याला एक सुंदर मुलगी आमच्या ट्रेनमध्ये चढली. तिने स्ट्रिप्सचा (नाड्या असणारा) क्रॉप टॉप, हाय वेस्ट जीन्स आणि शूज घातले होते. टॉप थोडा डीप नेक होता, कानात गोल्डन हुप्स आणि हातात नाजूक ब्रेसलेट, छान होती दिसायला. पण ती जेव्हा गाडीत चढली बापरे.. कदाचित जनरलमध्ये चढल्यावर पुरुषांनी तिला बघितलं नसतं तेवढं या बायका तिला न्याहाळून पाहत होत्या. त्यात एकीच्याही चेहऱ्यावर तिच्या सौंदर्याला दाद देणं हा भाव नव्हता.

“कमी कपडे घालणं हा माझा…” उर्फी जावेदचा मोठा खुलासा

इतक्यात सगळ्यांच्या मनातल्या भावना माझ्याच समोर बसलेल्या बाईने बोलून दाखवल्या. “बघितलं बाई बाई हे काय कपडे झाले, एवढं होतं तर घालायचेच कशाला?” एकीने सुरुवात केली आणि मग ती समोरच आहे याचीही तमा न बाळगता बायका बोलू लागल्या. आजकाल ती उर्फी का कोण ती अर्धनग्न होऊन फिरत असते या मुलींचे आदर्शच ते. म्हणूनच अशा अर्ध्या कपड्यांनी फिरतात. हे सगळं ऐकताच त्या मुलीने अलगद जॅकेट अंगावर घेतलं पण तरीही या थांबल्या नाहीत. वर एक म्हणाली खरंच स्वतः असे कपडे घालायचे आणि मग लोकांनी बोललं की बोंबलत सुटायचं. हळूहळू त्या मुलीच्या घरच्यांचा उद्धार करून झाला बॉयफ्रेंडसोबत जात असेल असे अंदाज बांधून झाले. आता तर ती मुलगी अगदी रडकुंडीला आली होती. तेवढ्यात एकीने हद्दच केली असल्यांना ना चौकात कपडे काढून मारायला पाहिजे असं म्हणताच माझाच संयम सुटला. पण मी काही बोलायला जाणार एवढ्यात शेवटी ती मुलगीच बोलली.

काय समजता हो स्वतःला… तोंडाला येईल ते बोलाल? मी डॉक्टर आहे. शरीराला शरीरासारखं बघायला शिका जरा. मुळात तुमच्या शरीरात मेंदू कमी आणि अहंकार जास्त असल्याने ही अपेक्षाच चुकीची आहे. जेवढं १ इंच पोट माझ्या टॉप मधून दिसतंय त्याहून दुप्पट ढेरी तुम्ही साड्या नेसून दाखवता यावर आम्ही बोलायचं का? नाही बोलणार कारण समोरच्याची आवड जोपर्यंत आपल्याला त्रास देत नाही तोपर्यंत त्यात काहीच बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही हे आम्हाला समजतं. उर्फीचा आदर्श ठेवलाय म्हणालात ना, तिचे कपडे नाही पण स्वतःसाठी उभं राहणं तिच्याकडून शिकायलाच हवं कदाचित तुम्हीही कारण तुमचा सुप्त राग जागच्या जागी काढू शकला असतात तर ही कटुता आज ट्रेनमध्ये पसरवली नसती. सर्वांचंच शरीर ही निसर्गाची निर्मिती आहे, देव देव करणाऱ्याला तुम्हाला देवाने दिलेली मूळ शरीराची ठेवण बघणं ओंगळवाणं कसं वाटतं?

सॉफ्टपॉर्नवर आक्षेप नाही मग ऊर्फीवर का?

पूर्वी बायका ब्लाउज शिवाय साड्या नेसायच्या, त्याही आधी तर झाडापानांनी शरीर झाकलं जायचं. पण तेव्हा कधीच काही समस्या आली नाही कारण तेव्हा ते फक्त शरीर होतं. तुम्ही प्रत्येक शरीराला अश्लीलतेने बघणं सुरु केलं आणि झाकपाक संस्कृती तयार होत गेली.. राहता राहिला प्रश्न उर्फीच्या तुलनेचा. एखादी गोष्ट झाकून ठेवली की ती बघण्याची उत्सुकता वाढतेच नाही का. तीच वाढलेली उत्सुकता उर्फी, गौतमी सारख्या मुलींनी हेरली आणि ‘लोकांना’ जे बघायचंय ते दाखवू लागल्या. तुमच्या मुलींना, सुनांना, स्वतःला काय शिकवण दिलीये माहित नाही पण शितावरून भाताची परीक्षा करू नका. आम्हाला आमच्यासाठी काय चांगलं हे कळतं. आम्ही उर्फीही होणार नाही आणि तुमच्यासारख्या कटू ही होणार नाही. शरीराला काय साजेसं वाटतं त्यानुसार आम्ही कपडे घालतो आणि घालू.

तिचं उत्तर ऐकून बायका खजील झाल्या, कुजबुज ओसरली आणि ट्रेन थांबली. सगळे उतरताना त्या मुलीने जॅकेट काढून पुन्हा बॅगेत टाकलं आणि पुन्हा थाटात निघाली. खरंय उर्फीने बाकी काही नाही केलं तरी स्वतःसाठी उभं राहायला, स्वतःच्या शरीरात कम्फर्टेबल राहायला शिकवलंय. आता तुमचा कम्फर्ट तुम्ही ठरवा!