वनिता पाटील

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कान्स फेस्टिव्हल आलं की सुरूच होतात वादविवाद, टीकाटिप्पण्या. यंदा एश्वर्या रायच्या ॲल्युम्युनियम फॉइलसारख्या दिसणाऱ्या ड्रेसवरून चर्चा सुरू असतानाच उर्वशी रौतेलाबाईंनी सगळ्यांची तोंडंच बंद करून टाकली आहेत.

का म्हणून काय विचारता?

बघितला नाही का तिचा नेसलेस?

नुसता नेकलेस बघू नका, त्याची किंमतही बघा.

अगदी डोळे फाडून बघा.

आधीच त्या नेकलेसचं डिझाईन आहे मगरीचं.

आपल्यासारख्यांना ती मगर न वाटता पाल वाटते ते सोडून द्या.

पण पाल म्हणून इइइइइइइइ करायला जाल

तर किंमत वाचून ऑऑऑऑऑऑऑ होईल.

होय. त्या नेकलेसची किंमत म्हणे २०० कोटी आहे.

हेही वाचा >>> ‘‘गर्ल नेक्स डोअर’पेक्षा ‘संवेदनशील अभिनेत्री’ ही प्रतिमा प्रिय! ’’

तब्बल २०० कोटी.

आपल्याला २०० कोटी म्हणजे दोनावर किती शून्ये ते पण नेमकं सांगता येणार नाही, ही गोष्ट वेगळी. कुणीतरी २०० कोटींचा नेकलेस गळ्यात घालतं हीच आपल्यासाठी मोठी गोष्ट. नाही का ?

ते जाऊ द्या. खरी बातमी पुढेच आहे.

उर्वशी रौतेला तो हार गळ्यात घालून कान्सच्या रेड कार्पेटवर चालल्यानंतर म्हणे त्यांची किंमत २७६ कोटी झाली आहे.

फ्रेंच लक्झरी फर्म कार्टियरने तयार केलेला हा नेकलेस पहिल्यांदा २०१८ साली मध्ये सादर करण्यात आला होता. या नेकलेसमधील फक्त एक मगर बनवण्यासाठी हजाराहून जास्त फॅन्सी पिवळे हिरे वापरण्यात आले आहेत. यामध्ये १८ कॅरेट पिवळे सोनेदेखील वापरले आहे.

दुसऱ्या मगरीमध्ये १८-कॅरेट पांढरे सोने वापरण्यात आले असून त्यावर ६६.८६ कॅरेट वजनाचे पाचू लावण्यात आले आहेत. मॅक्सिन अभिनेत्री मारा फेलिक्सनेही १९८० मध्ये असाच दोन मगरींचा हार गळ्यात घालून सगळ्यांना आश्चर्यचकित करून सोडलं होतं म्हणे…

उर्वशी रौतेलाचं या नेकलेसमुळे चांगलंच ट्रोलिंग झालं. काही भारतीय डिझायनर्सचं म्हणणं आहे की आपल्या देशात इतके सुंदर आणि खऱ्या सोन्याचे दागिने तयार होत असताना हे असे मगरीबिगरीचे आणि तेही पूर्ण खरे नसलेले दागिने घालून काय मिरवायचं? तेही कुणीतरी आधी घातलेले दागिने घालून काय मिरवायचं?

हेही वाचा >>> बॉलीवूड ते हॉलीवूड’- प्रियांका चोप्रा जोनास

आणखी एका डिझायनरचं म्हणणं आहे की हा नेकलेस पूर्णच खोटा आहे. तो कार्टियर या फ्रेंच लक्झरी फर्मने तयार केलेलाच नाही.

आता बोला…

पण उर्वशी रौतेलाच्या टीमने त्यांच्या तोंडावर असं उत्तर फेकलंय की कुणी त्यावर काही बोलूच शकणार नाही. आमच्या मॅडमनी हा नेकलेस घातल्यानंतर त्याची किंमत ७६ कोटींनी वाढली आहे, असं तिच्या टीमचं उत्तर आहे. 

पुरूषप्रधान संस्कृतीत स्त्रियांना ज्या आव्हानांना सामोरं जावं लागतं, त्याबाबतच्या उर्वशी रौतेलाच्या दृढतेचं या दोन्ही मगरी प्रतीक आहेत असंही तिच्या टीमचं म्हणणं आहे.

हे तर फार भारीच आहे. असं काही असेल तर मगरच का गळ्यात घालून घ्यायची असं वाटतंय ना तुम्हालापण?

बरोबरच आहे, गेली ५० वर्षे आपल्याकडे व्याघ्रप्रकल्प सुरू आहे.

काही वर्षांपूर्वी आपण पेंग्विन आणले आहेत.

नुकतेच चित्तेही आले आहेत.

ठरलं तर मग, पुढच्या वर्षी कान्सच्या रेड कार्पेटवर कुणाच्या गळ्यात रत्नजडित वाघ, कुणाच्या पेंग्विन, तर कुणाच्या चित्तेपण दिसायला हवेत. पण उर्वशीच्या गळ्यातल्या नेकलेसमधल्या मगरीला पाल समजणाऱ्यांनो पुढच्या वर्षी एखादीच्या गळ्यातल्या नेकलेसमध्ये वाघ वगैरे दिसलाच तर ती मांजर समजू नका म्हणजे झालं…