‘सेलिब्रिटी’ लोकांचे अंडरआर्म्स कायम अगदी एकही केस नसलेले, क्लीअर आणि गुळगुळीत कसे दिसतात, असा प्रश्न तुम्हाला कधीतरी पडला असेल! बहुतांश स्त्रिया अंडरआर्म्ससाठी केवळ वॅक्सिंग किंवा शेव्हिंग करतात. कदाचित तुम्हीही हा अनुभव घेतला असेल, की वॅक्सिंग वा शेव्हिंग केल्यानंतरही अंडरआर्म्स अगदी क्लीअर कधीच दिसत नाहीत. अंडरआर्म्सवर जिथे केस होते तिथे त्या केसांच्या बारीक बारीक खुणा राहिलेल्या असतात, तसंच त्या ठिकाणी काळपटपणा, सुरकुत्या याही नैसर्गिकरित्या असतातच. अंडरआर्म्सवर केस मुळातच कमी यावेत किंवा येऊच नयेत म्हणून अनेक मंडळी विविध कॉस्मेटिक ट्रीटमेंटस् घेतात, शिवाय तिथली त्वचा बाकीच्या त्वचेपेक्षा काळपट दिसू नये म्हणूनही काही ट्रीटमेंटस् असतात. मात्र त्या सर्वांनाच करणं शक्य नसतं आणि रुचणारंही नसू शकतं. पण तुम्हाला हे माहिती आहे का, की या सगळ्यावर मेकअपवाल्यांनी एक तात्कालिक उपाय शोधून काढला आहे- तो म्हणजे अंडरआर्म्सवर चक्क ‘कन्सीलर’ लावण्याचा!
आकर्षक ‘अंडरआर्म्स’साठी चक्क मेकअप!
‘अंडरआर्म्सचा मेकअप’ ही संकल्पना तुम्ही ऐकली आहे का? पण कित्येक स्त्रिया ती वापरत आहेत. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय मेकअप बाजारात खास अंडरआर्म्सचा मेकअप करण्यासाठीची काही उत्पादनं दिसू लागली आहेत...
Written by संपदा सोवनी
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 28-10-2022 at 12:19 IST
मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Use of cosmetics for attractive underarms dpj