डॉ. शारदा महांडुळे

चिकू हे फळ त्याच्या गोड चवीमुळे सर्वाचेच आवडते असते. नैसर्गिक साखरेचा स्रोत असलेल्या चिकू या फळाचे मूळ स्थान उष्ण कटिबंधातील वेस्ट इंडिज हे आहे. तेथे हे फळ चिकोज पेटी या नावाने ओळखले जाते. भारतात गुजरात, बिहार, बंगाल, उत्तर प्रदेश तर महाराष्ट्रात पुणे, कोकण, खानदेश, सुरत, ठाणे या ठिकाणी चिकूची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. चिकूची फळे ही गोलाकार आणि लंबगोलाकार अशा दोन प्रकारात येतात.

Garlic Rate, Vegetable Rate, Pune, Garlic,
लसूण महागला, परराज्यातील लसणाची आवक कमी
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Fight Winter Cold Cough with lemon and clove water
Fight Winter Cold, Cough : घसा खवखवतोय, सर्दीसुद्धा झाली आहे? मग सकाळच्या कॉफीऐवजी ‘या’ पेयाने करा तुमच्या दिवसाची सुरुवात
Purple Cabbage Healthy Salad Recipe In Marathi
वाढलेले वजन झपाट्याने होईल कमी; नाश्त्यामध्ये करा पर्पल कॅबेज सॅलेडचा समावेश, ही घ्या सोपी रेसिपी
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
Arjun Kapoor confirming breakup with Malaika Arora and told about importance of emotional freedom
मलायका अरोराबरोबर ब्रेकअपनंतर अर्जुन कपूरने सांगितले, भावनिक स्वातंत्र्य का महत्त्वाचे? जाणून घ्या, तज्ज्ञ याविषयी काय सांगतात
elderly woman rescued by fire brigade after being trapped in flat
सदनिकेत अडकलेल्या ज्येष्ठ महिलेची सुटका- बेशुद्धावस्थेतील महिलेवर त्वरीत उपचार केल्याने अनर्थ टळला
Sweet or savoury breakfast
सकाळच्या नाश्त्यामध्ये गोड पदार्थ खावे का? त्याचा आरोग्यावर काय होतो परिणाम? तज्ज्ञांकडून घ्या जाणून…

औषधी गुणधर्म
चिकूमध्ये लोह, फॉस्फरस, कॅल्शिअम, पिष्टमय पदार्थ, प्रथिने, मेद व आर्द्रता भरपूर प्रमाणात असते. तसेच ‘अ’ जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणावर असते. तर अल्प प्रमाणात ‘क’ जीवनसत्त्व आणि नैसर्गिक फलशर्करा भरपूर प्रमाणात असते. चिकू मधील या गुणधर्मामुळे थकलेल्या, दमलेल्या, अशक्त झालेल्या निरुत्साही व्यक्तीस चिकूचे सेवन हे अमृतासमान आहे.

आणखी वाचा : नातेसंबंध: ‘वीकेण्ड कपल’ असंही सहजीवन?

उपयोग
० लहान मुलांना अभ्यास व खेळण्यामुळे शारीरिक व मानसिक थकवा आल्यानंतर चिकू खायला दिल्याने त्यांच्यात नवा उत्साह व शक्ती संचारते. त्यामध्ये फलशर्करेचे प्रमाण अधिक असल्याने ती रक्तात मिसळून लगेचच थकवा घालवते.
० चिकू हे मधुर, श्रमहारक, तृप्तीदायक, दाहनाशक असल्याने श्रम करून थकवा आलेल्यांनी चिकू खाल्ल्याने नवी ऊर्जा मिळते.
० चिकू, शीतल व दाहशामक असल्याने अरुची, मळमळ आम्लपित्त, अतिसार या आजारांमध्ये उपयुक्त आहे.
० चिकू खाल्ल्याने आतड्यांची कार्यक्षमता वाढून व ती सुदृढ बनतात.
० चिकूच्या झाडातून चिकल नावाचा डिंक बाहेर निघतो तसेच त्याच्या सालीमधून चिकट दुधी रंगाचा रसचिकल नावाचा डिंक काढण्यात येतो. वस्तू चिकटवण्यासह या डिंकापासून च्युइंगमही बनवण्यात येते.
० गर्भवती स्त्रीने सकाळी उठल्याबरोबर चूळ भरल्यानंतर रोज एक चिकू खावा. रात्रभर उपाशी राहिल्याने सकाळी येणारी चक्कर तसेच उलटी मळमळ ही लक्षणं चिकू खाल्ल्याने कमी होतात व फलशर्करा मिळाल्यामुळे उत्साह निर्माण होतो.
० रक्तदाब कमी असणाऱ्या व्यक्तींनी चिकू खाल्ल्यास रक्तदाब प्राकृत होतो.

आणखी वाचा : Flashback 2022 : ‘या’ घटना ठरल्या महिलांसाठी लक्षणीय!

० ज्यांना वारंवार चक्कर येण्याचा त्रास होत असेल तसेच शरीरातील साखर वारंवार कमी होत असेल, लो शुगरचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी चहा, बिस्किटं खाण्याऐवजी चिकू खावा. या चिकूमधील नैसर्गिक फलशर्करा लगेचच रक्तात शोषली जाते व चक्कर, थकवा, ग्लानी ही लक्षणे कमी होतात.
० ताप आलेल्या रुग्णांचं जर तोंड बेचव झालं असेल तर चिकू खावा. त्याने तोंडास रुची निर्माण होऊन उत्साह निर्माण होतो.
० चिकूच्या सालीचा काढा अतिसार व ताप यामध्ये दिल्यास जुलाब व ताप ही लक्षणं कमी होतात. कारण चिक्कूच्या सालीमध्ये टॅनिन हा घटक असतो आणि हा घटक शक्तिवर्धक व तापनाशक आहे.

आणखी वाचा : ‘ लव्ह जिहाद ‘ ला कायद्याची जरब बसणार का?

० चिकू ७-८ तास लोण्यामध्ये भिजवून खाल्ल्यास शरीरामधील दाह, डोळ्यांची, हातपायांची जळजळ, आम्लपित्त ही पित्तप्रकोपक लक्षणं कमी होतात.
० चिक्कूमध्ये असणाऱ्या आर्द्रता व तंतुमय पदार्थामुळे मलावरोध असणाऱ्या रुग्णांनी रात्री झोपताना व सकाळी उठल्याबरोबर चिक्कू खाल्ल्यास शौचास साफ होते.
सावधानता –
कच्चे चिक्कू खाऊ नयेत, कारण हे चिक्कू बेचव असतात व त्यामधील चिकामुळे तोंड कोरडे पडते तसेच मलावरोध व पोटात दुखणे या तक्रारी दिसून येतात. पिकलेला चिक्कू स्वच्छ धुऊन खावा. मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी सहसा चिक्कू खाऊ नये.

sharda.mahandule@gmail.com