डॉ. शारदा महांडुळे

भारतात समुद्रकिनारी रेताड जमिनीमध्ये खजुराची झाडे उगवतात. मात्र, सहसा आपण जो खजूर खातो तो सौदी-अरेबिया, इजिप्त, इराक, अफगाणिस्तान या देशांमधून आलेला असतो. व्यवस्थित पिकलेल्या रसदार फळांना खजूर म्हणतात तर सुक्या फळांना खारीक म्हणतात. सर्वसाधारणपणे जायदी खजूर आणि पिड खजूर असे दोन प्रकारचे खजूर बाजारात उपलब्ध असतात. जायदी खजूर हा उत्तम प्रतीचा खजूर असून तो पिवळा-सोनेरी व भरीव असतो, तर पिड खजूर लाल किंवा काळसर लाल अधिक रसदार, चविष्ट आणि गुणांनी अधिक श्रेष्ठ असतो. खजूर वा खारीक दोन्हींमध्ये पौष्टिकमूल्य सारखेच असते.

Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Fight Winter Cold Cough with lemon and clove water
Fight Winter Cold, Cough : घसा खवखवतोय, सर्दीसुद्धा झाली आहे? मग सकाळच्या कॉफीऐवजी ‘या’ पेयाने करा तुमच्या दिवसाची सुरुवात
Purple Cabbage Healthy Salad Recipe In Marathi
वाढलेले वजन झपाट्याने होईल कमी; नाश्त्यामध्ये करा पर्पल कॅबेज सॅलेडचा समावेश, ही घ्या सोपी रेसिपी
Five detox tips for rejuvenate your body
Post Diwali Detox Tips : सणासुदीला भरपूर गोड, तेलकट पदार्थ खाल्ले का? मग शरीर डिटॉक्स करण्यासाठी करून पाहा हे पाच उपाय
Pankaj Tripathi shares recipe for his ‘special’ masala chai
पंकज त्रिपाठी मसाला चहामध्ये टाकतात तमालपत्र! चहामध्ये तमालपत्र घालावे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या फायदे
Can even 1.5 grams of weight gain increase the risk
१.५ ग्रॅम वजन वाढल्यानेही वाढू शकतो मधुमेहाचा धोका? तज्ज्ञांचे मत काय…
Sweet or savoury breakfast
सकाळच्या नाश्त्यामध्ये गोड पदार्थ खावे का? त्याचा आरोग्यावर काय होतो परिणाम? तज्ज्ञांकडून घ्या जाणून…

आणखी वाचा: आहारवेद : गर्भवतींसाठी उपयुक्त- चिकू 

औषधी गुणधर्म
खजुरामध्ये शरीराला पोषक ठरणारी अनेक नैसर्गिक अन्नद्रव्ये आहेत. कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस व ‘अ’ व ‘क’ जीवनसत्त्व, प्रथिने, खनिजे, तंतूमय पदार्थ आणि पिष्टमय पदार्थ हे सर्वच घटक खजुरामध्ये असतात. म्हणून खजुराला ‘पूर्ण आहार’ असेही संबोधिले जाते व त्यामुळेच फार पूर्वीपासून सहारा वाळवंटात त्याला रोटीइतकेच महत्त्वाचे मानले जाते. खजुरामध्ये ग्लुकोज व फ्रुक्टोज स्वरूपातील नैसर्गिक साखर असते. ही साखर नैसर्गिक असल्यामुळे शरीराला बाधक नाही. म्हणूनच बाजारातील साखरेऐवजी खजुराचा वापर करावा. खजुरातील साखर रक्तात लगेच शोषली जाऊन शरीराला ऊर्जा मिळते. खजूर नुसता किंवा लोण्याबरोबर खावा. खजुराची नीरा ही फार पौष्टिक असून ती ताजी पिणेच योग्य आहे.

आणखी वाचा: आहारवेद; अक्रोड

उपयोग

  • आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून खजूर हे फळ मधुर पौष्टिक, बलवर्धक, श्रमहारक, तृप्तिदायक, पचनास जड आणि वीर्यवर्धक आहे.
  • अनेक स्त्रियांमध्ये रक्तक्षय (अ‍ॅनिमिया) हा आजार आढळून येतो. या आजारामध्ये मेंदूला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे विस्मरण, चक्कर येणे, नराश्य येणे ही लक्षणे दिसतात. अशा स्त्रियांनी सहा महिने ते वर्षभर आहारात ७-८ खजूर दररोज सेवन करावे. हमखास गुण येतो.
  • किरकोळ शरीरयष्टीच्या लोकांनी जाडी वाढवण्यासाठी खजुराचे नियमित सेवन करावे. स्थूल लोकांनी खारिक खावी.
  • लहान बालकांच्या सुदृढतेसाठी दररोज एक खजूर दहा ग्रॅम तांदळाच्या धुवणात वाटावा. त्यात थोडे पाणी घालून ते मिश्रण लहान बालकांना दोन-तीन वेळा द्यावे. त्यामुळे बालके धष्टपुष्ट होतात.
  • मलावस्तंभाचा जुनाट त्रास असेल तर ५-६ खजूर रात्री भिजत घालून सकाळी ते पाणी चांगले ढवळावे व खजूर कुस्करून तयार झालेले पाणी प्यावे. खजूर रेचक असल्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते.
  • आतड्यांच्या विकारामध्ये खजूर अत्यंत गुणकारी आहे. कारण आतडय़ांमध्ये आवश्यक असणाऱ्या विशिष्ट जंतूंची वाढ खजूर सेवनाने होते. त्यामुळे आंत्रव्रण, आम्लपित्त अशा विकारांमध्ये खजूर उपयोगी पडतो.

आणखी वाचा: आहारवेद : मासिक पाळीतील अतिरक्तस्रावावर उपयुक्त आवळा

  • खजुरामुळे शरीराला ऊर्जा मिळते, कारण खजुरात नैसर्गिक साखर पुष्कळ प्रमाणात असते. त्यामुळे शरीराला उष्णता व ऊर्जा देण्याचे कार्य खजूर करते.
  • नियमितपणे खारीक व गरम दूध घेतल्यास शक्ती वाढते. शरीरात नवीन रक्त निर्माण होते.
  • अनेक स्त्रियांना कंबरदुखीचा त्रास होत असतो. अशा वेळी चार ते पाच खजूर व अर्धा चमचा मेथी दोन ग्लास पाण्यात उकळावी. हा काढा निम्मा होईपर्यंत उकळावा. नंतर गॅस बंद करून कोमट झाल्यावर तो पिण्यास द्यावा. या काढय़ाने कंबरदुखी थांबते.
  • खजुरातील बी काढून त्यामध्ये लोणी किंवा ओल्या नारळाचा खव भरून खावा. यामुळे रक्त व कॅल्शिअम या दोन्हींची करतरता भरून येते.
  • लहान मुलांना दात येत असताना खारकेचे कडे बनवून ते मनगटाला बांधावे. हिरडय़ा सळसळत असताना बाळ हे कडे चघळतील यामुळे हिरडय़ा मजबूत होऊन दात मजबूत निरोगी येतात व दात येण्याच्या वेळी मुलांना होणारे जुलाबही थांबतात.
    सावधानता-
    खजूर निवडताना सावधानता बाळगावी. चांगल्या प्रतीचा, उच्च दर्जाचा खजूर घ्यावा. खजूर बाजारातून आणल्यानंतर तो स्वच्छ धुऊन साजूक तुपात परतून खावा. न धुता खाल्ल्यास त्यावर असणाऱ्या धुळीमुळे जंतूसंसर्ग होण्याची भीती असते. खजूर एकमेकांना चिटकलेल्या अवस्थेत असता कामा नये. प्रत्येक फळ स्वतंत्र असते. खजूर हा पौष्टिक असला तरी प्रमाणातच खावा, कारण खजूर पचनास जड असल्यामुळे अतिसार होऊ शकतो.
  • sharda.mahandule@gmail.com