काही जणींना सकाळी घरातून बाहेर पडताना एक सवय असते. आरशात बघून पावडर लावणं, केस विंचरणं झालं, की स्वत:कडे निरखून बघून आज आपण कसे दिसतोय, याबद्दलची कबुली त्या मनाशीच देऊन टाकतात. खरं सांगायचं तर तुम्ही जेव्हा जेव्हा आतून आनंदी आणि उत्साही असता तेव्हा चांगल्याच दिसता! कारण आतलं तेज चेहऱ्यावर झळकतं. पण केसांचं काय? दररोज शॅम्पू किंवा हेअर स्पा करणं आपल्याकडे कुणाला शक्य नाही आणि तसं करूही नये. शिवाय कामाचं किंवा शिक्षणाचं ठिकाण गाठायलाच ‘चतुरां’ना इतकी धावपळ करावी लागते, की त्यात घरून निघताना छान बांधलेले केसही इच्छितस्थळी पोहोचेपर्यंत पार विस्कटून जातात. पण लगेच ‘गुड हेअर डे’ किंवा ‘बॅड हेअर डे’, अशी वर्गवारी न करता आपण मुळातच केसांची निगा चांगली राखली जावी यासाठी काय करता येईल ते पाहू या. केसांची चांगली देखभाल केली, तर केस निरोगी राहून तुमचे सर्व दिवस आपोआपच ‘गुड हेअर डे’ असतील. त्यासाठी काही टिप्स बघू या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा