– वर्षा कोडापे (चंद्रपूर)

पूर्व विदर्भातील चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा. गोंड राजांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या जिल्ह्यात मोठी वनसंपदा आहे. मात्र औद्योगिकीकरणाने पर्यावरणाचा होणारा ऱ्हास आणि बदलत्या वातावरणाचे पडसाद आता मानवी वनावर उमटू लागले आहेत. औद्योगिक विकासाच्या नावावर देशातील पहिल्या १० प्रदूषित शहरात चंद्रपूरचा समावेश झालाय. श्वसनाचे रोग, दमा, बी, कॅन्सर, डोळे, त्वचा, हृदयरोग यासह आता स्त्री-पुरुषात वंध्यत्व अर्थात नपुंसकतेलाही बदलते पर्यावरण आमंत्रण देत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगभरातील सहापैकी एक व्यक्ती वंध्यत्वाने त्रस्त असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आणले असून पूर्व विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्याचे वास्तव अधोरेखित करणारा हा विशेष रिपोर्ताज……

unseasonal rain, Vidarbha, temperature, rain ,
विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता! किमान तापमानात वाढ
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
indian tectonic plate
तिबेट खालील भारतीय टेक्टोनिक प्लेट दुभंगणार? भूवैज्ञानिकांनी व्यक्त केली चिंता; याचा काय परिणाम होणार?
Global Warming, Chandrapur , International Conference on Climate Change-2025,
‘ग्लोबल वॉर्मिंग’विरोधात शंखनाद, चंद्रपुरात पर्यावरण बदलावर…
climate change creating favorable environment for mosquito borne diseases
वातावरणातील बदलांमुळे साथींचे आजारही बारमाही? हिवताप, डेंग्यू, लेप्टो, इन्फ्लुएन्झाचा धोका सदासर्वकाळ?
way to reduce human-wildlife conflict is through Chandrapur says Forest Minister Ganesh Naik
मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा मार्ग चंद्रपुरातूनच – वनमंत्री
Dr. K. Kathiresan fears marine carbon sequestration collapse from 2025 due to plastic pollution
समुद्रात कार्बन शोषणारी यंत्रणा कोलमडण्याची शक्यता, शास्त्रज्ञ डॉ. के. कथीरेसन यांनी व्यक्त केली भिती
health issues due to pollution in sangli news in marathi
सांगलीत ‘दत्त इंडिया’कडून जल, वायू प्रदूषण; आरोग्यास धोका निर्माण झाल्याची तक्रार

“माझे शिक्षण मार्केटिंगचे आहे. घरची आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण. मी आणि झा नवरा खाजगी नोकरी करतो. घरात सासू-सासरे असतात. मला मूल होत नाही म्हणून अनेक उपचार केले; काहीच फरक पडला नाही. घरात तणावाचे वातावरण असते. सासू सारखी मागे लागून असते की बाबा-महाराजकडे जा, औषध घे. मी माझे प्रयत्न करत असतेच, मात्र एक दोन दिवसाआड सासू सतत मला टोमणे मारत असते. माझ्या सासर-माहेरचे मंडळी एकत्र आली की माझ्या नपुसंकतेबद्दल चर्चा करतात. ‘आम्ही मेल्यावर नातू दाखवशील का?’ असे थेट बोलतात तेव्हा मलाही जगणे नकोसे वाटते. बरं प्रत्येक वेळी आरोप महिलांवरच; पुरुषांना कोणी बोलतही नाहीत. माझ्यासारख्या आत्मनिर्भर महिलेची ही अवस्था होत असेल तर सर्वसामान्य स्त्रियांचे प्रश्न किती जातील असतील, त्यांच्या मानसिक त्रासाबद्दल आपण विचारही करू शकत नाही.”

लग्नाला ५ वर्ष पूर्ण झालेली अनुराधा (नाव बदलले आहे) या घडीला वंध्यत्वामुळे अतिशय मानसिक आणि शारिरीक त्रासाचा सामना करतेय. 

अनुराधा ही चंद्रपूरची… गेल्या पाच वर्षांपासून अनुराधा आणि तिच्या नवऱ्याला मुल होत नसल्याची जी काही वैद्यकीय कारणे आहेत त्यातील एक कारण असे आहे ज्यावर आजपर्यंत एकदाही चर्चा झालेली नाही. खरं म्हणजे वंध्यत्वाच्या मागे असा काही निष्कर्ष असू शकतो हेच मुळात धक्कादायक आहे. आणि विशेष म्हणजे अनुराधा ज्या जिल्ह्यात किंवा शहरात राहते त्या शहरातच याचे कारण दडलेले आहे. मात्र उघडपणे यावर कोणीही बोलत नाहीत…

चंद्रपूर जिल्हा आणि नपुंसकता, काय आहे समीकरण?

पूर्व विदर्भातील औद्योगिक चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा, सिमेंट, वीज, स्टील व पेपर आघाडीच्या खदानी व उद्योगांमुळे भरभराट झाली असली तरीही आता बदलते पर्यावरण व प्रदूषणामुळे नागरिकांचा श्वास कोंडला आहे. त्याचे परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून श्वसनाचे रोग, दमा, टीबी, कॅन्सर, डोळे, त्वचा, हृदयरोग यासह स्त्री-पुरुषात वंध्यत्व अर्थात नपुंसकतेलाही सामोरे जावे लागत आहे. गाव व शहरातील विवाहित दापत्यांना या समस्यांचा मोठा सामना करावा लागत असून मानसिक नैराश्य व कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनातदेखील यातून वाढ होत असल्याचे धक्कादायक वास्तव दिसून येते.

खनिज संपत्तीचे समृद्ध असलेल्या या जिल्ह्यात कोळशाचे अंदाजित साठे १६०६ लियन टन इतके आहे. २९ कोळसा खाणी असून १७ भूगर्भावर तर १२ भूमिगत आहेत. आयर्न ओअर अर्थात लोखंडाचे मुबलक साठे असून त्याचे प्रमाण राज्याच्या लोह खनिज क्षमतेच्या ७७.९ टक्के आहे. याशिवाय पाच सिमेंट कारखाने, वीज निर्मिती प्रकल्प, सेलचा स्टील प्लान्ट, चांदा आयुध निर्माणी, लोह पोलाद प्रकल्प, भाताची राईस मिल आदी मोठे उद्योग आहेत. या औद्योगिक भरभराटीत जिल्ह्याच्या पर्यावरणाची होणारी हानी मात्र चिंतेचा विषय आहे.

विपुल वनसंपदा असूनही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून त्याचा रोग्यावरही परिणाम जाणवत आहे. अनेक संशोधनातून असे आढळून आले आहे आणि वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे तज्ञदेखील याला दुजोरा देतात. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या वंध्यत्वतज्ज्ञ डॉ. कामिनी राव  या संदर्भात म्हणतात की, पुरुषांमध्ये वंध्यत्वाचे प्रमाण ३० ते ५० टक्के आहे. प्रदूषण आणि तणाव आदी कारणांमुळे वंध्यत्व येते. विषारी हवेत श्वास घेतल्याने शुक्राणूंचे नुकसान होते आणि शुक्राणूंची संख्या खूपच कमी होते. ज्यामुळे गर्भधारणा होण्यास अडथळा येतो. शुक्राणूंची संख्या, गतिशीलता आणि एकाग्रता कमी झाल्यामुळे शुक्राणू फॅलोपियन ट्यूबच्या आतील भागात पोहोचत नाहीत. त्यामुळे अनेक प्रयत्न करूनही महिला गर्भवती होऊ शकत नाहीत.

चंद्रपूरच्या स्त्रीरोग तज्ञ डॉ. रजनी हजारे म्हणतात की, हवेत जितके विषारी घटक ढत जातात तितकेच पुरुषांच्या शुक्राणूंवर व स्त्रियांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो.

प्रदूषण नियंत्रण मंडळाने घालून दिलेल्या नियमांना बगल दिली जात असल्याने ल्ह्याच्या प्रदूषणात तब्बल पाच मायक्रोग्रॅमची वाढ झाली आहे. हवा गुणवत्ता निर्देशांक साधारणत: १०० मायक्रोग्रॅमपर्यंत असणे गरजेचे आहे. त्याबरोबर सल्फरडाय ऑक्साइडचे प्रमाण ८० आणि नायट्रोजनचे प्रमाण ८० मायक्रोमॅम पर एमपी असावे, असे ठरवून देण्यात आले आहे. पण, जिल्ह्यात हे प्रमाण १०५ वर गेले आहे. जंगलाचे क्षेत्र अधिक असल्याने प्रदूषण आटोक्यात असणे अपेक्षित होते. पण, उद्योगांकडून प्रभावी उपाय योज‌ले जात नाहीत. त्याचा परिणाम थेट मानवी आरोग्यावर होतो आहे.

पर्यावरणवादी सामाजिक कार्यकर्ते म्हणतात…

चंद्रपूरातील यशोधरा पोतनवार या गेल्या ३५ वर्षांपासून महिला चळवळीसोबत माजिक क्षेत्रात कार्यरत आहे. त्यांच्यामते ज्या विवाहित स्त्रियांना मूलबाळ होत नाही अशा स्त्रियांना शुभ कार्यापासून दूर ठेवतात. समाज तिला तुच्छतेने वागवते. चंद्रपुरातील संजयनगर येथील घटना त्यांनी गितली, मीना नावाच्या बाईला मूल-बाळ झाले नाहीत. तिच्याच घरासमोर रेखा नावाची बाई राहायची. एक दिवस मिनाचा नवरा रेखाच्या घरी गेला तिला मारझोड करू लागला. तेवढ्यावरच थांबला नाही, तर चक्क तिला घरातून बाहेर काढून दगडाने ठेचले. ‘ही माझ्या घराकडे पाहते म्हणून माझ्या बायकोला मूल होत नाही’ असे त्याचे मत. यात निष्पाप रेखाचा बळी गेला. मूल न होण्याला स्त्री-पुरुष दोघेही जबाबदार असतात. दोघांनीही आधी तपासणी करून घ्यावी. योग्य ते पर्याय निवडावे. कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनेवर अंमल आणणे गरजेचे आहे.

खगोल तज्ञ व पर्यावरण अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे म्हणाले की, १०० वर्षांपूर्वी वयात येणाऱ्या मुलींचे साधारणत: वय हे १६ वर्षांपर्यंत होते. आता ते वय १२ वर्षांपर्यंत खाली आले आहे. मुली लवकर वयात येतात. मुलांमध्येही झपाट्याने बदल होत आहे. बदलते हवामान आणि वाढते तापमान हे त्याचे मुख्य कारण आहे. चंद्रपूर हा जगात सर्वाधिक तापमान असणारा जिल्हा आहे. जिथे जास्त तापमान असते तिथे असे शारीरिक बदल जीवनशैलीत जाणवू लागतात. प्रदूषणातही हा जिल्हा अव्वल असल्याने सामान्य नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून टीबी, क्षयरोग, श्वसनाचे आजार, हृदयरोग आदींचे प्रमाण वाढले आहे. परिणामी मानवी शुक्राणूवर थेट परिणाम होत आहे. यामुळे वंध्यत्वाचा मोठा धोका असल्याचे टाळता येत नाही. शासनाने याबाबत आरोग्य सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. यावर अजूनही संशोधनाला वाव आहे.

नपुंसकता अर्थात वंध्यत्व म्हणजे काय?

नपुंसकता अर्थात वंध्यत्व म्हणजे एक अशी स्थिती की ज्यात एक दाम्पत्य कोणत्याही गर्भनिरोधक साधनांचा वापर न करता सतत वर्षभर संबंध ठेवूनही बाळाला जन्म देऊ शकत नाही. मात्र, यासाठी पुरुष आणि स्त्रिया दोघांची चाचणी करणे आवश्यक आहे.

नपुंसकतेची लक्षणे आणि कारणे कोणती?

महिलांमधील अनियमित मासिक पाळी, ओटीपोटात तीव्र वेदना, वारंवार गर्भपात, नियमित ओव्हुलेशनचा अभाव, पुरुषांमध्ये शुक्राणूंची निर्मिती आणि कार्यात समस्या, वाढलेले वय, हार्मोन किंवा पुनरुत्पादक अवयवांशी संबंधित मुद्दे, बंद झालेली किंवा संकुचित फॅलोपियन नलिका, थायरॉईड किंवा पिट्युटरी ग्रंथीची अयोग्य कार्यप्रणाली, पुरुषांमधील शुक्राणूवाहू नलिकेत अडथळा असणं आदी वंध्यत्व किंवा नपुंसकतेची महत्वाची कारणे आणि लक्षणे असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

हवामान बदलामुळे पुरुषांच्या प्रजनन क्षमतेला धोका

गेल्या काही वर्षांपासून पुरुषांच्या प्रजनन क्षमतेत वेगाने घट झाली असल्याची बाब ‘नेचर कम्युनिकेशन्स’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनातून समोर आली आहे. पुरुषांमधील कमी झालेल्या प्रजनन क्षमतेबाबतच्या कारणासाठी ठोस कारण समोर आले नसले, तरी वातावरणातील विषारी घटकांचा परिणाम पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवरही होत असल्याचे संशोधन गटाचे नेते प्रा. मॅट गेज यांनी त्याच्या अहवालातून सांगितले आहे. अनेक कारणांपैकी हे एक महत्त्वाचे कारण असल्याचे त्यांनी सांगितले. पुरुषांमधील प्रजनन क्षमतेच्या मुल्यांकनाचा आधार वीर्य विश्लेषण असत. वीर्यात असणाऱ्या शुक्राणूंची संख्या मोजली जाते. त्याआधारे पुरुषाकडे प्रजननासाठी आवश्यक शुक्राणू आहेत का हे पाहिले जाते. शुक्राणूंची संख्या कमी असल्यास औषधोपचार केले जातात.

अनेक संशोधनातून समोर आले की, आज पुरुषांमध्ये पूर्वीच्या तुलनेत सध्या शुक्राणूंची संख्या कमी झाली आहे. वर्ष २०१७ च्या संशोधनात शुक्राणूंचे प्रति मिलीमधील संख्येत ५० ते ६० टक्के घट झाली आहे. तर, वर्ष २०१९ मध्ये गतिशील शुक्राणूंची एकूण संख्या पाहण्यात आली. या संशोधनानुसार, १६ वर्षांमध्ये सामान्य गतिशील शुक्राणू असलेल्या पुरुषांच्या प्रमाणात १० टक्के घट झाली आहे.

पर्यावरणातील विषारी घटकांच्या संपर्कात आल्यानंतर हार्मोनवर परिणाम होतो आणि प्रजनन क्षमता कमी होते. वातावरणातील विषारी घटकांचा किती व कसा परिणाम होतो, याबाबत संशोधन सुरू आहे.

जगातील ६ पैकी एक व्यक्ती वंध्यत्वाने त्रस्त – जागतिक आरोग्य संघटना

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) प्रकाशित केलेल्या ९८ पृष्ठांच्या अहवालात म्हटले आहे की, जागतिक प्रौढ लोकसंख्येपैकी सुमारे १७.५ टक्के अंदाजे सहापैकी एकाला – त्यांच्या जीवनकाळात कधीतरी वंध्यत्वाचा अनुभव येईल. एका दशकाहून अधिक काळातील वंध्यत्वाच्या प्रादुर्भावाचा हा पहिला अंदाज आहे. जगभरातील सहापैकी एक व्यक्ती वंध्यत्वाने त्रस्त आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी जागतिक स्तरावर सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून वंध्यत्वाची तीव्रता अधोरेखित केली आहे. प्रतिबंध, निदान आणि उपचारांमध्ये वाढ व सहज उपलब्धता करणे तातडीची गरज असल्याचे दर्शविले आहे. वंध्यत्वाची कारणे वेगवेगळी आणि अनेकदा गुंतागुंतीची असतात आणि ती स्त्री आणि पुरुष दोघांनाही अनुभवावी लागते.

बऱ्याच देशांमध्ये प्रजनन उपचारांना मोठ्या प्रमाणात खासगीरित्या निधी दिला जातो. अनेकदा मोठ्या आर्थिक खर्चाचा परिणाम होतो. या समस्येचे प्रमाण असूनही, वंध्यत्वाच्या प्रतिबंध, निदान आणि उपचारांसाठी उपाय – आयव्हीएफसारख्या सहाय्यक पुनरुत्पादक तंत्रज्ञानासह जास्त खर्च, सामाजिक कलंक आणि मर्यादित उपलब्धता यामुळे अनेकांसाठी निधी कमी आणि अगम्य राहतो, असेही अहवालात नमूद आहे. सरकारने पुराव्यावर आधारित धोरणे विकसित करण्यासाठी आणि सिद्ध उपायांचा अवलंब करण्यासाठी, लोकांना त्यांचे प्रजनन हेतू पूर्ण करण्यात आणि निरोगी जीवन जगण्यास मदत करण्यासाठी आरोग्य प्रणाली मजबूत करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून या अहवालाचा
वापर करावा, असेही म्हटले आहे.

महिलांच्या व्यथा…

कमल (नाव बदलले आहे) यांच्याशी बोलताना त्या सांगत होत्या की, लग्न होऊन ४ वर्ष झाले. आता माझे वय २६ वर्षे आहे. मूल-बाळ अजून झाले नाही. प्रयत्न करतेय; दवाखाना चालू आहे. घरचे लोक सुरुवातीला सपोर्ट करायचे, पण समाजाची बघण्याची-बोलण्याची पद्धत बघून आता सासू-नवरा घरची परिस्थिती जेमतेम असूनही पाहिजे तितके पैसे खर्च करायला तयार आहेत, पण त्यांना मुलगा पाहिजे. घरी दुकान आहे छोटसं. मी शिलाई मशीनचे काम करते. मूल होत नाही म्हणून जे कोणी सांगतात तेथे जावून उपचार घेते, पण अजून बाळ राहिले नाही. गावात-समाजात वावरत असताना मनमोकळेपणाने राहू शकत नाही. सासू काही त्रास नाही देत, पण त्यांच्या मनात हुरहूर राहते नातवासाठी. समाजात वांझोटी म्हणून काही कुटुंबीयांनी तर चक्क सुनेला जाळून मारण्याच्या, मानसिक-शारीरिक छळासोबत घटस्फोट घेण्याचे प्रकार पाहते, त्यावेळी खूप
धक्का बसतो.

जगभरातील अहवाल काय सांगतात?

२०१७ मधील मेटा विश्लेषणात एका अहवालानुसार, १९७३ ते २०११ दरम्यान पुरुषांच्या शुक्राणूंचे घनत्व ५० ते ६० टक्के कमी झाले आहे. सामान्य माणसामध्ये शुक्राणूंची संख्या प्रति मिलीलीटर १.५ मिली ते २०० कोटी असते. पुरुषांमधील अंतःस्रावी ग्रंथी इंडोक्राइन प्रदूषणामुळे प्रभावित होत आहेत. ज्याचा परिणाम थेट प्रजनन क्षमतेवर होत आहे. प्लास्टिकमधून बाहेर पडणारे हानिकारक रसायने यास जास्त कारणीभूत ठरतात. वायू प्रदूषणामुळे सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड आणि इतर हानिकारक विषाणू शुक्राणूंची गुणवत्ता खराब करण्यासाठी जबाबदार आहेत. या व्यतिरिक्त लॅपटॉप, सेल फोन, मोडेमदेखील शुक्राणूंची गुणवत्ता खराब करण्यासाठी जबाबदार आहेत. शुक्राणूंची गती आणि आकार त्यांच्यामधून बाहेर पडणाऱ्या किरणोत्सर्गामुळे खराब होतात. हेवी मेटल कॅल्शियम, शिसे, आर्सेनिक, कॉस्मेटिक इत्यादी घटकांचा पदार्थांमध्ये समावेश असल्यानं शुक्राणूंच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असतात.

हेही वाचा : दुर्गापूर खुल्या कोळसा खाणीचे विस्तारीकरण; १२१.५८ हेक्टर वनजमीन वळती करण्याचा निर्णय

जगातील हॉट म्हणजेच उष्ण जिल्हा म्हणून ओळखला जाणारा चंद्रपूर आता प्रदूषणातही अग्रेसर आहे. उद्योगामुळे जंगल क्षेत्र कमी होत असून हवा, पाणी रसायनयुक्त व दुषित झाले आहे. बदलत्या धावपळीच्या जीवनशैलीत मानवी आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष आणि वातावरण बदलाचे परिणाम थेट मानवी आरोग्यावर मोठ्या प्रमाणात होत आहेत. यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठरवून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. नपुंसकतेची समस्या मानसिक खच्चीकरणासोबत संपूर्ण कौटुंबिक स्वास्थ ढासळवणारी आहे. शासनानेदेखील यावर संशोधन करून वेळीच उपाययोजना आखण्याची तितकीच गरज निर्माण झाली आहे.

(असर सोशल इम्पॅक्ट अॅडव्हायजर्स आणि बाईमाणूस यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ‘प्रोजेक्ट धरित्री’ उपक्रमांतर्गत ‘पर्यावरण बदल आणि लिंगभाव’ या विषयाशी संबंधित लेख)

Story img Loader